Saturday 20 August, 2011

How to setup a micro, small and medium enterprise – a series


Potential entrepreneur should follow following important steps for setting up micro, small or medium enterprises.
1st – selection of product: - It all starts with selection of business opportunity. Business opportunity may be service or trading or products identify such a business opportunity which can generate sufficient profit.
            It may be a raw material based or demand based or foot loose industry. One has to consider following points and take a ‘GO’ or ‘NO GO’ decision.
-         Does the business idea give you immense pleasure or satisfaction, does it fulfills your inner needs like positive feeling.
-         Does it have a market potential in your identified market area.
-         Is it the need of the clients, customers or market?
-         Caring out a basic market survey.
-         Experts’ opinions from Govt. Organizations, consultants, etc.
-         Competitors study.
-         Is it an innovative or creative idea?
-         Discussions with support system.
-         Conceptualizing a business plan.
On each aspect you have to think whether to go ahead or not to go.
            As there are 4Ps of marketing, there are 4ps of project conception also; they are as follows.
1)     Product – Its features, advantages & benefits.
2)     Process – It’s a making of a product what technology is to be used to produce the product.
3)     Place – Location of the business. Earlier it was one of the at most import aspects. But now business men say it is not the location but it is destination.
4)     Partner – support system which will assists you or the financial or technical collaborations.
Choosing a product
Entrepreneur should also consider following aspects while conceptualizing the project.
-         Packaging of the product
-         Branding the product
-         Availability & procurement of raw materials
-         Latest technology available
-         Outsourcing the services
-         Market access
-         Product warranties & guarantees
-         Support system mechanism
-         Incentive and subsidies
-         Availability/cheap labor
-         After sales service
-         Product design & development
-         Latest technologies available with CSIR, etc.
Market availability or development is the key area in product selection. One has to consider following areas.
            Restricted items – items like alcohol, automobiles, gold, and almost 25 items are restricted to start in SSI.
            Banned items – Due to saturation or some statutory requirements few items are banned in SSI. Ex: An audio/video cassette to CDs, to pen drives to documents on Google, etc.
            List of items reserved for exclusive manufacture in SSI – There are hundreds of items in this list. One has to refer this list and understand the vast scope to choose product from SSI field. One may refer this list in District Industries Centre in the district or MSME website.
            Products having export potential – one has to contact foreign chamber of commerce, WTO, EXIM Bank, to understand such potential,
            EXIM Bank has developed an excellent model to conduct the export – product portfolio analysis based on three parameters like;
-         Supply capability in product group.
-         Domestic environment
-         Export market attractiveness
This analysis gives rise to product groups with high potential or low potential.
One also has to be careful about the laws of the country one is exporting to.
            Few examples of business ideas
-         Automatic car washing centers.
-         Shikakai powder
-         Semi or mechanized bricks plants
-         Authorized dealers for 2 wheelers, 4 wheelers.
-         Pressings and laser cutting machines.
Potential entrepreneurs may refer my book titled ‘Business Opportunities, search you will get it!’ published by Continental Publications, Pune. 

Thursday 18 August, 2011

अण्णा हजारे आन्धी है | वो शास्त्रीजी और गांधी है !

अण्णा हजारे आन्धी है | वो शास्त्रीजी और गांधी है !

जन लोकपाल आंदोलन 

१६ ऑगस्ट संध्याकाळी भावे हायस्कूल येथे आंदोलनाच्या समर्थनार्थ सभेसाठी पोहोचलो. त्यानंतर बालगंधर्व चौकात जे उत्फूर्त आंदोलन सुरु आहे तिथे बराच वेळ थांबलो.
१७ ला दुपारी विभागीय आयुक्त कार्यालयाजवळ श्री. राधेश्याम जगताप भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास पुणे जिल्हा, अध्यक्ष आणि सहकारी आंदोलन करीत आहेत त्यांना भेटलो. आणि नांव नोंदणी केली. त्यानंतर बालगंधर्व चौकात काही वेळ उभा होतो. श्री. सुनील देसाई देखील  बरोबर होते. सहानंतर पुन्हा बराच वेळ बालगंधर्व चौकात आंदोलनात सहभाग घेतला.
१८ आज संध्याकाळी सहा वाजता बालगंधर्व चौकात ते सारसबाग असा कॅन्डाल मार्च आयोजित आहे त्यात आम्ही सर्व कुटुंबीय सहभागी होणार आहोत. सर्वांनी देखील यावे.
पुण्यात जन आंदोलनास विध्यार्थी, सर्व सामान्य नागरिक, महिला, अधिकारी वर्ग इतियादी यांचा मोठा पाठींबा मिळत आहे.

Tuesday 16 August, 2011

भारत सरकारला भारत भ्रष्टाचार मुक्त हवा आहे का?

भारत सरकारला भारत भ्रष्टाचार मुक्त हवा आहे का?
दिल्ली पोलिसांनी श्री. हजारे आणि त्यांच्या सहका-यांना १६ ऑगस्ट पासून उपोषणास परवानगी दिली होती. खरे तर अशा वेळी कोणत्याही अटी लादल्या जात नाहीत, तरी उपोषणाची जागा, १६ तारखेस संध्याकाळी उपोषण मागे घ्यावे लागेल, समर्थकांची संख्या मर्यादित ठेवावी लागेल, लाउड स्पीकर वापरता येणार नाही, अशा जाचक अटी सह हि परवानगी देण्यात आली.
१६, १७, १८, असे तीन दिवस जर अण्णांचे उपोषण सुरु राहिले असते तर त्यास भारतभर आणि भारता बाहेरही जोरदार प्रसिद्धी आणि समर्थन लाभले असते. १८ तारखेस संध्याकाळ नंतर या चळवळीला सरकारला थोपविता आणि थांबविता आले नसते. त्यामुळे नंतर विचार करून सरकारने दुसरा निर्णय घेतला आणि अण्णांना १६ला सकाळीच अटक केली.
सध्याचे सरकार हे कॉंग्रेससह २२ पक्षांचे सरकार आहे. या सरकारलाच योग्य प्रकारचे लोकपाल बिल नको आहे. त्यामुळे या पक्षांचे मंत्री, खासदार आणि त्यांचे समर्थक यांचा अण्णांना पाठींबा असणार नाही. सरकारच्या विरोधात तितकेच पक्ष आहेत. त्यांनी अण्णांना पाठींबा दिला तर सरकार म्हणणार अण्णा अमुक तमुक पक्ष्याचे आहेत. आम्हाला भ्रष्टाचार करू देत नाही का? तर मग तुम्हालाच भ्रष्टाचारी ठरवितो अशी भूमिका हे सरकार घेणार.
अशा वेळी प्रत्येक्ष नागरिकांनीच अण्णांच्या चळवळीला आणि आंदोलनाला विविध माध्यमातून पाठींबा दिला पाहिजे आणि नागरिक हे नक्की करतील, कारण या भ्रष्टाचाराचा सर्वात जास्त त्रास नागरिकांनाच होत आहे. फरक फक्त इतकाच कि काही लोक आत्ता करतील तर काही मतदानाच्या वेळी.
सामान्य नागरिकाने सरकारच्या ध्येय धोरणाविरोधात भूमिका घेणे प्रचंड अवघड आणि धाडसाचे काम आहे. त्यातही सरकारने जर डोके, कान, डोळे बंद ठेवण्याचीच भूमिका घेतलेली असेल तर बिचारा साधा नागरिक सरकारच्या पुढे काय करणार?
पंतप्रधान सुद्धा सहका-यांच्या आणि उद्योग, शिक्षण, इतियादी क्षेत्रात दैनंदिन होत असलेल्या भ्रष्टाचाराने हतबल झाल्या सारखे बोलतात. आणि नागरिकांनाच आवाहन करतात सावध रहा, त्याग करा. मग हे सरकार त्याच्या तरी नियंत्रणात आहे का? 
आज मला मी या मोहिमेत विशेष काही करू शकत नाही याची खंत वाटत आहे आणि प्रचंड राग हि आलेला आहे. न्याय, सनदशीर मार्गाने हे सरकार जर सत्याग्रह करू देत नसेल तर हे कसले सरकार?
नागरिकांनो ! भ्रःष्टाचार मुक्त भारत करण्याच्या कामाची हि सुरुवात आहे. लोकपाल विधेयकाने काय होणार? असला अपप्रचार हे सरकार करत आहे, त्याला बळी पळू नका. आपण जर अजूनही जागे झाला नाही, रस्त्यावर उतरला नाही, तर हे सरकार अण्णांचे आंदोलन आठवड्याभरात चिरडून टाकेल. त्यानंतर मात्र पुढच्या १०० वर्ष्यात दुसरे अण्णा तयार होणार नाहीत.
या सरकारलाच जनतेचा, लोकपालाचा अंकुश नको आहे. त्यामुळे त्यांना भ्रष्टाचार जसा आहे तसा चालू ठेवायचा आहे. बर हे सरकार बदलले तर जे येतील ते यांच्या पेक्षा चांगले असतील याचीही खात्री नाही.
पण एकच होईल प्रत्येक नागरिक जर जागृत झाला तर तो सार्वजनिक संपत्तीचे लचके कोणालाही तोडू देणार  नाही.
मी संसद, राज्य घटना, कायदे इतियादी गोष्टींचा आदर आणि सन्मान करतो. परंतु हि राज्य घटना जर लोकांनी, लोकांसाठी, लोकांद्वारा बनविलेली असेल तर अण्णांचे आंदोलन समर्थनिय आहे.
मी सरकारच्या या कृतीचा निषेद करतो आणि या आंदोलनाला पूर्ण पाठींबा देतो. तुम्ही सर्व जण सुद्धा पाठींबा द्या.

Monday 1 August, 2011

सुदैवाने अपघातातून वाचलो.

     ३१ जुलै २०११ रोजी रात्री ८ वाजता कासुर्डी, यवत जवळ माझ्या गाडीचा अपघात झाला. आय आर बी संस्थेचा हलगर्जीपणामुळे जिथे दोन पदरी रस्ता संपून चार पदरी रस्ता सुरु होतो त्या ठिकाणी जो रस्ता दुभाजक तयार केलेला आहे तिथे कसलाही बोर्ड लावलेला नाही. गाडी दुभाजकावर चढून उलटली त्यानंतर फरफरत जाऊन पुन्हा पलटी झाली. गाडीचे भरपूर नुकसान झाले पण सुदैवाने मला कसलीही इजा झाली नाही.
     परमेश्वर, माझे हितचिंतक, नातेवाईक आणि मित्र तसे ज्या थोरामोठ्यांचे आशीर्वाद आहेत त्यामुळे मी वाचलो.
श्री. सोमेश्वर ठोंबरे, सरपंच, कासुर्डी, ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी मला तात्काळ मदत केली. त्यांचा मी आभारी आहे.
या अपघातातून बोध घेऊन आय आर बी ने रस्ता दुभाजकावर बोर्ड बसवावेत. त्यामुळे यानंतर तरी तेथे अपघात होणार नाहीत.