Thursday 22 September, 2011

लाडक्या मेव्हुणी वर आधारित एक विडंबन

  • माझी लाडकी मेव्हुणी सौ. मेघना अबदागिरे हिच्यावर आधारीत तयार केलेले एक विडंबन. लेखक - योगिराज देवकर,
  • पात्र - सौ. मेघना, श्री. विक्रान्त, चि. आर्णव, माझी पत्नी सौ. अनिता, मेघनाचे मम्मी (सौ. सुशिला), पप्पा (श्री. बलभिमराव जाधव) आणि मी.
स्थळ: योगिराज देवकर, म्हणजे आमची सदनिका,
दिनांक: 01 ऑगस्ट 2011, वेळ: रात्री 09 ते 10 पर्यंत.
प्रसंग: जसा घडला तसा नव्हे तर विडंबनात्मक पध्दतीने. 31 जुलै 2011 रोजी रात्री 08 वाजता योगिराज देवकर म्हणजे माझा पुणे-सोलापुर हायवे वर जबरदस्त अपघात झालेला आहे. सिट बेल्ट लावलेला होता त्यामुळे सुदैवाने मी वाचलेलो.
 त्यामुळे सौ. मेघना अबदागिरे, श्री. विक्रान्त अबदागिरे आणि चि. आर्णव विक्रान्त अबदागिरे मला भेटायला आलेले होते.
येताना त्यांनी मिठास मधून छान मिठाई देखिल आणली होती.
मेघना: (दरवाजातुन आत आल्या बरोबर) काय भाऊजी, कसा झाला तुमचा अपघात?
मीः मी बोलायला सुरवात करतो.....तेवढयात.
मेघनाः आगं माई (म्हणजे अनिता) एैकलं का आर्णव ना गाणं म्हटलं की नाचायला लागतो.
      ए आर्णव.....ए आर्णव नांच ना.
      बाबाच्या बेंबित घुसलाय भुंगा!
      टांग टींग टींगा कि टांग टींग टींगा.
      टांग टींग टींगा कि टांग टींग टींगा! टुंग!
मम्मी: अग मेघना ‘बाबाच्या’ बेंबीत काय म्हणतेस, मारूती’ च्या बेंबीत असं म्हणं.
मेघना: अगं आर्णव बाबा, बाबा बोलतोना म्हणून ‘बाबा’. आपल्याला काय आर्णव नाचतोय ना.
अनिता: अगं घुसलाय काय म्हणतेस शिरलाय भुंगा असं म्हण.
मेघना: ए आपल्याला काय घुसलय काय आणि शिरलाय काय. आर्णव नाचतोय नां.
मेघना: भाऊजी, कसा झाला तुमचा अपघात?
मी: माझी गाडी ना अशी चालली होती.... तेवढयात.
मेघना: आता बघा, आता बघा ऽ ऽ ऽ ऽ आर्णव
       शेवग्याच्या झाडाला सांगा किती शेंगा!
       टांग टींग टींगा कि टांग टींग टींगा.
      टांग टींग टींगा कि टांग टींग टींगा! टुंग!
अनिता: अगं मेघना किती चुकीचे गाणं म्हणते. आंब्याच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा, असं आहे ते.
मेघना: ऐ आंब्याच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा कशा  येतील. शेवग्याच्याच झाडाला शेवग्याच्या शेंगा येतील ना.
अनिता: अगं ते विनोदी गाणं आहे ना म्हणून.
मेघना: आंब्याच्या काय अनं शेवग्याच्या काय आपल्याला कायं आर्णव नाचतोय ना.
मेघना: भाऊजी, कसा झाला तुमचा अपघात?
मी: माझी गाडी ना अशी चालली होती.... तेवढयात.
मेघना: ए आता सगळे, आता सगळे, इकडे बघा, आर्णव.
       शिवाजीच्या दाढीला केस किती सांगा!
      टांग टींग टींगा कि टांग टींग टींगा.
      टांग टींग टींगा कि टांग टींग टींगा! टुंग!
आता मात्र पप्पा (जय भवानी जय शिवाजी): ये मेघना शिवाजीच्या दाढीला नाही,
रावणाच्या दाढीला केस किती सांगा. असं गाणं आहे.
मेघना: जाऊद्या हो आपल्याला काय शिवाजी काय आणि रावण काय. दाढीवाला आहे ना. आणि आपला आर्णव नाचतोय ना.
पप्पा: मेघना रावणाच्या जागेवर महाराजांचे नांव वापरू नको.
मेघना: बरं जाऊद्या, ऽ ऽ ऽ.
मेघना: आर्णव, माझं पिल्लु, माझं कोकरू. (आता मेघनाला कोण सांगणार पिल्लु पक्षाचं, प्राण्याचं असतं आणि कोकरू शेळीचं असतं. शेवटी ती पडली इंगलिश  मिडियमची.)
मेघना: भाऊजी, कसा झाला तुमचा अपघात?
मी: माझी गाडी ना अशी चालली होती.... तेवढयात.
मेघना: आगं मम्मी, अगं माई, आर्णव ना बरेच शब्द बोलतो.
मेघना: आर्णव म्हण बाबाऽ ऽ ऽ, अेमय दादाऽ ऽ ऽ, शुभम दादाऽ ऽ ऽ.
आर्णव: बाबाऽ ऽ ऽ, दादाऽ ऽ ऽ,
मेघना: माझं वासरू, माझं शिंगरू ऽ ऽ ऽ किती गोड बोलतं.
विक्रान्त: ये मेघना, त्याला पिल्लु, कोकरू, वासरू, शिंगरू  काय पण काय म्हणतेस गं.
मेघना: ते माझं शिंगरूच आहे.
विक्रान्त: ते जर शिंगरू  असेल तर मग आपण दोघे कोण?
मेघना: जाऊ द्या हो? मज्जाऽ ऽ ऽ.
मेघना: भाऊजी, कसा झाला तुमचा अपघात?
मी: माझी गाडी ना अशी चालली होती.... तेवढयात.
मेघना: मम्मी, पप्पा तुम्हाला आर्णवचा दुस-या गाण्यावर नाच बघायचा का?
मम्मी, पप्पा: होऽ होऽ.
मेघना: आर्णव चल आता हात हालव, हात हालव.
      ढींग टिका ढींग टिका ढींग टिका हे.
      ढींग टिका ढींग टिका ढींग टिका हे.
      हे   हे   हे   हे   हे   हे  हे  हे.
      ग्यारा महिनोमें ग्यारा तरीकेसे तुझसे प्यार करूंगीरे मैं!
      ढींग टिका ढींग टिका ढींग टिका हे.
      ढींग टिका ढींग टिका ढींग टिका हे.
      हे   हे   हे   हे   हे   हे  हे  हे.
अनिता: मेघना ग्यारा महिनोमें नाही; बारा महिनो में, बारा तरीकेसे तुझसे प्यार जताऊंगी मैं! असं गाणं आहे.
मेघना: अगं माई, आर्णवचा अकरावा महिना चालू आहे ना, म्हणून ग्यारा. आता पुढच्या महिन्यात म्हणायचे बारा.
अनिता: बारा नंतर काय करणार.....
मेघना: आपल्याला काय तेरा, चौदा, पंधरा.... आपला आर्णव नाचतोय ना.
मेघना: भाऊजी, कसा झाला तुमचा अपघात?
मी: माझी गाडी ना अशी चालली होती.... तेवढयात.
मेघना: पप्पा आर्णवच्या पार्टीत मेणू काय ठेवायचा, ठरवाना.
पप्पा: मेघना तुझ्या कार्यक्रमला अजुन 50 दिवस बाकी आहेत. ठरवता येईल.
मेघना: भाऊजी तुम्ही आर्णवच्या पार्टीत ‘इव्हेंट मॅनेज’ करता का? नाहीतर तुम्ही कॉम्पेरिंग करा.
मी: अगं असली जबाबदारी आता अमेय घेईल.
मेघना: भाऊजी, कसा झाला तुमचा अपघात?
मी: माझी गाडी ना अशी चालली होती.... तेवढयात.
मेघना: आर्णव, आर्णव कंबर हालव, कंबर हालव ऽ ऽ ऽ
      ढींग टिका ढींग टिका ढींग टिका हे.
      ढींग टिका ढींग टिका ढींग टिका हे.
      हे   हे   हे   हे   हे   हे  हे  हे.
अनिता: आगं मेघना, किती चुकीच गाणं म्हणते,
            ढींग टिका ढींग टिका नाही.
            ढींक चिका ढींक चिका ढींक चिका हे, असं गाणं आहे.
मेघना: ढींग टिका काय आणि ढींक चिका काय आपला आर्णव नाचतोय ना?
 पुढं काय तर ......
मेघना: आमचा आर्णव, जय श्री माताजी कसं करतो.
विठ्ठल विठ्ठल कसं करतो. हे सर्व काही झालं.
तासाभरापुर्वी मेघना आणि विक्रान्त माझा अपघात झाला म्हणून मला भेटायला आले होते. सुदैवाने मी अपघातातुन वाचलो होतो. त्यामुळे सर्व सुखरूप होतं. अधुन मधुन पप्पा मेघनाला सुचवत होते. अग मेघना भाऊजींचा अपघात कसा झाला एैक. पण पप्पांच आणि माझं दोघांचही या टांग टींग टींगा आणि ढींग चिका ढींग पुढे काही चाललं नाही. रात्री 10च्या आसपास अबदागिरे कुटुंबिय परत गेले. परंतु शेवट पर्यंत मेघनाने माझा अपघात कसा झाला हे मात्र एैकलं नाही.
स्वगत:-‘‘पण मेघनाचे आणि विक्रान्तचे पुत्र प्रेम बघुन मला चि. अमेयचं (माझा मुलगा) लहानपण आठवले. अनितापण काही मेघना पेक्षा वेगळी वागत नव्हती. आणि मी पण काही विक्रान्त पेक्षा वेगळ वागत नव्हतो. जेव्हा मुलं लहान असतात तेव्हा त्याचे आई, वडील मुलांवर केवढं प्रेम करतात. त्यांना केवढं जपतात, त्यांना वाढवितात. ही मुलं म्हणजे त्यांना त्यांचा जिव की प्राण असतात. पुढं हे प्राण मोठे होतात आणि त्यापैकी काही आई वडीलांच्या जिवाला खुप त्रास देतात.
 पण मला असं वाटतं, मुलांनी मोठं व्हावं आणि मोठे झाल्यावर स्वतःच्या आई, वडीलां वर असेच प्रेम करावे.
 मुलाने पण म्हाता-या आई वडीलांकडे बघावे आणि म्हणावे आई, बाबा. मम्मी, पप्पा. मॉम, डॅड, नाचा......
              ढींक चिका ढींक चिका ढींक चिका हे.
              ढींक चिका ढींक चिका ढींक चिका हे.
              हे  हे  हे  हे        हे  हे  हे  हे.
              हे  हे  हे  हे        हे  हे  हे  हे.
 बारा महिनोमें बारा तरीखेसे तुमको प्यार जताऊंगा मैं.......
 असा प्रेमाचा प्रकार जर प्रत्येक आई, वडीलांच्या बाबतीतही घडला तर आयुश्य किती समाधानी होईल.’’
  आता दुस-या दिवशी सकाळी.
मेघना: (मोबाईल वर), भाऊजी, अहो तुमच्या अपघाताची सविस्तर बातमी सकाळ मध्ये वाचली. केवढया मोठया अपघातातनं तुम्ही वाचलात. (धन्य झलो मी),
         धन्यवाद!  इति विडंबन - योगिराज देवकर--