निर्मला फार्म - भाग सोळा -सहजयोग करणाऱ्या शेतकऱ्यांनी सहज कृषी(शेती)करावी .
सूचना :- हा लेख सहजयोग करणारे सहजयोगी शेतकरी आणि सहजयोग न करणारे पण सहजयोगाबद्दलचे कुतूहल असणारे संभाव्य सहजयोगी यांना नजरेसमोर ठेवून लिहला आहे.काही कमी लिहले असेल तर यात भर घाला आणि काही जास्त लिहले असेल तर ते कमी करा.
तुम्हाला रासायनिक शेती, शेंद्रीय शेती, नैसर्गिक शेती प्रकार माहित असतील. आता समजून घेऊया प.पू.श्री माताजी निर्मला देवी यांनी सांगितलेली सहज कृषी(शेती).
या विश्वाची निर्मिती पाच घटकापासून झाली आहे हे आपण जाणतो . भूमी,जल,अग्नी,वायू,आकाश हे पाचही घटक आपल्याला दृष्य स्वरूपात दिसतात. असे म्हटले जाते की, मानव हा या विश्वाची अतिशय छोटी पण हुबेहूब आवृत्ती आहे.कारण मानव पण याच पाच घटकांनी बनलेला आहे. जे या विश्वात आहे ते मानवात आहे आणि जे मानवात आहे ते विश्वात आहे. म्हणूनच म्हटले जाते,' यथा पिंडी तथा भ्रमांडी.' महत्वाचे आहे ते म्हणजे हा माणूस विश्वाशी जोडला गेलेला असला पाहिजे.
मानवाचे शरीर आणि त्याचा आत्मा, चेतना या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. अगदी तसच विश्व आणि या विश्वाचा परमात्मा, परम चेतना या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. शरीरात आत्मा, चेतना असेल तर शरीर सजीव आहे अगदी तसच भूमी, जल,अग्नी,वायू, आकाश यात परमात्मा,परम चेतना असेल तर तेही सजीव आहे. याचाच अर्थ परमात्मा, परम चेतना, Cosmic Energy ही विश्वाला सजीव ठेवणारी ऊर्जा आहे. विश्व ही एक जिवंत गोष्ट आहे आणि त्याचे चलन वलन परम चेतना,परम चैतन्य करत असते.यालाच आध्यात्मात चैतन्य ऊर्जा असे म्हटले जाते.
प.पू.श्री माताजी निर्मला देवी ह्या सहजयोग्यांच्या गुरुस्थानी आहेत आणि त्यांनी प्रत्येक सहजयोग्याला स्वतःचा गुरु बनविलेले आहे. श्री माताजींनी सहजयोग स्थापन केलेला आहे आणि साधकांना सत्याचा ज्ञानमार्ग दाखविला आहे. सहजयोग खूप मोठा आहे आणि सहज कृषी हा सहजयोगाचा एक भाग आहे. श्री माताजींनी सहज कृषिची अनेकदा महती सांगितली आहे. त्यांनी स्वतः राहुरी कृषी विद्यापीठात तीन नारळ ट्रीटमेंट केली होती. या ट्रीटमेंटमुळे तिथे सूर्यफूल, गहू, तांदूळ याचे भरघोस उत्पादन मिळाले होते.
डॉ हमीद मायलेनी या परदेशी सहजयोग्याने पाणी याविषयावर PhD केली आहे. पाण्याला चैतन्य दिले तर त्याचा पीएच बदलतो हे त्यांनी सप्रमाण सिद्ध केले आहे. सहज कृषी ही एक शास्त्रीय पद्धत आहे. सहजयोगात साधकाला आत्मसाक्षात्कार दिला जातो. त्यामुळे त्याची कुंडलिनी शक्ती जागृत होते आणि त्याला तळहातावर, बोटावर, टाळूवर थंड किंवा गरम चैतन्य लहरी जाणवायला लागतात. याचाच अर्थ तो परम शक्तीशी कनेक्ट होतो. हेच ते चैतन्य सहज कृषित महत्वाची भूमिका बजावते.
विश्व ही जिवंत क्रिया आहे. विश्वात या क्षणाला भूमीवर कुठे भूकंप,भूसखलन होत आहे. जल बाबत कुठे भरती,
ओहोटी,सुनामी,पूर येत आहे. अग्नी कुठे ज्वालामुखी,उष्णता, आग ओखत आहे. वायुमुळे कुठे वादळ,वारे सुरु आहे.तर आकाशात कुठे काहीतरी बदलाच्या घटना घडत आहेत.पृथ्वी स्वतःभोवती फिरत आहे, सूर्याभोवती फिरत आहे. हे सर्व पंचतत्व सजीव असल्याचेच द्योतक आहे. या विश्वाच्या निर्मिती,भरणपोषण,नाश करण्यामागे कोणतीतरी अदृश्य शक्ती कार्यरत आहे असे आपण मानतो , जाणतो . याला कोण दैवी शक्ती म्हणते , तर कोण याला निसर्ग असे म्हणेल. परंतु पंचमहाभूताच्या या महानतेमुळेच मानवासाठी ही पाच तत्व म्हणजे भूमी देवता, जल देवता, अग्नी देवता, वायू देवता, आकाश देवता अशी देवतास्वरूप आहेत आणि आपण यांची पूजा पण करतो.
महाराष्ट्रात स्वयंभू अष्टविनायक आहेत. तसेच देशविदेशातही उलुरू सारखी स्वयंभू ठिकाणे आहेत.महाराष्ट्रात साडेतीन शक्तिपीठे आहेत.आपल्याला याठिकाणी किंवा मंदिरात दर्शनासाठी गेल्यावर आल्हाददायक, उत्साहकारक, चांगला अनुभव येतो तो या चैतन्य लहरी मुळे. कारण याठिकाणी चैतन्य प्रसारित होत असते. विश्वातली ही ऊर्जा केंद्र आहेत. अशीच मुलाधार ते सहत्रार चक्र पर्यंत माणसात पण ऊर्जा केंद्र आहेत. पण याची अनुभूती घेण्यासाठी आपल्या आतील चेतना आणि परम चेतना यांचा मिलाप होणे आवश्यक आहे. आपला आत्मा आणि परमात्मा यांची भेट होणे आवश्यक आहे.सहजयोगात आत्मसाक्षात्कार झाला की हे तत्क्षण घटित होते.
सहज कृषी करताना तुम्ही पारंपारिक करत आहात ती शेती करत रहा पण त्याच्या सोबतच सहज कृषी करा . सहज शेतीत काय केले जाते तर वर उल्लेख केलेल्या पंचतत्वाला चैतन्य जागृत ठेवण्याचे आवाहन केले जाते. भूमी मातेमध्ये श्री गणेश देवता तत्व स्थापित केले जाते. हे करण्याची एक पद्धत प.पू.श्री निर्मला देवी यांनी सांगतलेली आहे.ती पद्धत खालील प्रमाणे आहे.
सर्व प्रथम शेतात एक सहज कृषी ट्रीटमेंट करावी: - ही ट्रीटमेंट एकदाच करायची असते.यामुळे परिसरात दहा किलोमीटर पर्यंत चैतन्य प्रवाहात होते.
सदर ट्रीटमेंट किमान 2 किंवा 15-20 सहजयोग्यांनी एकत्र येऊन सामूहिकपणे करावी.
1) पीक पूर्व प्रार्थना:-
सहज कृषिची सुरुवात पीक ठरविण्यापासून करावी. कोणते पीक करावे हे परम चैतन्याला प्रश्न विचारून स्वतःच्या हातावर संतुलित थंड चैतन्य जाणवते का त्यावरून समजून घ्यावे.
2) चैतन्यमय जल :- श्री माताजींच्या फोटो समोर भांड्यात पाणी ठेवणे.बंधन घेणे, तीन महामंत्र घेणे आणि श्री गणेश मंत्र, श्री गणेश अथर्वशीर्ष म्हणावे. सदर चैतन्यमय झालेले जल जास्तीच्या पाण्यात मिसळून पिकास देण्यात यावे. विहीर अथवा असलेल्या जल स्रोतात मिसळण्यात यावे.
3) चैतन्य लहरी:-
बिबियाणे,शेणखत,निंबोळी खत अशा जैविक खतास श्री गणेश मंत्र,श्री गणेश अथर्वशीर्ष म्हणून चैतन्य लहरी देणे.
4) सहज शेती ट्रीटमेंटची पूर्वतयारी :-
-ट्रीटमेंट करण्यासाठी जमिनीची निवड करावी .
-साहित्य - एका ठिकाणासाठी 3 किंवा 5 नारळ, गुलाबजल , चैतन्यमय जल , हळदी - कुंकू, अक्षता, फुले, कापूर, धूप /अगरबत्ती.
-आदल्या दिवशी 3 किंवा 5 नारळ प.पू.श्री माताजींच्या फोटोसमोर ठेवून चैतन्यमय करणे - शेंडी असलेले, शक्यतो नारळाचे तीनही डोळे उघडे करून श्री माताजींच्या फोटो समोर ठेवावेत, बंधन घेऊन तीन महामंत्र घ्यावेत, श्री गणेश मंत्र , श्री पंचतत्व मंत्र ,श्री गणेश अथर्वशीर्ष म्हणावे आणि श्री माताजींना सहज शेती ट्रीटमेंटसाठी नारळ व्हायब्रेट करण्यात यावेत असे आवाहन करावे. पंचतत्वास आवाहन /प्रार्थना करून सहज शेतीचा संकल्प करावा.
तुम्ही एकतर 3 नारळ ट्रीटमेंट करू शकता किंवा 5 नारळ ट्रीटमेंट करू शकता.
-3 नारळ ट्रीटमेंट करायची असल्यास शेतात एक ते दीड फूट खोल खड्डा करावा आणि त्याच ठिकाणी खालील ट्रीटमेंट पूर्ण करावी.
-5 नारळ ट्रीटमेंट करायची असल्यास निवडलेल्या प्लॉटवर 4 कोपऱ्यात 4 आणि मध्यभागी 5 वा असे एक ते दीडफूट खोलीचे 5 खड्डे तयार करावेत.
-सर्व पूर्व तयारी अगोदर शेतात आणि घरी करावी.
5) शेतात श्री गणेश तत्व, पंचतत्व जागृत करणे :- तसं पाहिलं तर शेतात श्री गणेश देवतेची स्थापना करणे म्हणजे एकप्रकारे शेतात श्री गणेश देवतेची प्राण प्रतिष्ठा केल्यासारखेच आहे.
-वरील सर्व साहित्य शेतात घेऊन जावे.
-3 नारळ ट्रीटमेंट करायची असल्यास तयार खड्डयाजवळ जमावे आणि तिथेच खालील मंत्र म्हणून ट्रीटमेंट पूर्ण करावी.
-5 नारळ ट्रीटमेंट करणार असाल तर प्लॉट वरील कोपऱ्यातील कोणत्याही एका खड्डयाजवळ जमावे . बंधने घ्यावीत आणि सर्वांनी खालील मंत्र म्हणावेत.
-तीन महामंत्र,
-श्री गणेश देवता,
श्री ग्रामदेवता,
-श्री शाकंभरी देवता,
-श्री ऋतंभरा प्रज्ञा,
-श्री पंच महाभूत देवता,
-सर्व राक्षस मार्दिनी,
-सर्व ताप हारिणी,
-राक्षस अग्नी
-श्री निसर्ग देवता,
-मंत्र म्हणत असताना खड्ड्यात
गुलाब जल,
चैतन्यमय जल,
हळद, कुंकू, अक्षता,
फुले, अर्पण करावीत.
कापूर, धूप / अगरबत्ती लावावी आणि 3 नारळ खड्ड्यात अर्पण करून खड्डा मातीने बुजवावा.
-5 नारळ ट्रीटमेंट करणार असाल तर कोणत्याही एका खड्ड्यापासून सुरुवात करावी.प्रत्येक खड्ड्यातील नारळ अर्पण करून खड्डा मातीने बुजवावा.
खालील संकल्प सोडावा :- श्री माताजींना आवाहन - " परम पूज्य श्री माताजी आपल्या परम कृपेत, आपल्या आशीर्वादाने आम्ही सहज शेतीसाठी या शेताची निवड केली आहे. श्री माताजी आपले दैवी चित्त या शेतावर येऊ द्यावे . या जमिनीत श्री गणेश देवता तत्व जागृत होऊ द्यावे, या शेतातील आणि परिसरातील पंचतत्व जागृत करावे अशी आपल्या चरणी नम्र प्रार्थना. या जमिनीत परमेश्वरी, परमात्म्याचे परम चैतन्य प्रवाहित होऊ द्यावे . या ठिकाणी घेतल्या जाणाऱ्या पिकांना आपले संरक्षण प्राप्त होऊ द्यावे . या शेतातील मातीची नैसर्गिक गुणवत्ता वाढून पिकाची उत्पादकता वाढू द्यावी . येथील विहीर,पाणी, पिके, पाणी वितरण यंत्रणा, लिफ्ट,लाईटची सुविधा, मनुष्यबळ, इ. यांना लोकांचा उपद्रव, चोरी , पिकांचे आजार आणि नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण प्रदान करावे. इथला कष्टकरी, शेतकरी यांना सुखी, समाधानी ठेवावे आणि आर्थिक दृष्ट्या समृद्ध करावे अशी प्रार्थना आम्ही सहजयोगी आपल्या पवित्र, पावन चरणा वरती करीत आहोत. श्री माताजी या प्रार्थनेचा आपण स्वीकार करावा आणि आम्हाला चैतन्यमय आशीर्वाद द्यावेत अशी नम्र प्रार्थना."
5 नारळ ट्रीटमेंट मध्ये पहिल्या खड्ड्यापासून सर्वांनी प्लॉटवर क्लॉकवाईज चालायला सुरुवात करावी. चालताना सर्वांनी श्री गणेश अथर्वशीर्ष म्हणावे. चालताना एक हात पंचतत्वाकडे आणि दुसऱ्या हाताने शेताला चैतन्य द्यावे. 2 रा,3 रा, मधला 4था,5 वा खड्डा करत प्रत्येक खड्ड्यात एक नारळ पुरावा आणि शेवटी 1 ल्या खड्ड्याजवळ यावे.
6) पहिल्या खड्ड्याजवळ येऊन श्री माताजींचे, पंचतत्वाचे आभार व्यक्त्त करावेत.
"परम पूज्य श्री माताजी आज आपण आमच्या शेतात श्री गणेश देवता तत्व स्थापित केले आहे. पंचतत्व चैतन्याने जागृत केली आहेत. हे संपूर्ण शेत आणि परिसर चैतन्यमय केले आहे, याबद्दल आम्ही सहजयोगी आपले हृदयापासून आभारी आहोत. श्री माताजी आपणच कर्ता, करविता आणि भोक्ता आहात. या ठिकाणी येणाऱ्या पिकास आपले विशेष आशीर्वाद प्राप्त होऊ द्यावे. येथील दर्जेदार उत्पादने योग्य ग्राहकांपर्यंत पोहचू द्यावी आणि या पिकांच्या प्रत्येक ग्राहकांस, लाभधारकास आपण सहजयोगी बनवावे . श्री माताजी आपल्या पवित्र, पावन चरणावरती आमचे कोटी कोटी प्रणाम."
संवरक्षणासाठी प्लॉटला सात वेळा चैतन्याने क्लॉकवाईज बंधने द्यावीत.
7) *महत्वाचं* -
सहज कृषित परम चेतना शक्ती, चैतन्य लहरी यांना अनन्यसाधारण महत्व आहे. पीक,विहिरीतील पाणी,शेता शेजारील तलाव, धरणातील पाणी, जमीन, उपयोगी साधनास श्री गणेश मंत्र, श्री गणेश अथर्वशीर्ष म्हणत वेळोवेळी चैतन्य द्यावे .
-जिथे कुठे श्री माताजींच्या पूजेस जाल तेथून श्री गणेश पूजनच्या वेळचे श्री चरणाचे तीर्थ मिळवावे . ते विहरीत मिक्स करावे .
-घरी श्री माताजी समोर व्हायब्रेटेड वॉटर तयार करावे . ते इतर पाण्यात मिसळून शेतात वापरावे .
-व्हायब्रेटेड वॉटर विहिरीत टाकावे किंवा व्हेचुरी मधून पिकास पाठवावे .
-स्प्रे करायचे झाल्यास त्यात व्हायब्रेटेड पाणी वापरावे.
-पिकास वेळोवेळी चैतन्य द्यावे .
-सहज कृषित श्री माताजींना केलेल्या प्रार्थना फार प्रभावी कार्य करतात.
-शक्यतो गावरान बीज मिळवा आणि शेतात पेरा.
-पिकास आजार किंवा कोणतेही मानवी अथवा नैसर्गिक संकट आले तर श्री माताजींना प्रार्थना करावी .
-निर्माल्य शेतात टाकावे.
-शेवटी पंचतत्व आणि परम चैतन्यच सर्व काही करत आहे हे माहित असावे.
सहजकृषीत तुम्ही प्रार्थना केल्याप्रमाणे रिझल्ट्स येतात असा सहजकृषी करणाऱ्या शेतकऱ्यांचा अनुभव आहे.
श्री माताजी असे सांगतात की कृषी हा शब्द श्री कृष्णा पासून आलेला आहे. आपले भाग्य की आपल्याला कृषिची सेवा करायची संधी मिळत आहे.
संकलक,लेखक...
योगीराज देवकर.
Motivation Academy.
No comments:
Post a Comment