Wednesday, 4 September 2024

MLA's speach

 नमस्कार!

दोस्तो,

बहुत पुरानी ये बात हैं l आझादी के पहले भारत में बहुत अडपड और गवार लोग रहा करते थे l  आझादी के बाद भारत में जब पहली बार चुनाव हुया तो बहुत लोग चुनकर आये जिसमे कुछ अडपड और गवार  MP भी शामिल थे l अब आपको तो मालूम हैं, जो भी चुनाव में चुनकर आता हैं उन्हे लोगोकें सामने भाषण देना पडता हैं l अब जब UP के एक अडपड और गवार MP पर लोगोकें सामने भाषण देनेकी नौबत आ गयी तो ये बेचारे बहुतही घबरा गये, क्यो की, इन्हे भाषण देनेका तजुर्बा नहीं था l MP साहब को घबराये हुये देखकर उनके PA ने उन्हे पूछा, क्या बात हैं सर, आप बहुतही घबराये हुए दिखाई दे रहे हैं l तब MP ने PA से कहा की, अब लोगोंके सामने भाषण देना तो जरुरी हैं लेकिन मुझे भाषण देनेका तजुर्बा नहीं इसलिये मुझे डर लग रहा हैं l तब PA ने MP साहब को कहा की, इसमे डरने की, क्या बात हैं, भाषण देना तो बहुत ही आसान चीज हैं l आप जबभी अपना भाषण सुरु करेंगे तब एक बात की दुम में दुसरी बात मिला दीजिये भाषण अपने आप बन जायेगा l अपने  PA की यह बात सुनकर MP साहब बहुत खूष हुये l और स्टेज की तरफ आये l स्टेज की तरफ आते हुये देखकर लोगोंने उनके नामसे जोरदार नारे लगाये, टालियोंसे उनका स्वागत किया l 


माईक के सामने आकर MP साहब ने अपना भाषण सुरु किया l


अब ध्यान से सुनीये l MP साहब ने कैसे भाषण किया l


देवींयो और देवतायों l


इतनाही कहना था की,बस कुछ लोगोंने उठकर MP साहब के गले में गुलाब के फुलो की मालाये पहनायी l 

उसी मालामेंसे एक गुलाबका फुल निकाल कर उन्होने अपना भाषण आगे सुरु किया l


ये हैं गुलाब का फुल l इस गुलाब कें फुल कें बहुत ही महत्वपूर्ण उपयोग होते हैं l इस गुलाब कें फुल का पहला उपयोग पंडित नेहरू अपने शेरवानी के अचकल में लगाने कें लिए करते हैं l इसका दुसरा उपयोग,  लडकीया अपनी बालो की जडियोमें लगानेके लिए करती हैं l गुलाब कें फुल का तिसरा और महत्वपूर्ण उपयोग हैं की, इससे गुलकंद बनता हैं l ये गुलकंद बहुत ही मिठा होता हैं l मगर गुलकंद से मिठा होता हैं खरबूजा l कवाहत हैं की, खरबूजा खरबूजे को देखकर रंग बदलता हैं l लेकिन सबसे ज्यादा रंग बदलता हैं गिरगिट l ये रंगो की कहाणी जर्मन से सुरु होती हैं l क्योकी जर्मन में हिटलर पैदा हुया l हिटलर ने जिंदगीमे बहुतही वॉर खेले l वॉर का मतलब सोमवार, मंगलवर या इतवार नहीं l वार से खतरनाक होता हैं शेर l ये शेर जंगल में पाये जाते हैं l कुछ लोग तो जंगल में मंगल करणे हेतू घुमने जाते हैं l कहते हैं जंगल में मोर नाचा, पर आपमेंसे किसने देखा l शेर से याद आया l चालीस शेर का एक मण होता हैं l ये मन बहुत ही चंचल होता हैं l चंचल के बहेन का नाम था मधुबाला l मधुबाला को दिलकी बिमारी थी l दिल एक मंदिर हैं l और ये मंदिर पंजाब में पाये जाते हैं l पंजाब के लोग बहुत ही वफादार होते l पर सबसे वफादर होता हैं कुत्ता l पर कुत्तेकी दुम कुछ तेडी होती हैं l लोगोंने इन्सान की तरह सिधा रहना चाहिये l आप इन्सान को सुधार सकते हैं पर कुत्तेकी दुम को नहीं l जबतक आप कुत्ते की दुम को सुधार नहीं सकते तबतक इस नाचीज् MP को आग्या दीजिये l

जय हिंद!

Guest speaker

 It was an excellent experience to address students of PCET's Pimpri Chinchwad College of Engineering as a Chief Guest at Induction Program of Professional Chapter of 2nd year 2024 Students . It's a great initiative by the college. This Professional Chaper of students will  organize many extra curriculum activities for the students throughout the year. This initiative will surely support students to enhance their Knowledge, Skills, Attitude in their potential areas of interest. Develop Vision & acquire effective Habits. This will help students to achieve new highest in their carrier.

Thank you Prof. N. B. Chopade. Dy. Director. Mrs. Ashwini S. Shinde madam & Dr. K. S. Kinge sir. Most importantly all the newly selected chapter heads & students.

सहज कृषी

 निर्मला फार्म - भाग सोळा -सहजयोग करणाऱ्या शेतकऱ्यांनी सहज कृषी(शेती)करावी .


सूचना :- हा लेख सहजयोग करणारे सहजयोगी शेतकरी आणि सहजयोग न करणारे पण सहजयोगाबद्दलचे कुतूहल असणारे  संभाव्य सहजयोगी यांना नजरेसमोर ठेवून लिहला आहे.काही कमी लिहले असेल तर यात भर घाला आणि काही जास्त लिहले असेल तर ते कमी करा. 


तुम्हाला रासायनिक शेती, शेंद्रीय शेती, नैसर्गिक शेती प्रकार माहित असतील. आता समजून घेऊया प.पू.श्री माताजी निर्मला देवी यांनी सांगितलेली  सहज कृषी(शेती).


या विश्वाची निर्मिती पाच घटकापासून झाली आहे हे आपण जाणतो . भूमी,जल,अग्नी,वायू,आकाश हे पाचही घटक आपल्याला दृष्य स्वरूपात दिसतात. असे म्हटले जाते की, मानव हा या विश्वाची अतिशय छोटी पण हुबेहूब आवृत्ती आहे.कारण मानव पण याच पाच घटकांनी बनलेला आहे. जे या विश्वात आहे ते मानवात आहे आणि जे मानवात आहे ते विश्वात आहे. म्हणूनच म्हटले जाते,' यथा पिंडी तथा भ्रमांडी.' महत्वाचे आहे ते म्हणजे हा माणूस विश्वाशी जोडला गेलेला असला पाहिजे. 


मानवाचे शरीर आणि त्याचा आत्मा, चेतना या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. अगदी तसच विश्व आणि या विश्वाचा परमात्मा, परम चेतना या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. शरीरात आत्मा, चेतना असेल तर शरीर सजीव आहे अगदी तसच भूमी, जल,अग्नी,वायू, आकाश यात परमात्मा,परम चेतना असेल तर तेही सजीव आहे. याचाच अर्थ परमात्मा, परम चेतना, Cosmic Energy ही विश्वाला सजीव ठेवणारी ऊर्जा आहे. विश्व ही एक जिवंत गोष्ट आहे आणि त्याचे चलन वलन परम चेतना,परम चैतन्य करत असते.यालाच आध्यात्मात चैतन्य ऊर्जा असे म्हटले जाते.


प.पू.श्री माताजी निर्मला देवी ह्या सहजयोग्यांच्या गुरुस्थानी आहेत आणि त्यांनी प्रत्येक सहजयोग्याला स्वतःचा गुरु बनविलेले आहे. श्री माताजींनी सहजयोग स्थापन केलेला आहे आणि साधकांना सत्याचा ज्ञानमार्ग दाखविला आहे. सहजयोग खूप मोठा आहे आणि सहज कृषी हा सहजयोगाचा एक भाग आहे. श्री माताजींनी सहज कृषिची अनेकदा महती सांगितली आहे. त्यांनी स्वतः राहुरी कृषी विद्यापीठात तीन नारळ ट्रीटमेंट केली होती. या ट्रीटमेंटमुळे तिथे सूर्यफूल, गहू, तांदूळ याचे भरघोस उत्पादन मिळाले होते. 

डॉ हमीद मायलेनी या परदेशी सहजयोग्याने पाणी याविषयावर PhD केली आहे. पाण्याला चैतन्य दिले तर त्याचा पीएच बदलतो हे त्यांनी सप्रमाण सिद्ध केले आहे. सहज कृषी ही एक  शास्त्रीय पद्धत आहे. सहजयोगात साधकाला आत्मसाक्षात्कार दिला जातो. त्यामुळे त्याची कुंडलिनी शक्ती जागृत होते आणि त्याला तळहातावर, बोटावर, टाळूवर थंड किंवा गरम चैतन्य लहरी जाणवायला लागतात. याचाच अर्थ तो परम शक्तीशी कनेक्ट होतो. हेच ते चैतन्य सहज कृषित महत्वाची भूमिका बजावते.


विश्व ही जिवंत क्रिया आहे. विश्वात या क्षणाला भूमीवर कुठे भूकंप,भूसखलन होत आहे. जल बाबत कुठे भरती,

ओहोटी,सुनामी,पूर येत आहे. अग्नी कुठे ज्वालामुखी,उष्णता, आग ओखत आहे. वायुमुळे कुठे वादळ,वारे सुरु आहे.तर आकाशात कुठे काहीतरी बदलाच्या घटना घडत आहेत.पृथ्वी स्वतःभोवती फिरत आहे, सूर्याभोवती फिरत आहे.  हे सर्व पंचतत्व सजीव असल्याचेच द्योतक आहे. या विश्वाच्या निर्मिती,भरणपोषण,नाश करण्यामागे कोणतीतरी अदृश्य शक्ती कार्यरत आहे असे आपण मानतो , जाणतो . याला कोण दैवी शक्ती म्हणते , तर कोण याला निसर्ग असे म्हणेल. परंतु  पंचमहाभूताच्या या महानतेमुळेच मानवासाठी ही पाच तत्व म्हणजे भूमी देवता, जल देवता, अग्नी देवता, वायू देवता, आकाश देवता अशी देवतास्वरूप आहेत आणि आपण यांची पूजा पण करतो.


महाराष्ट्रात स्वयंभू अष्टविनायक आहेत. तसेच देशविदेशातही उलुरू सारखी स्वयंभू ठिकाणे आहेत.महाराष्ट्रात साडेतीन शक्तिपीठे आहेत.आपल्याला याठिकाणी किंवा मंदिरात दर्शनासाठी गेल्यावर आल्हाददायक, उत्साहकारक, चांगला अनुभव येतो तो या चैतन्य लहरी मुळे. कारण याठिकाणी चैतन्य प्रसारित होत असते. विश्वातली ही ऊर्जा केंद्र आहेत. अशीच मुलाधार ते सहत्रार चक्र पर्यंत माणसात पण ऊर्जा केंद्र आहेत. पण याची अनुभूती घेण्यासाठी आपल्या आतील चेतना आणि परम चेतना यांचा मिलाप होणे आवश्यक आहे. आपला आत्मा आणि परमात्मा यांची भेट होणे आवश्यक आहे.सहजयोगात आत्मसाक्षात्कार झाला की हे तत्क्षण घटित होते. 


सहज कृषी करताना तुम्ही पारंपारिक करत आहात ती शेती करत रहा पण त्याच्या सोबतच सहज कृषी करा . सहज शेतीत काय केले जाते तर वर उल्लेख केलेल्या पंचतत्वाला चैतन्य जागृत ठेवण्याचे आवाहन केले जाते. भूमी मातेमध्ये श्री गणेश देवता तत्व स्थापित केले जाते. हे करण्याची एक पद्धत प.पू.श्री निर्मला देवी यांनी सांगतलेली आहे.ती पद्धत खालील प्रमाणे आहे. 


सर्व प्रथम शेतात एक सहज कृषी ट्रीटमेंट करावी: - ही ट्रीटमेंट एकदाच करायची असते.यामुळे परिसरात दहा किलोमीटर पर्यंत चैतन्य प्रवाहात होते.


सदर ट्रीटमेंट किमान 2 किंवा 15-20 सहजयोग्यांनी एकत्र येऊन सामूहिकपणे करावी.


1) पीक पूर्व प्रार्थना:-

सहज कृषिची सुरुवात पीक ठरविण्यापासून करावी. कोणते पीक करावे हे परम चैतन्याला प्रश्न विचारून स्वतःच्या हातावर  संतुलित थंड चैतन्य जाणवते का त्यावरून समजून घ्यावे.


2) चैतन्यमय जल  :- श्री माताजींच्या फोटो समोर भांड्यात पाणी ठेवणे.बंधन घेणे, तीन महामंत्र  घेणे आणि श्री गणेश मंत्र, श्री गणेश अथर्वशीर्ष म्हणावे. सदर चैतन्यमय झालेले जल  जास्तीच्या पाण्यात मिसळून पिकास देण्यात यावे. विहीर अथवा असलेल्या जल स्रोतात मिसळण्यात यावे.


3) चैतन्य लहरी:-

बिबियाणे,शेणखत,निंबोळी खत अशा जैविक खतास श्री गणेश मंत्र,श्री गणेश अथर्वशीर्ष म्हणून चैतन्य लहरी देणे.


4) सहज शेती ट्रीटमेंटची पूर्वतयारी :-

-ट्रीटमेंट करण्यासाठी जमिनीची निवड करावी .

-साहित्य - एका ठिकाणासाठी  3 किंवा 5 नारळ, गुलाबजल , चैतन्यमय जल , हळदी - कुंकू, अक्षता, फुले, कापूर, धूप /अगरबत्ती.

-आदल्या दिवशी 3 किंवा 5 नारळ प.पू.श्री माताजींच्या फोटोसमोर ठेवून चैतन्यमय करणे - शेंडी असलेले, शक्यतो नारळाचे तीनही डोळे उघडे करून श्री माताजींच्या फोटो समोर ठेवावेत, बंधन घेऊन तीन महामंत्र घ्यावेत, श्री गणेश मंत्र , श्री पंचतत्व मंत्र ,श्री गणेश अथर्वशीर्ष म्हणावे आणि श्री माताजींना सहज शेती ट्रीटमेंटसाठी नारळ व्हायब्रेट करण्यात यावेत असे आवाहन करावे. पंचतत्वास आवाहन /प्रार्थना करून सहज शेतीचा संकल्प करावा.


तुम्ही एकतर 3 नारळ ट्रीटमेंट करू शकता किंवा 5 नारळ ट्रीटमेंट करू शकता.


-3 नारळ ट्रीटमेंट करायची असल्यास शेतात एक ते दीड फूट खोल खड्डा करावा आणि त्याच ठिकाणी खालील ट्रीटमेंट पूर्ण करावी.


-5 नारळ ट्रीटमेंट करायची असल्यास निवडलेल्या प्लॉटवर 4 कोपऱ्यात 4 आणि मध्यभागी 5 वा असे एक ते दीडफूट खोलीचे  5 खड्डे तयार करावेत.

-सर्व पूर्व तयारी अगोदर शेतात आणि घरी करावी.


5) शेतात श्री गणेश तत्व, पंचतत्व जागृत करणे :- तसं पाहिलं तर शेतात श्री गणेश देवतेची स्थापना करणे म्हणजे एकप्रकारे शेतात श्री गणेश देवतेची प्राण प्रतिष्ठा केल्यासारखेच आहे.

-वरील सर्व साहित्य शेतात घेऊन जावे.


-3 नारळ ट्रीटमेंट करायची असल्यास तयार खड्डयाजवळ जमावे आणि तिथेच खालील मंत्र म्हणून ट्रीटमेंट पूर्ण करावी.


-5 नारळ ट्रीटमेंट करणार असाल तर प्लॉट वरील कोपऱ्यातील कोणत्याही एका खड्डयाजवळ जमावे . बंधने घ्यावीत आणि सर्वांनी खालील मंत्र म्हणावेत.

-तीन महामंत्र,

-श्री गणेश देवता,

श्री ग्रामदेवता,

-श्री शाकंभरी देवता,

-श्री ऋतंभरा प्रज्ञा,

-श्री पंच महाभूत देवता,

-सर्व राक्षस मार्दिनी,

-सर्व ताप हारिणी,

-राक्षस अग्नी 

-श्री निसर्ग देवता,


-मंत्र म्हणत असताना खड्ड्यात

गुलाब जल,

चैतन्यमय जल,

हळद, कुंकू, अक्षता,

फुले, अर्पण करावीत.

कापूर, धूप / अगरबत्ती लावावी आणि 3 नारळ खड्ड्यात अर्पण करून खड्डा मातीने बुजवावा. 


-5 नारळ ट्रीटमेंट करणार असाल तर कोणत्याही एका खड्ड्यापासून सुरुवात करावी.प्रत्येक खड्ड्यातील नारळ अर्पण करून खड्डा मातीने बुजवावा.


खालील संकल्प सोडावा :- श्री माताजींना आवाहन - " परम पूज्य श्री माताजी आपल्या परम कृपेत, आपल्या आशीर्वादाने आम्ही सहज शेतीसाठी या शेताची निवड केली आहे. श्री माताजी आपले दैवी चित्त या शेतावर येऊ द्यावे . या जमिनीत श्री गणेश देवता तत्व जागृत होऊ द्यावे, या शेतातील आणि परिसरातील पंचतत्व जागृत करावे अशी आपल्या चरणी नम्र प्रार्थना. या जमिनीत परमेश्वरी, परमात्म्याचे परम चैतन्य प्रवाहित होऊ द्यावे . या ठिकाणी घेतल्या जाणाऱ्या पिकांना आपले संरक्षण प्राप्त होऊ द्यावे . या शेतातील मातीची नैसर्गिक गुणवत्ता वाढून पिकाची उत्पादकता वाढू द्यावी . येथील विहीर,पाणी, पिके, पाणी वितरण यंत्रणा, लिफ्ट,लाईटची सुविधा, मनुष्यबळ, इ. यांना लोकांचा उपद्रव, चोरी , पिकांचे आजार आणि नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण प्रदान करावे. इथला कष्टकरी, शेतकरी यांना सुखी, समाधानी ठेवावे आणि आर्थिक दृष्ट्या समृद्ध करावे अशी प्रार्थना आम्ही सहजयोगी आपल्या पवित्र, पावन चरणा वरती करीत आहोत. श्री माताजी या प्रार्थनेचा आपण स्वीकार करावा आणि आम्हाला चैतन्यमय आशीर्वाद द्यावेत अशी नम्र प्रार्थना."


5 नारळ ट्रीटमेंट मध्ये पहिल्या खड्ड्यापासून सर्वांनी प्लॉटवर क्लॉकवाईज चालायला सुरुवात करावी. चालताना सर्वांनी श्री गणेश अथर्वशीर्ष म्हणावे. चालताना एक हात पंचतत्वाकडे आणि दुसऱ्या हाताने शेताला चैतन्य द्यावे. 2 रा,3 रा, मधला 4था,5 वा खड्डा करत प्रत्येक खड्ड्यात एक नारळ पुरावा आणि शेवटी 1 ल्या खड्ड्याजवळ यावे.


6) पहिल्या खड्ड्याजवळ येऊन श्री माताजींचे, पंचतत्वाचे आभार व्यक्त्त करावेत.


"परम पूज्य श्री माताजी आज आपण आमच्या शेतात श्री गणेश देवता तत्व स्थापित केले आहे. पंचतत्व चैतन्याने जागृत केली आहेत. हे संपूर्ण शेत आणि परिसर चैतन्यमय केले आहे, याबद्दल आम्ही सहजयोगी आपले हृदयापासून आभारी आहोत. श्री माताजी आपणच कर्ता, करविता आणि भोक्ता आहात. या ठिकाणी येणाऱ्या पिकास आपले विशेष आशीर्वाद प्राप्त होऊ द्यावे. येथील दर्जेदार उत्पादने योग्य ग्राहकांपर्यंत  पोहचू द्यावी आणि या पिकांच्या प्रत्येक ग्राहकांस, लाभधारकास आपण सहजयोगी बनवावे . श्री माताजी आपल्या पवित्र, पावन चरणावरती आमचे कोटी कोटी प्रणाम."


संवरक्षणासाठी प्लॉटला सात वेळा चैतन्याने क्लॉकवाईज बंधने द्यावीत.


7) *महत्वाचं* -

सहज कृषित परम चेतना शक्ती, चैतन्य लहरी यांना अनन्यसाधारण महत्व आहे. पीक,विहिरीतील पाणी,शेता शेजारील तलाव, धरणातील पाणी, जमीन, उपयोगी साधनास श्री गणेश मंत्र, श्री गणेश अथर्वशीर्ष म्हणत वेळोवेळी चैतन्य द्यावे .

-जिथे कुठे श्री माताजींच्या पूजेस जाल तेथून श्री गणेश पूजनच्या वेळचे श्री चरणाचे तीर्थ मिळवावे . ते विहरीत मिक्स करावे .

-घरी श्री माताजी समोर व्हायब्रेटेड वॉटर तयार करावे . ते इतर पाण्यात मिसळून शेतात वापरावे .

-व्हायब्रेटेड वॉटर विहिरीत टाकावे किंवा व्हेचुरी मधून पिकास पाठवावे .

-स्प्रे करायचे झाल्यास त्यात व्हायब्रेटेड पाणी वापरावे.

-पिकास वेळोवेळी चैतन्य द्यावे .

-सहज कृषित श्री माताजींना केलेल्या प्रार्थना फार प्रभावी कार्य करतात.

-शक्यतो गावरान बीज मिळवा आणि शेतात पेरा.

-पिकास आजार किंवा कोणतेही मानवी अथवा नैसर्गिक संकट आले तर श्री माताजींना प्रार्थना करावी . 

-निर्माल्य शेतात टाकावे.

-शेवटी पंचतत्व आणि  परम चैतन्यच सर्व काही करत आहे हे माहित असावे.


सहजकृषीत तुम्ही प्रार्थना केल्याप्रमाणे रिझल्ट्स येतात असा सहजकृषी करणाऱ्या शेतकऱ्यांचा अनुभव आहे.


श्री माताजी असे सांगतात की कृषी हा शब्द श्री कृष्णा पासून आलेला आहे. आपले भाग्य की आपल्याला कृषिची सेवा करायची संधी मिळत आहे.


संकलक,लेखक...

योगीराज देवकर.

Motivation Academy.

नवा गडी नवं राज्य

 निर्मला फार्म- भाग पंधरा - वाटेकरी पहिला अपात्र पळाला आणि दुसरा पात्र मिळाला.


एक लाख रुपये उचल, येण्याचा प्रवास खर्च, अग्रीमेंटचा खर्च, दीड महिन्यात घरखर्चासाठी पुन्हा उचल इतकं सगळं घेऊनही राजेंद्र बजरंग लोंढे हा वाटेकरी पळाला म्हणजे कसलीही पूर्व सूचना न देता काम सोडून निघून गेला आहे. या लोंढे बद्दल मी निर्मला फार्म,भाग एक मध्ये किती चांगले वर्णन लिहले होते ते तुम्ही वाचलेले आहे. माझा भाचा मनोज पाटीलच्या माहितील माणूस म्हणून मी त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवला ही चूक झाली.राजेंद्रचा करार करण्यापूर्वी त्याची खरी माहिती काढण्यात मी कमी पडलो. मधुकर भोसले, चांडगाव, यांच्याकडून हाच राजेंद्र सहा महिन्यात पळून गेला होता, त्यांनी मला राजेंद्र हा वाटेकरी म्हणून अयोग्य माणूस आहे , तो सहा महिन्यात पळून जाईल असे सांगितले होते. पण मनोज पाटीलने  मला या सूचनेकडे दुर्लक्ष करा सांगितले होते. 

आता वाचा वस्तुस्थिती. 


कसलंही व्यसन नाही म्हणणारा हा प्राणी सकाळी उठल्यानंतर पहिला गावात दारू प्यायला जात होता. घर खर्चासाठी घेतलेले पैसे जुगार आणि मटका खेळायला लावत होता. थोड्याच अवधीत त्याने गावातल्या अयोग्य लोकांची संगत केली. तो शेतात कमी आणि बाहेरच बोंबलत फिरायचा. त्याच्या बायकोने शेतातले एकही काम धड केले नाही. एकच महिन्यानंतर त्याने प्लॅन करून बायको, मुलं गावी पाठवून दिली. आज येतील, उद्या परत येतील असे खोटं सांगत राहिला. तो धाधांत खोटे बोलायचा. कधी तो आजारी आहे म्हणून उचल मागायचा, तर एकदा वडील आजारी आहेत, आठ, दहा दिवसात कधीही मरतील, त्यांना दवाखान्यात भरती करायचे आहे, त्यांचा शेवट तरी चांगला व्हावा,तेव्हा त्यांच्या उपचारासाठी मला अजून उचल द्या म्हणून माझ्या मागे लागला होता. पण तोपर्यंत त्याचे बरेच प्रताप मला समजले होते. वडील वैरागला दवाखान्यात भरती केले आहेत म्हणून माझ्याकडून थोडे पैसे घेऊन तो गावी गेला. आता मात्र मी माझ्या भाच्याकडून माहिती घेतली आणि राजेंद्रच्या आईला फोन लावून परिस्थिती समजून घेतली. राजेंद्रने आईला माझा फोन आला तर काय खोटे बोलायचे हे  न शिकवल्यामुळे त्याचे बिंग फुटले. नाहीतर त्याच्या आईने पण नवरा ऍडमिट असल्याचे खोटे नाटक रंगविले असते.या खोट्यात त्याचे सगळे कुटुंब सामील होते. त्याचा मोबाईल मुलीने उचलला तर रॉंग नंबर सांगायची.त्याचे वृद्ध वडील घरात निट असताना केवळ पैशासाठी हा उलट्या काळजाचा माणूस वडिल शेवटच्या घटका मोजत असल्याचे सांगत होता. त्याने गावातील एकाजणाची मोटरसायकल अर्धे पैसे देवून विकत घेतली, उरलेले पैसे न देताच ती गाडी घेऊन हा गडी पसार झाला आहे. शेवटी माझा ऊस आणि इलेक्ट्रिक मोटर दोन्ही जाळले. असे विचारांचे दारिद्र असेल तर माणूस गरीबच राहणार हे वेगळं सांगायची गरज नाही.


इथून पळाल्यानंतर राजेंद्र बार्शी तालुक्यात एका शेतकऱ्याकडे राहणार होता. त्याच्यांकडून त्याला एक लाख उचल मिळणार होती. त्या शेतकऱ्याने याला प्रथम पन्नास हजारचा चेक दिला. मनोजने त्याच्याकडून हे पैसे मला मिळवून दिले. त्याला उरलेले पन्नास हजार पंधरा दिवसांनी मिळणार होते. पण पहिला चेक घेतल्यानंतर हा पठ्ठया त्या शेतकऱ्याकडे कामाला गेलाच नाही. म्हणजे त्याने त्या शेतकऱ्याला पण पन्नास हजाराला टोपी घातली आहे.


आता त्याने अजून एक नवा शेतकरी शोधला आहे. तो त्याला पाऊणेदोन लाख उचल देणार होता . ती उचल मिळाल्यानंतर मनोज मार्फत मला माझे उर्वरित पैसे मिळणार होते. तिथे  इसार पैसे घेऊन हा प्राणी पसार झाला आहे. अजून हा भामटा राजेंद्र लोंढे काय काय बनवाबनवी करेल याचा नेम नाही. 


तीन महिने झाले त्याच्याकडुन मला पन्नास हजार मिळालेले नाहीत. कायदेशीर करार असल्यामुळे मी त्याच्यावर दावा दाखल करू शकतो पण लोंढेच्या गावचे सोसायटीचे अध्यक्ष, मनोज पाटील मला माझे पैसे मिळवून द्यायला मदत करत असल्यामुळे मी निर्धास्त आहे. 


राजेंद्र लोंढेची आणि या प्रकारच्या मजुरांची वर्तणूक पाहुन माझा माणुसकी वरचा विश्वास उडत चालला आहे . इतकी बेजबाबदार, बेफिकीर, स्वार्थी, ढोंगी माणसे कशी काय असू शकतात ते कळत नाही.असो! आलीया भोगाशी असावे सादर.


नवा गडी, नवं राज्य.

24 जून 2024 पासून पुढील दहा वर्षाचा करार करून श्री पोपट नवनाथ दळवी. रा. बाभुळगांव, ता. माळशिरस, जि. सोलापूर हे त्यांची पत्नी वर्षा सह माझ्या शेतावर नवा वाटेकरी म्हणून रुजू झाले आहेत . त्यांना दोन मुलगे आहेत तनिष्क आणि प्रणव. दोघेही शिक्षण घेत आहेत. दळवी यांना सत्तर हजार उचल दिली आहे. राजेंद्रने दिलेल्या वाईट अनुभवामुळे एकदा दूध पोळले की माणूस ताक सुद्धा फुंकून पितो तसे माझे झाले आहे. त्यामुळे हा पोपट चांगला वागत आहे तरी मला चांगला अनुभव देईल का असा विचार मनात येणे स्वाभाविक आहे .


पोपट शेतावर आल्यापासून त्यांनी सात एकर खोडवा ऊसाला तणनाशक फवारणे, बारा एकर ओपन प्लॉटला तणनाशक फवारणे,दोन एकर तूर बियाणे डोबणे, आठ एकर ऊस लागणीत ऊसाच्या कांड्या औषधी मिश्रणात बुडवून ऊस लागवड करणाऱ्या टोळीला मदत करणे,ऊस पिकाला पाणी देणे, नव्या ऊस लागणीच्या शेतात बांधावर आणि रस्त्यावर तणनाशक फवारणे,सोयाबीनचे वाफे तयार करणे, खोडवा, सुरु ऊसाला खते टाकणे आणि बांधणीस मदत करणे, नव्या ऊस लागणीत तणनाशक फवारणे,ऊसातील गवत काढणे,केळी लागवडीत मदत करणे, केळी रोपांची देखभाल करणे, अशी कामे स्वतः आणि इतरांच्या मदतीने अपेक्षित वेळेत पूर्ण केली आहेत. जेमतेम चौथी शिकलेला हा माणूस (पोपट) नावाप्रमाणेच गोड गोड बोलतो. ते शेतीची, पिकांची, औषधांची माहितीअसलेले ,

कष्टाळू,मेहनती आहेत असे आढळते. हा माणूस जर टिकला तर चांगले काम करेल असे त्यांच्या वागण्या बोलण्यातून  आणि धावपळीतून जाणवत आहे. 


पोपट दळवी यांच्याकडे गावी स्वतःची थोडीफर प्रॉपर्टी आहे. तीपण भावाभावांच्या वादात. यांना पाच दहा हजार रक्कम उसनी हवी असेल तर त्यांचे कुटुंबातले लोक त्यांना द्यायला तयार नव्हते .सुरुवातीस त्यांचा नातेवाईक त्यांना जामीनदार रहायला तयार नव्हता. यालाच व्यवहारिक भाषेत माणसाची पत नसणे असे म्हणतात. मी प्रशिक्षण कार्यक्रमात नेहमी सांगतो की, पत ही घरापासून सुरु होते. घरातले,मित्र, गावातले, लोकं तुम्हाला पैसे द्यायला तयार नसतात आणि तुम्हाला वाटते बँकेने तुम्हाला कर्ज द्यावे. आपण व्यायाम करून जशी तब्बेत कमावतो तशी स्वतःची पत सचोटीने वागून, कार्यक्षमता वापरून कमवावी लागते.पत, प्रतिष्ठा कमवायला फार काळ लागतो, घालवायला थोडा वेळ  पुरेसा असतो . माणसाने होतकरू असावे होतकरू म्हणजे काहीतरी मोठं काम करायचं आहे किंवा भविष्याच्या दृष्टीने महत्वाचे, उपयुक्त असावे. असे वागले म्हणजे पत तयार होते.पण गंम्मत बघा,ज्यांना स्वतःच्या कुटुंबातले,नात्यातले, मित्र आर्थिक मदत करत नाहीत त्यांना अनोळखी शेतकऱ्याने पन्नास हजार, एक लाख उचल द्यावी असे वाटते.अडी अडचणीला मदतीला उभे रहावे असे वाटते. का?  गरज फक्त शेतकऱ्यालाच आहे का? बरं एखादा शेतकरी जेव्हा त्याची कोटीची जमीन आणि साधनसामग्री त्यांना उत्पादन काढण्यासाठी देतो,बिनव्याजी भांडवल पुरवितो , त्यांना अशी मदत करतो तेव्हा त्याची जाणीव यांनी ठेवायला नको का?  यापूर्वीच्या सुरेश चवरे या वाटेकऱ्यांसाठी मी आऊट ऑफ दी वे जावून बरीच मदत केली होती पण त्यांनी त्याची जाणीव ठेवली नाही. मला जशी वाटेकरी हवा ही गरज आहे तशी त्यांची पण काम हवं ही गरज हवी. टाळी एका हाताने नाही तर दोन हातांनी वाजते.  त्यामुळे गरज ही दोघांनाही समान हवी. तसं पाहिलं तर गुरख्याने गुरं राखायची सोडली म्हणून मालक गुरं पाळायची सोडत नाही. अगदी तसंच शेताचे पण आहे. जो वाटेकरी सोडून जातो त्याचीच संधी जाते.मजुरांना चांगलं वागविणारी ,

त्यांच्याशी चांगलं बोलणारी माणसं पण समाजात असतात हे या मजुरांना माहीतच नसावं. जरा चांगलं बोललं की ही माणसं डोक्यावर बसतात. या लोकांना जरा चांगला म्हटलं, जरा महत्व दिलं की, त्यांना वाटते तेच गाडी ओढत आहेत. शेत काम करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. हक्क,अधिकार आणि कर्तव्य एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. नेमून दिलेले काम,कर्तव्य केले तर त्यांचा अहंकार वाढायची गरज नाही.काम करणे हे त्यांच्या रोलचा भाग आहे. आमच्या शेतावर वाटेकऱ्याला पूर्ण स्वातंत्र्य आहे. स्वातंत्र्य आणि जबाबदारी यापण एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. अधिकार व कर्तव्य. स्वातंत्र्य व जबाबदारी या दोन बाबी जरी पोपट ने पाळल्या तरी ते फार चांगले काम करतील. पोपट यांच्या वाटेकरी करारास  अशोक साळवे,भावडी हे जामीनदार राहिले आहेत.अजून एक जमेची बाजू म्हणजे पोपट दळवी माझे सहजयोगी बंधू डॉक्टर चेतन पराडे यांचा गाववाला आहे आणि चेतनचे पोपट बद्दलचे मत सकारात्मक आहे.ते अधून मधून पोपट बद्दल चौकशी करत असतात. 


पोपट यापूर्वी शेतमजूर राहिलेला आहे. त्यांना आठवड्याला पगार घ्यायची आणि खर्चायची सवय होती.त्यांना आता ती सवय मोडावी लागेल.त्यांना आता महिन्याला ऍडव्हान्स मिळतो. त्यांनी आता स्वतःमध्ये काही बदल करणे आवश्यक आहे. इथून पुढची दहा वर्षें 2024 -25 ते 2034-35  हा फार मोठा कालावधी आहे . दहा वर्षें याच शेतावर टिकून रहायचा निर्णय, निर्धार त्यांना करावा लागेल . ऊस आणि केळी ही आमची नगदी पिके असणार आहेत त्यात ऊस एकरी किमान 70 ते 80 आणि केळी एकरी किमान 34 ते 35 टन उत्पादन घेण्याची आशा,आकांक्षा बाळगायला पाहिजे. शेतातले काम भले आणि आपण भले. त्यांनी हे शेत,पिके,काम आणि शेतमालक यांच्याशी एकनिष्ठ रहायला हवे, निष्ठा बाळगायला पाहिजे,निरव्यसनी, प्रामाणिक रहायला पाहिजे .त्यांना उत्पादन विक्री झाल्यावर त्यांचा वाटा मिळणार आहे, यासाठी पिकानुसार सहा महिने,वर्ष, दीड वर्ष लागते. त्यांना मी घर खर्चासाठी दरमहा पैसे देत आहे,शिवाय मजुरांवर वेळोवेळी होणारा खर्च देणार आहे. शेतकरी कर्ज काढून हे खर्च भागवीत असतो आणि वाटेकऱ्याला मात्र बिनव्याजी पैसे पूरवीत असतो. त्यामुळे त्यांना काटकसरीने संसार करण्याची शिस्त लावावी लागेल. ज्या कारणासाठी पैसे घेतले ते त्याच कारणासाठी वापरण्याची आर्थिक शिस्त लावावी लागेल . यावर्षी शेतीसाठी आकाश जाधव हे नातेवाईक मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेती करावी लागेल. या नवरा बायकोला हे शेत स्वतःचे आहे असे समजून मेहनत करावी लागेल.मेहनतीला पर्याय नाही. या पाच-सहा गोष्टी जर त्यांनी पाळल्या तर यश आणि पैसा निश्चित मिळणार आहे.


सदर शेती कार्यक्षम पद्धतीने करण्यासाठी राजेंद्र लोंढे अपात्र, अयोग्य होता आणि पोपट दळवी पात्र,योग्य असावा त्यामुळे परमेश्वरानेच हा बदल केला असावा असे मी मानतो. शेवटी जे होते ते भल्यासाठी होते असे म्हणतात ते खरे ठरावे. 


लेखक...

योगीराज देवकर.

Motivation Academy.