Thursday 1 July, 2021

कोरोना काळातील लग्नाचे आमंत्रण. एक काव्य.

 कोरोना काळातील लग्नाचे आमंत्रण


या काव्यात संत आणि सामान्य माणूस तसेच लग्नघरातील श्रीमान,श्रीमती अशी चार काल्पनिक पात्र आहेत. कोणाच्या प्रसंग अथवा घटनेशी हे जुळत असेल तर हा निव्वळ योगायोग समजावा. संत म्हणजे आध्यात्मिक मार्गाने जाणारा आणि पारमार्थिक सुख पाहणारा व्यक्ती,तर सामान्य माणूस म्हणजे चारचौघा सारखे जीवन जगणारा आणि भौतिक सुख पाहणारा व्यक्ती. श्रीमान मायक्रोअँग्रेशनची(अहंकार) शिकार,तर श्रीमती हतबलता दर्शविणारी व्यक्तीमत्व होत. समाजात आपल्या आजूबाजूला अशी नाट्ये  घडत असतात . आपण आपले डोळे,कान उघडे ठेवले की ती अनुभवास येतात. 

*काव्य*

संत असो वा सामान्य माणूस एकसारखाच स्वार्थी असतो हेच खरे.

दोघांनाही वाटते पन्नास आमंत्रितांच्या यादीत आपले नाव असेल तर बरे ।

संत सुध्दा तुला आलंय का आमंत्रण असे याला त्याला विचारात असतो.

लगीन घरातल्यांना अजून माझे नाव कसे नाही सुचले विचार करत बसतो ।।१।।

श्रीमान,श्रीमती यापैकी कोणाला बरे पुश करावे याचे चिंतन करत असतो.

श्रीमान काय, अन श्रीमती काय शेवटी रक्ताची असतात तीच आपली हे उमजतो ।

दोघांनीही जर काही इलाज नाही म्हटले तर अवघड होऊन बसेल..मग तत्पूर्वीच,

भात्यातील कोणती बरे शस्त्रे वापरावीत हे साक्षात देवालाच विचारतो ।।२।।

मी मुलीचा किंवा मुलाचा मामा असतो तर किती बरे झाले असते.

लगीन घरच्यांना ब्राह्मणानेच सांगितले असते की मामाला बोलवायचे असते ।

मुलांचा मामा नसलो म्हणून काय झाले,आण्णा,दादा सारखाच एखादा मामाही असतो.

मामा या लाभलेल्या उपाधीचा लाभ अश्यावेळी नाही तर मग कधी होणार असतो ।।३।।

फोनचा मेसेज वाजला,दुसऱ्याला फोन आला तरी पहात अथवा विचारत असतो .

अरे देवा ! मी तर अजून इथेच आहे, माझी दखल का घेत नाही म्हणून खट्टू होऊन बसतो ।

त्यापेक्षा श्रीमतीला फोनच केलेला बरा, हवा-पाण्याच्या गप्पा माराव्यात म्हणतो .

फोनवर बोलताना आमंत्रणाचे आठवणारच नाही असे कसे होईल हे तो हेरतो ।।४।।

देवाकडे नमस्कार, विनवण्या,प्रार्थना सारे काही अगदी मनोभावे करतो.

हे सगळे जगासाठी करायचे असते असे म्हणणारा यावेळी मात्र स्वतःसाठी करतो ।

संत असूनही ध्यान,झोप लागत नाही आणि सारे संतुलन गमावून बसतो .

अजून कसे फळ मिळाले नाही म्हणून चेहरा चिंताग्रस्त करून असतो ।।५।।

शेवटी एकदाची प्रार्थना लागू होते, कुटुंबप्रमुखाचा फोन येतो,मग चेहऱ्यावर लाली झळाळते .

डोळ्यात बालिश ,निरागस तेज वाढते आणि गालावर हास्याची लकेर उमटते ।

सर्वांच्या आधी मी कसे माझे तिकीट निश्चित केले याचा वेगळाच आनंद दाटतो.

कोरोनाच्या काळात हवाई प्रवासाच्या तिकिटापेक्षा याच तिकिटाची किंमत जास्त वाटते ।।६।।

जनसंपर्क मोठा असेल तर ? तर हा , पन्नास लोकांची यादी बनविणे अवघडही असेल.

पण नावांची पसंती ठरविताना लग्नघरात नक्की कोणाचे बरे चालत असेल ?

हा माहेरचा,तो सासरचा,हा असा,अन तो तसा,अशी चर्चा तिथेही झडत असेल .

पण राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी तयार करण्या इतके का ते अवघड असेल ?।।७।।

या पन्नास नावांच्या भानगडीत ज्यांनी आपला पाहुणचार घेतलेला आहे ते सुद्धा बदलतात.

आपल्या टॉप मोस्ट फायद्याचे कोण आहेत, त्यांचीच नावे फक्त ते नक्की करतात ।

उशिरा का होईना ज्याला तोंडी आमंत्रण येते तो आनंदतो अन सुखावतो .

प्रथा,परंपरे प्रमाणे ज्याला आमंत्रण दिले गेले नाही तो मात्र दुखावतो अन दुरावतो।।८।।

आयोजकांचा होमवर्क कच्चा असेल तर आमंत्रितांपैकी ऐनवेळी नकार देणारी संख्या वाढते .

आता मात्र जे वेटिंग लिस्टवर होते वा ग्रहित नव्हते त्यांना कॉल करायची धांदल उडते ।

अशा वेळी घाई करायची नसते, तुम्ही वॉन्टेड होता का अनवॉन्टेड हेही पहायचे असते.

कोणामुळे तरी रिकामी झालेली जागा भरायला न मिळाल्यासारखे जायचे नसते ।।९।।

लग्नाच्या ठिकाणी तुम्ही वॉन्टेड होता का अनवॉन्टेड हे समजणे फारच सोपे असते.

वॉन्टेड ला नमस्कार, चमत्कार आणि अनवॉन्टेडला साधी नजरेला नजर सुद्धा नसते ।

वॉन्टेडच्या डोक्यावर फेटा बांधला जातो आणि खायचं-प्यायचं असतं म्हणून तोंडावर मास्क नसतो .

अनवॉन्टेडला खायचं-प्यायचं नसतं म्हणून तोंडावरचा मास्क तसाच असतो अन डोक्यावर फेटा नसतो ।।१०।।

तसंही कोरोनामुळे सोशिअल डिस्टनसिंग, सँनीटायझेशन आणि मास्क वापरायचा आहे.

लग्नाच्या भाऊगर्दीत तुम्ही होता काय आणि नव्हता काय कोणाला समजणार आहे ।

सरकार सावध करतंय, दिवाळीनंतर कोरोना वाढतोय,उगाच कशाला गर्दीचा भाग व्हायचे आहे.

सध्या सगळं कसं ऑनलाईन आहे, वधु-वराला घरात बसूनच आशीर्वाद व शुभेच्छा द्यायची ही वेळ आहे ।।११।। 


योगीराज देवकर.

www.motivationacademy.in

प्रेरक,प्रशिक्षक,लेखक.

२२/११/२०२०


मयूर इंगळे, एनविरो स्मार्ट

 Saturday Club Global Trust -Wakad Chapter. Success Story-Two.

श्री मयूर इंगळे- एनविरो स्मार्ट.

At present Mr Ingale is not active in this business since March 2021 end. The care of the business is being taken by his partner.

एनविरो स्मार्ट ही फर्म इंडस्ट्रियल ऑइल,लुब्रिकेन्ट्स, लाईट डिझेल ऑइल (LDO), बायो-डिझेल किंवा फ्युएल, या उत्पादनांची सप्लायर आणि ट्रेडर्स आहे. या उत्पादनांचा उपयोग प्रामुख्याने इंडस्ट्री आणि ट्रान्सपोर्ट या विभागात केला जातो. पुणे जिल्ह्यातील रांजणगाव, चाकण,मरकळ आणि कुरकुंभ एम.आय.डी. सी. मधील काही उद्योगांना त्यांच्यामार्फत इंडस्ट्रियल ऑइल आणि LDO चा पुरवठा होत आहे.


एनविरो स्मार्ट कडे तीन आणि सहा हजार लिटर क्षमतेचे डिस्पेन्स मशीनसह बायो-डिझेलची वाहतूक करणारे दोन टँकर्स आहेत. याद्वारे ते किमान १०० लिटर्स पासून ते कमाल ६००० लिटर्स पर्यंतच्या ऑर्डर्स स्वीकारतात आणि ग्राहकाला जागेवर जावून मालाचा पुरवठा करतात.


एनविरो स्मार्ट द्वारा पुरवठा केले जात असलेले बायो-डिझेल हे एक विशेष उत्पादन आहे. इको फ्रेंडली, पारंपरिक डिझेलच्या तुलनेत ५ ते ६ रुपयांनी स्वस्त , इंजिनचा चांगला पिकअप आणि कार्यक्षमतेत वाढ ही बायो-डिझेलची खास वैशिष्ठे आहेत. त्यामुळेच वाहने आणि जनरेटर्स साठी बायो-डिझेलचा वापर वाढताना आढळत आहे.


अगदी १५मार्च २०२० पर्यंत त्यांची दरमहा साधारणपणे २५ ते ३० हजार लिटर्स बायो-डिझेलची विक्री होत होती. कोव्हीड-19 मुळे लॉक डाउन झाला आणि अन लॉक होईपर्यंत त्याची विक्री मोठा शून्य झाली . दरमहा लाखभर रुपयांचा स्थिर खर्च सुरू होता आणि दोन्ही कामगारांना काही काम उरले नव्हते. अन लॉक सुरू झाला तशा काही इंडस्ट्रीज सुरू झाल्या आणि LDO आणि इंडस्ट्रियल ऑइल या उत्पादनांना मागणी सुरू झाली परंतु अजून ट्रान्सपोर्ट सुरू झाला नव्हता.


श्री इंगळे हे SCGT-Wakad Chapter चे मेंबर आहेत. तिथेच त्यांची श्री निलेश कुलकर्णी यांच्याबरोबर ओळख झाली. प्रथम श्री कुलकर्णी यांनी त्यांच्या बसेससाठी या बायो-डिझेलचा वापर केला. त्यामुळेच श्री कुलकर्णी यांना या उत्पादनाबद्दल खात्री पटली . पुढे हाच मुद्दा श्री इंगळे यांना व्यवसाय मिळवून देण्यास गेम चेंजर ठरला.


श्री निलेश कुलकर्णी यांनी श्री इंगळे यांना गिरीकंद ट्रॅव्हल्सचा रेफेरन्स दिला. गिरीकंद ट्रॅव्हल्सने यापूर्वी दुसऱ्या उत्पादकांचे उत्पादन वापरले होते परंतु त्यांचा अनुभव चांगला नव्हता. श्री कुलकर्णी यांनी अगदी आग्रहाने श्री इंगळे यांच्याकडून बायो-डिझेल विकत घेण्याची शिफारस केली आणि दर्जाबद्दल खात्री दिली . गिरीकंद ट्रॅव्हल्सने सुरुवातीस ट्रायल साठी थोडे बायो-डिझेल घेतले आणि वर उल्लेख केल्याप्रमाणे अनुभव आल्यानंतर त्यांनी एनविरो स्मार्टला  आतापर्यंत अनेकवेळा रिपीट ऑर्डर्स दिलेल्या आहेत आणि जानेवारी 21 पर्यंतच 25,00,000 ₹ किंमतीचे बत्तीसहजार लिटर पेक्षा जास्त बायो-डिझेल खरेदी केलेले आहे आणि ही खरेदी भविष्यात अशीच  सुरूच राहणार आहे. हा व्यवहार असाच सुरू राहील तर  2021 मध्येच त्यांचा हा बिझनेस एक कोटीपेक्षा जास्त होईल असा एक अंदाज आहे.


वाकड चापटरचे आणखी एक सदस्य श्री विजय नवले देखील श्री इंगळे यांच्याकडून बायो-डिझेलची खरेदी करीत आहेत.


क्लब जॉईन करण्यापूर्वी अपेक्षा केल्याप्रमाणे घटना घडत आहेत त्यामुळे श्री इंगळे यांनी Saturday Club Global Trust-SCGT बद्दल समाधान व्यक्त केले. "SCGT हा एक चांगला ट्रस्ट आहे. खरंतर लॉक डाउनच्या काळात मी काहीसा निराश झालो होतो पण क्लब मुळे भावनिक सपोर्ट मिळाला आणि आपल्यामागे कोणीतरी भक्कमपणे उभे आहे असे जाणवले ! ",अशा शब्दात श्री इंगळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

सध्या श्री इंगळे या व्यवसायात नाहीत. परंतु SCGT Wakad चे सदस्य असताना त्यांना चाप्टर चा भरपूर फायदा झाला.


सदर क्लब हा महाराष्ट्रीयन उद्योजकांसाठी GET & GIVE या तत्वावर आधारित काम करतो. एकमेकांना सहाय्य केल्याने प्रत्येकाचाच व्यवसाय वाढणार आहे हे निश्चित.


कथा लेखक- योगीराज हरिश्चंद्र देवकर. SCGT-Wakad Chapter, Secretary.

Mob: 9307133134.

www.motivationacademy.in

निलेश कुलकर्णी, आकांक्षा हॉलिडेज

 सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट-वाकड . सदस्यांची सक्सेस स्टोरी.

श्री निलेश कुलकर्णी - आकांक्षा हॉलिडेज प्रा.


श्री निलेश कुलकर्णी परीक्षा आकांक्षा हॉलिडेज प्रा. ही कंपनी पिंपरी-चिंचवड मध्ये सूचीबद्ध आहे. कंपनीच्या दहा विभागातील बारा कर्मचार्‍यांचे संक्षिप्त वर्णन.टिओटॉ सॉफ्टवेयर आणि ऑल स्क्रिप्ट, खराडी सिटी आयटी कंपनी या कार्यालयांचे कर्मचा वाहतूक्यांचा अनुभव. आपण शोधू शकता मार्केटमध्ये व्यवसाय करू शकता. सर्व चालू आनंद आणि सुरळीत चालू.


श्री कुलकर्णी हे Saturday Club Global Trust- Wakad Chapter चे  सदस्य आहेत.( Mob- 8087830007)  जवळपास सगळेच सदस्य क्लबच्या मीटिंग अटेंड करीत असत . क्लबने १८ मार्च २०२० रोजी क्लस्टर मीट आयोजित केली होती. परंतु कोव्हीड-19 मुळे  महाराष्ट्र शासनाने १५ मार्च पासूनच राज्यातील मोठ्या शहरात आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ आणि साथरोग नियंत्रण कायदा १८९७ लागू केला त्यामुळे सदर मीट रद्द झाली. २२ मार्च ला देशात जनता करफ्यु झाला , त्यापाठोपाठ लॉक डाउन सुरू झाला. लॉक डाउनचा परिणामस्वरूप आकांक्षा हॉलिडेज प्रा.ली. ला काम पुरविणाऱ्या दोन्ही कंपन्यांचे कामकाज बंद झाले आणि सर्व बसेस घरासमोर उभ्या राहिल्या, बारा कर्मचाऱ्यांच्या सेवेतही खंड पडला.


१५ मार्च ते १० ऑगस्ट पर्यंत दरमहा साडेपाच लाख ₹ बसेस चे EMI आणि कर्मचाऱ्यांचा पगार असा फिक्स्ड खर्च चालू होता आणि उत्पन्न मात्र शून्यावर आले होते. दोन महिन्यांतरच भांडवल संपले आणि बसेसचे EMI भरण्यासाठी स्वतःच्या बचतीमधील पैसे वापरण्याची वेळ आली. श्री कुलकर्णी यांच्यासाठी हा खूप कठीण काळ होता. जसजसा लॉक डाउन वन,टू,थ्री,फोर वाढत होता तसतसे घरासमोर उभ्या असलेल्या बसेसवर धूळ वाढत चालली होती आणि आपल्यासमोर नक्की काय भविष्य वाढून ठेवलंय हा विचार मनात येऊन भीती वाढत चालली होती. कधीनव्हे ते व्यवसायिक पातळीवर निरव शांतता झाली होती. 


एका बाजूला हे अघटित घडत असताना दुसऱ्या बाजूला मात्र Saturday Club Global Trust-SCGT आणि बाहेरील काही समव्यावसायिक मित्र मानसिक आधार आणि सहाय्य देण्यासाठी उपलब्ध होते. लॉक डाउनच्या काळात क्लबने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यास सुरुवात केली होती. SCGT Wakad हा व्हाट्सअप्प ग्रुप होताच त्यावर प्रत्येकाचे बिझनेस प्रोफाइल शेअरिंग सुरू झाले.२५ मार्च पासूनच SCGT च्या ऑन लाईन मीटिंग  सुरू झाल्या. १ एप्रिल पासून वाकड चापटर चे 'सहाय्य करू मिशन' सुरू झाले.क्लब मधील सदस्यांचे तीन गट केले गेले आणि प्रत्येकाला प्रेझेंटेशन ची संधी मिळू लागली. डिजिटल मीटिंग मुळे क्रॉस चापटर मीटिंग अटेंड करायची संधी उपलब्ध झाली. SCGT चे विविध विषयांवर वेबिनर सुरू झाले. यासर्व गोष्टींचा मानसिक संतुलन राखण्यास आणि आत्मविश्वास टिकून राहण्यास फार फायदा झाला. ऑन लाईन वन-टू-वन होत होते, मैत्री निर्माण होत होतो आणि परस्परामधील विश्वास वाढीला लागला होता.


आणि.....Saturday Club- Wakad Chapter मुळे श्री कुलकर्णी यांना पहिला break through मिळाला. श्री कौस्तुभ बाबर Saturday Club- Wakad चे ट्रेझरर आहेत. त्यांची फोर डायमेंशन बिल्डकॉन प्रा.ली. ही कंपनी आहे. श्री बाबर यांचे शापुरजी पालोनजी ग्रुप मधील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यांच्यामुळे श्री कुलकर्णी यांना शापुरजी पालोनजी ग्रुपचा रेफेरन्स मिळाला आणि आकांक्षा हॉलिडेज प्रा.ली.चे चित्रच पालटले. लॉक डाउन लागल्यामुळे शापुरजी पालोनजी ग्रुपचे हजारो कामगार भारतातल्या वेगवेगळ्या राज्यात स्वतःच्या गावी गेले होते. महाराष्ट्रात अन लॉक सुरू झाला तसे त्या कामगारांना परत आणण्याचे काम सुरू झाले होते. तीन बस सप्लायर तिथे काम करीत होते , चौथा बस सप्लायर म्हणून आकांक्षा हॉलिडेज प्रा.ली. ला काम देण्यात आले.


कामगारांना प्रवासासाठी आवश्यक मेडिकल पास ची व्यवस्था शापुरजी पालोनजी ग्रुपने केली. लागलीच आकांक्षा हॉलिडेज प्रा.ली.ने बसेस परराज्यात नेहण्यासाठी E-passes काढले. वाहनांची सर्व कागदपत्र अद्ययावत केली. बसेस सँनेटाईज केल्या. ड्रायव्हर्सना कोरोना प्रबंधक सर्वनियम काटेकोरपणे पाळणे बंधनकारक केले. स्टेट बॉर्डर टॅक्स भरण्याची सोय केली आणि बसेस परराज्यात जाण्यासाठी सज्ज झाल्या.


ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२० या दोन महिन्यात आकांक्षा हॉलिडेज प्रा.ली.ने शापुरजी पालोनजी  ग्रुपच्या २००० कामगारांना बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, झारखंड, छत्तीसगड,कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यातून महाराष्ट्रात पुणे आणि चंद्रपूर याठिकाणी आणले. त्यावेळी भारतात होत असलेली अतिवृष्टी,नदी-नाल्यांना आलेले पूर आणि त्यामुळे निर्माण झालेले अडथळे, बदलणारे वेळापत्रक,इ. यासर्व गोष्टीवर मात करून श्री बाबर आणि शापुरजी पालोनजी ग्रुपने दाखविलेला विश्वास सार्थ करून दाखविला. या कार्यात शापुरजी पालोनजी ग्रुपच्या टीमने फार मोठा सपोर्ट केला असे श्री कुलकर्णी आवर्जून सांगतात.


पैसा हे यशाचे मोजमाप करण्याचे एक साधन आहे. आकड्यातच बोलायचे झाले तर श्री कुलकर्णी यांनी केवळ दीड महिन्यात शापुरजी पालोनजी ग्रुपचा ९२ लाख रुपयांचा व्यवसाय केला. याशिवाय श्री बाबर यांनी त्यांच्या कंपनीचे कामही श्री कुलकर्णी यांना दिले त्याद्वारा १२ लाखाचा व्यवसाय केला. क्लब च्या इतर सदस्या मार्फतही त्यांनी ५-६ लाखाचा व्यवसाय केला. या अडचणीच्या काळात श्री कुलकर्णी यांना फक्त Saturday Club Wakad Chapter च्या माध्यमातून एक कोटी दहा लाख रुपयांचा व्यवसाय केला आहे.


श्री निलेश कुलकर्णी काय म्हणाले ते त्यांच्याच शब्दात, " श्री स्वप्नील कुलकर्णी सर मला Saturday Club चा मेंबर हो म्हणून तीन वर्षापासून मागे लागले होते. मला वाटायचं माझा व्यवसाय हा कार्पोरेट क्षेत्राशी निगडित आहे. क्लब मध्ये वैयक्तिक व्यवसाय करणारे उद्योजक जास्त असतात त्यामुळे क्लबचा मला विशेष फायदा होणार नाही. पण चला नवीन मित्र तर मिळतील म्हणून मागीलवर्षी मी मेंबर झालो. परस्परात विश्वास निर्माण झाला त्यातूनच मैत्री वाढली. एक सदस्य सौ भारती मुरकुटे मॅडम मुळे मला ऑफिसला जागा मिळाली. आता आम्ही पाच सदस्य एकत्र येऊन सर्वांना लवकरच एक मोठी बातमी देणार आहोत. सर्व सुरळीत चालू असताना हा व्यवसाय मिळाला असता तर त्याचे विशेष वाटले नसते पण अडचणीच्या काळात हा व्यवसाय मिळाला म्हणून त्याचे मोल फार मोठे आहे. मला व्यवसाय मिळाला त्यामुळे जसा माझा आत्मविश्वास वाढला तसेच मी इतर सदस्यांना व्यवसाय मिळवून दिला पाहिजे ही भावनापण वाढली. त्यातूनच मी श्री मयूर इंगळे यांना गिरीकंद ट्रॅव्हल्स मध्ये रेफरन्स दिला आणि आग्रहाने व्यवसाय पण मिळवून दिला आहे. धन्य आहेत ते कै. माधावरावजी भिडे सर ज्यांनी Saturday Club Global Trust ही संकल्पना प्रत्येक्षात आणली. त्यांच्यामुळेच महाराष्ट्रात माझ्यासारख्या हजारो उद्योजकांना व्यवसाय मिळत आहे. एकमेका सहाय्य करू अवघे होऊ श्रीमंत ही क्लबच्या प्रार्थनेतली ओळ इथे खरी ठरत आहे ! "


मराठी माणूस मराठी माणसाला सहाय्य करीत आहे ही कौतुकास्पद गोष्ट या क्लब मध्ये घडत आहे.


कथा लेखक- योगीराज हरिश्चंद्र देवकर. Saturday Club-Wakad Chapter , Secretary.

Mob 9307133134.

www.motivationacademy.in