Friday 6 August, 2021

Out Bound Event.

 टीमची बांधणी करणारा Out Bound Event.


४ ऑगस्ट २०२१ रोजी Saturday Club Global Trust वाकड चाप्टरचा बहूप्रतिक्षित Out Bound Event वरसगाव धरण जलाशयाच्या किनारी सुर्या शिबीर येथे पार पडला. शेफ अक्षय दुसाने आणि लॉजिस्टिक सर्विसेसचे निलेश कुलकर्णी(चेअरमन, वाकड चाप्टर ) गेले ८-१० दिवस याच नियोजनात गुंतले होते. 


पुण्यातून वेगवेगळ्या ठिकाणावरून सकाळी पाच कार्स एक-एक मेंबरला गोळा करत निघाल्या आणि डोणज्यातल्या एका हॉटेलपाशी चहासाठी जमा झाल्या. क्लबचे लोक वेळ पाळतात हे वेगळे लिहायची गरज नाही. इथे चहा सोबत अक्षयने आणलेल्या सँडविचचा आस्वाद घेतला. एरवी सर्वांना फॉर्मल ड्रेस कोड मध्ये पहायची सवय झाली आहे. या इव्हेंटमुळे कोण बर्मुडात, कोण टी शर्ट आणि ट्रॅक पँट मध्ये होते त्यामुळे लागलीच कॅज्युअल वातावरण तयार व्हायला वेळ लागला नाही. त्यात लक्षात येणारा बदल जाणवला तो नारायण वझुरकर यांच्यात, एरवी गुरुजीच्या वेशात असलेल्या या पंडिताला स्पोर्ट वेअरच्या गणवेशात पाहून ओळखने  अवघड होते . ही प्रतिक्रिया पिरपाशा शेख पुन्हा पुन्हा देत होते आणि सगळे हसत होते .  एकूण काय तर सगळे एन्जॉयच्या मूड मध्ये होते. आपल्या प्रत्येकात एक लहान मूल दडलेले असते ते अशा प्रसंगात जास्त वर येते.


सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या या परिसराला निसर्गाचे वरदान लाभले आहे. नागमोडी रस्ते,रस्त्याच्या आजूबाजूला ओढे,नाले,नदी किंवा धरणाचा जलाशय. हिरवाईने नटलेल्या डोंगररांगा ,ढग,ऊन,पाऊस यांचा चाललेला खेळ अशा प्रसन्न वातावरणात आम्ही ठीक ९.१५ ला  सुर्या शिबीर याठिकाणी पोहोचलो.


प्रवेशाचे सोपस्कार पार पडले , नाष्टा केला आणि बरोबर दहा वाजता आम्ही औपचारिक सेशन साठी ओपन पॅव्हेलीयन सारख्या हॉलमध्ये जमा झालो होतो. निलेश कुलकर्णी यांनी सदर इव्हेंटसाठी सर्वांचे आणि स्वप्नील कुलकर्णी ( रिजन हेड, PCMC रिजन )यांचे  स्वागत केले. इव्हेंट चे प्रयोजन आणि महत्व विषद केले आणि Team building activities साठी योगीराज देवकर यांच्याकडे सूत्रे सुपूर्त केली.


योगीराज देवकर यांनी Team building साठी बऱ्याच Ice breaking fun activities घेतल्या.यामुळे एकमेकांमधील मोकळेपणा वाढणे,आपापसात एकीची भावना वाढणे,सुसंवाद निर्माण होणे,परिचय वाढून मैत्रीत रूपांतर होणे,दैनंदिन गोष्टी विसरून इव्हेंट मधील सहभाग वाढणे,इ. उद्धेश साध्य होण्यास उपयोग झाला. नूपुर जोगळेकर यांचा ऍक्टिव्हिटीज मध्ये जिंकण्याचा सिलसिला यावेळीही कायम राहिला . तेजस चव्हाण आणि शिवशंकर बिंड यांच्या आऊट ऑफ बॉक्स थिंकिंगचे सर्वांना कौतुक वाटले.


त्यानंतर योगीराज देवकर यांनी SCGT Wakad Chapter मधील प्रत्येक सदस्यात, पर्यायाने ग्रुप मध्ये,तसेच त्यांच्या स्वतःच्या उद्योगात एकमेकांना सहाय्यक ठरणारी आवश्यक ती मूल्ये आणि धारणा वाढीस लागव्यात यासाठी OCTAPACE Culture वर आधारित अगोदर प्रश्नावली आणि त्यानंतर स्कोअरिंग शीट भरून घेतले आणि नंतर त्यावर आधारित सविस्तार चर्चा करण्यात आली.


संस्कृती मध्ये समाजात एक नागरिक म्हणून आपण जे ज्ञान,धारणा, कला,शिस्त,

नैतिकता,नियम,रूढी,योग्यता आणि सवयी प्राप्त केलेल्या असतात त्यांचा समावेश होतो.


तर कोणत्याही संस्थेच्या संस्कृतीमध्ये हेच सगळे पण सामूहिक स्वरूपात आढळते यात प्रामुख्याने सामूहिक मूल्ये,सामूहिक धारणा आणि सामुहिक तत्वांचा समावेश होतो.


चांगली मूल्ये,धारणा ,तत्व यांची सुरुवात व्यक्ती, कुटुंबापासून होते आणि मग त्याचे प्रतिबिंब समाजात किंवा संस्थेत आढळते. अशा आठ संस्कृतीवर्धक मूल्यांबाबत इथे चर्चा झाली.


तीन तास चाललेल्या सेशनच्या समारोप प्रसंगी स्वप्नील कुलकर्णी यांनी पोषक विचार व्यक्त केले आणि आभार मानून ग्रुपच्या वृद्धीसाठी शुभेच्छा दिल्या.


लंच नंतर सर्वांनी परिसरात फेरफटका मारला. बंदीस्त असलेले अनेक पक्षी पाहिले.इतर सुविधा आणि वनराईचा आनंद घेतला,फोटो सेशन झाले आणि मग ज्यांना पोहायचे होते ते एक एक करून स्विमिंग टॅंक मध्ये उतरले.


यावेळी ग्रुप मध्ये शिवशंकर बींड, सतीश झणझणे, नंदकुमार कलागते हे तुलनेने नवीन सदस्य होते पण तेही अगदी अक्षय दुसाने,तेजस चव्हाण,कौस्तुभ बाबर अशा जुन्या जाणत्या(माजी CST)मेंबर्स इतकेच हिरीरीने सहभागी झाले होते. नूपुर जोगळेकर,भारती मुरकुटे,चैतन्य इंगळे,विजय नवले,रवींद्र बोराडे,या सर्वांनी ह्या इव्हेंटचा आनंद घेतला.


SCGT आणि सर्व आयोजकांचे आभार .


संध्याकाळी पाचच्या दरम्यान पावसाच्या आल्हाददायक वातावरणात गरमागरम भजी आणि चहा घेऊन आम्ही ते ठिकाण सोडले. सध्याच्या अनिश्चिततेच्या वातावरणात प्रत्येकालाच असा ब्रेक हवा होता पण यामुळे इव्हेंटला हजर असणाऱ्या १६ पैकी   प्रत्येकाला त्याच्या व्यवसायत देखील ब्रेक थ्रू मिळेल हे मात्र नक्की.

लेखक- योगीराज देवकर.

वाकड चाप्टर, सेक्रेटरी.