Thursday 28 October, 2021

कोजागिरी स्पेशल फॅमिली डे.

 

*कोजागिरी स्पेशल फॅमिली डे Presented by Saturday Club Global Trust- PCMC Region.*


SCGT म्हणजे उद्योजक सभासदांसाठी नवनव्या संकल्पना राबविणारा ट्रस्ट  .  उद्योजकांच्या कुटूंबियांना पण Network is Networth चे महत्व कळावे यासाठी हा कौटुंबिक सोहळा आयोजित केला होता. रिजन हेड, तीनही चाप्टरचे CST आणि इव्हेंट सपोर्ट टीम तयारीला लागल्या. इव्हेंट यशस्वी करण्यात विशेष मेहनत घेतली ती सौ मधुरा चिपडे मॅडम आणि श्री संजय पाटील यांनी. त्यांना मोलाची साथ लाभली ती श्री नीरज सर, श्री श्रीकांत यादव आणि सौ भारती मुरकुटे मॅडम यांची.


२० ऑक्टोबर २०२१ रोजी कुंदन गार्डन,बाणेर रोड,पुणे येथे ६.३० वाजता हा कार्यक्रम सुरू झाला आणि २०० पेक्षा अधिक लोकांच्या उपस्थितीत रात्री ११ पर्यंत उत्तरोत्तर रंगत गेला.


PCMC रिजन मधील उद्योजकांना बिझनेस प्रमोट करण्यासाठी खास टेबल स्पेस दिली होती.औंध-बाणेर चाप्टरचे श्री.नीरज कैथवास   - लॅपटॉप आणि IT मटेरिअल्स. श्री.अभय जमदग्नी- आयुर्वेदिक अभ्यंग किट. श्री.ढेरे गुरुजी- पूजा साहित्य आणि कंदील. सौ. गौरी जोशी- सोप्स . श्री. श्रीकांत माडगे- स्टॉक मार्केट. श्री.गजानन जाधव- ज्वेलरी. PCMC चाप्टरचे सौ.आश्विनी साळुंखे- केक्स. सौ.नीलम राजपूत- सेंद्रिय उत्पादने. सौ. मानसी अग्रवाल. श्री सागर हरपुडे. यांनी त्यांची उत्पादने प्रमोट करण्याची संधी साधली आणि कौटुंबिक कार्यक्रमात व्यावसायिक वातावरण निर्मिती केली.


श्री स्वप्नील कुलकर्णी प्रास्ताविकात म्हणाले की,"मुलांचे बाबा किंवा आई SCGT क्लबची मीटिंग अटेंड करायला जाते, 1 to 1 किंवा क्लब इव्हेंट्स साठी बाहेर पडते, तेव्हा ते तिथे जावून नक्की करतात तरी काय ? हा प्रश्न घरातल्या लहानग्यांना पडत असेल. यानिमित्ताने हा क्लब उद्योजकांसाठी नक्की काय काम करतो हे जर समजले तर त्यांचे कुतूहल पूर्ण होईल. कुटुंबातील सर्वांनाच क्लबचे कार्य आणि उद्योजकांसाठी नेटवर्किंग कसे महत्वाचे आहे हे समजले तर त्यांचाही उद्योजकांना पाठिंबा लाभेल, या हेतूने हा कोजागिरी स्पेशल फॅमिली  डे आयोजित केला आहे. आज येथे लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी काही न काही सरप्राईज आहे त्यांचा सगळ्यांनी आनंद घ्यावा."


लहानग्यांसाठी मॅजिक शो ने कार्यक्रमास सुरुवात झाली. मॅजिक शो सोबतच लहान मुलांची कृती आणि प्रश्नांना दिलेली निरागस उत्तरे यामुळे जे प्रासंगिक विनोद निर्माण झाले त्यामुळे लहान-थोर सगळेच खळाळून हसले.


त्यानंतर वाकड, औंध-बाणेर आणि PCMC चाप्टरच्या चेअरमन,सेक्रेटरी आणि ट्रेझरर यांनी प्रेसेंटेशन्स दिले. यात कोणी टीमची ओळख करून दिली,तर कोणी How Network is Networth चे महत्व सांगितले,तर कोणी आकडेवारी जाहीर केली,तर कोणी चक्क सक्सेस स्टोरीज सांगितल्या. हे सर्व चालू होते तेव्हा मोठे लक्ष देऊन ऐकत होते तर छोटे हॉल मध्ये खेळत आणि दंगा करत होते,यामुळेच आपण म्हणतो लहानपण देगा देवा.


नंतर फन ऍक्टिव्हिटीज घेतल्या गेल्या आणि धमाल केली ती आई-मुलांच्या फॅशन शो आणि कॅट वॉकने. पहिला नंबर मिळविण्यासाठी आई-मुलांची पूर्वतयारी आणि स्ट्रॅटेजी आणि स्टेजवरील प्रदर्शन एकदम लाजबाब होते.


डान्स करायला कोणाला नाही आवडत. हॉल मध्ये गाण्याची धून वाजू लागली आणि कोणी स्टेजवर जाऊन तर कोणी खुर्चीत बसूनच ठेका धरला.


शेवटी पोटपूजेसाठी पाव-भाजी, पुलाव आणि त्यानंतर मसाला दूध असा मस्त बेत होता ज्याचा सगळ्यांनी आस्वाद घेतला.


अशा कार्यक्रमामुळे लहान मुलांवर नकळत उद्योजकतेचे संस्कार होतील आणि यातूनच वारसदार तयार होतील हे नक्की. 


उद्योग तर आपल्यापैकी प्रत्येकजण  करतच आहे पण  थोडा चेंज,थोडा विरंगुळा, थोडी मस्ती प्रत्येकालाच हवी असते. त्यात कुटुंब सोबतीला असेल तर यशाचा मार्ग सुलभ होईल.


धन्यवाद SCGT.


योगीराज देवकर.

लेखक,प्रेरक,प्रशिक्षक.

ब्लॉग रायटर.

PCMC Region.

www.motivationacademy.in


Meeting with extra

 

*Wakad Chapter -Regular Meeting With Extra Facilities .*


Saturday Club Global Trust-SCGT सदस्य उद्योजकांसाठी नेहमीच काहीतरी नाविन्यपूर्ण कल्पना राबवित असतो.


SCGT वाकड चाप्टरने दि ६ ऑक्टोबर २०२१ रोजी  नेहमीच्या मीटिंग पेक्षा वेगळा असा एक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबविला .

   महाराष्ट्रीयन  उद्योजकांना बाजारपेठ विस्तारण्यासाठी पूरक ठरेल अशा या मीटिंगचे नाव होते...

*8 Minutes Business Presentation Conclave .*


मीटिंग अटेंडन्स डिटेल्स - 

PCMC रिजन हेड - स्वप्नील कुलकर्णी.

Satara रिजन हेड- केदार साखरे. 9175115275

चाप्टर चेअरमन - ४

वाकड चाप्टर मेंबर्स - २२

क्रॉस चाप्टर- सातारा, सिंहगड, कोथरूड , इचलकरंजी, मेंबर्स -१६

गेस्ट - ६

Grand Total - Half Century.

*विशेष काय* -

१) एकाच मीटिंगमध्ये ९ उद्योजकांनी स्वतःच्या बिझनेसची गुप्त व खाजगी माहिती तपशीलवारपणे दिली, हाच Conclave चा मराठी अर्थ आहे. थोडक्यात तो तपशील खालील प्रमाणे-

१) चैतन्य इंगळे- वाकड चाप्टर. मो .9881833286 व्यवसाय- पेस्ट कंट्रोल, सँनिटायझेंशन ,

डीसइन्फेकशन,सर्विसेस ,इ. दिवाळी ऑफर- खास क्लबच्या मेंबर्ससाठी २०% ऑफ. सुरक्षित सेवा सवलतीच्या दरात.


२) अक्षय दुसाने- वाकड चाप्टर .मो .8007561204 व्यवसाय - त्रिकाया फूडस प्रा. लि. खास दिवाळीसाठी Box of Happiness-  handmade designer chocolates. मिठाईची सेल्फ लाईफ असते चार दिवस,चॉकलेटची काही महिने. म्हणून दिवाळी गिफ्टचा उत्तम पर्याय. जवळच्या लोकांना आनंद आणि सुख वाटा.


३) ओंकार पंडित - सातारा चाप्टर .व्यवसाय- शुभराज ज्वेलर्स. पुसेगाव. दिवाळी खास क्लब मेंबर्ससाठी

ऑफर- जितक्या वजनाचे सोने विकत घ्याल त्यापेक्षा दुप्पट वजनाची चांदी मोफत मिळेल. 


४) प्रणित कुंदप- सातारा चाप्टर .व्यवसाय- आदित्य फूडसचे, काका पेढीवले. टॅग लाईन - eat's good. साताऱ्याचे कंदी पेढे ज्याच्यासाठी होतात सगळे वेढे .दर्जेदार चार प्रकारच्या मिठाई व फरसाणसाठी प्रसिद्ध .जानेवारी पर्यंत वाट पहा- Franchisees देणे आहे.


५) डॉ नूपुर जोगळेकर-

वाकड चाप्टर.मो.9890053837 व्यवसाय-LOMOS Holistic Healing Centre. Nutrition Adviser. आजाराचा root cause- Oxidative Stress आणि Solution - Antioxidant. आजारीच पडायचे नसेल तर डॉक्टर जोगळेकरांचा  सल्ला घ्या आणि 7 Colours of food , vegetables खा आणि स्वस्थ रहा.


६) नारायण वझुरकर - वाकड चाप्टर. मो. 9890150382 व्यवसाय- पौरोहित्य. दिवाळी ऑफर - खास क्लब मेंबर्स साठी ४९९ रुपये किंमतीचे दिवाळी पूजा किट फक्त- ३६९ रुपयात. किट विकत घ्या आणि गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली ऑन लाईन श्री लक्ष्मी पूजा घरात मुहूर्तावर साजरी करा.


७) मारुती मुसमाडे - वाकड चाप्टर. मो. 9423524336 व्यवसाय- आदिनाथ हॉलिडेज . दिवाळी ऑफर - किमान ६ लोकांची ट्रिप बुक करा, वन टाइम पेमेंट करा आणि घसघशीत डिस्काउंट मिळवा. तुम्ही फक्त मनसोक्त भटकंती करायची ते ठरवा कसं ते आदिनाथ हॉलिडेज वर सोपवा.


८) समीर यार्डी - सिंहगड चाप्टर. मो. 9822647126 व्यवसाय- फोटोग्राफी. B E Mechanical कडून फोटो सेशन करा आणि दर्जा काय असतो ते अनुभवा. Event  असो की Still फोटोग्राफी आठवा समीर आणि होऊद्या त्याला अमीर.


९) प्रदीप पाटील - कोथरूड चाप्टर.मो. 9422081900 व्यवसाय- साडी सेल्स अँड सर्विसेस. जिथे साड्या मिळतात मार्केट पेक्षा २५ ते ५० % स्वस्त अशी ते जाहिरात करतात. आधी चार ठिकाणी चौकशी करा आणि मग यांचा अनुभव घ्या.


प्रत्येक 3 प्रेझेंटेशन नंतर योगीराज देवकर, वाकड चाप्टर ,सेक्रेटरी. मो. 9307133134. व्यवसाय- Motivational Speaker  यांनी Participants Involvement Round घेतला . यात मेंबर्सना प्रेझेंटेशनवर आधारित प्रश्न विचारण्यात आले आणि बरोबर उत्तर देणारास चॉकलेट देण्यात आले. प्रासंगिक विनोद,

हजरजबाबीपणा, यामुळे हसत-खेळत झालेल्या या राऊंडमुळे एक वेगळीच धमाल आली. एक हशा पुढची दहा-पंधरा मिनिटे श्रोत्यांचा सहभाग वाढवितो. यामुळे सर्वांचा सहभाग आणि एकाग्रता वाढण्यास चांगलीच मदत झाली. क्लब मधील उद्योजक Good Listener आणि हुशार आहेत हाही प्रत्येय आला .


२) ५ उद्योजक Wakad Chapter मधील तर ४ उद्योजक वेगवेगळ्या  Cross Chapters मधील होते.

३) Cross Chapter मधील प्रेझेंटेशन देणारा उद्योजक त्यांच्या Chapter मधील आणखी तीन उद्योजकांना घेऊन आलेला होता .

४) वाकड  चाप्टर मधील उद्योजकांना एकाच मीटिंग मध्ये इतर ४ चाप्टर मधील प्रातिनिधिक उद्योजकांना भेटण्याची संधी मिळाली. हाच अनुभव इतर चाप्टर मधील मेंबर्सचा पण राहिला.

५) सर्वांना  Elevators Speech Round मध्ये ३० सेकंद बोलण्याची संधी मिळाली.

६) प्रेझेंटर उद्योजकाने स्वतःचे प्रॉडक्ट्स डिसप्ले केले होते.

७) Reference connect & done deal , question- answer round  ऐवजी प्रत्येकास लिहण्यासाठी स्लिप दिली होती त्यामुळे ही माहिती लेखी एकमेकांना हस्तांतरित करण्यात आली. याशिवाय प्रत्येक प्रेझेंटरला ब्रेकफास्ट साठी स्वतंत्र राऊंड टेबल देण्याचा विचार होता पण हॉटेलमध्ये जागे अभावी हे करता आले नाही.

आणि विशेष म्हणजे हे सर्व रेग्युलर मीटिंगच्याच खर्चात करण्यात आले.


निमंत्रक होते-

संकल्पना- स्वप्नील कुलकर्णी. PCMC रिजन हेड. 9545058877

निलेश कुलकर्णी, चेअरमन.8087830007

योगीराज देवकर, सेक्रेटरी आणि PCMC रिजन ब्लॉग रायटर.9307133134

www.motivationacademy.in

गौरव गायकवाड, ट्रेझरर.7276000692

वाकड चाप्टरच्या कोअर टीमने ही संकल्पना यशस्वी करण्यात खूप मेहनत घेतली.

SCGT Wakad Chapter. 

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻


Monday 4 October, 2021

नारायण वझुरकर गुरुजी

 श्री नारायण वझुरकर,

सदस्य,SCGT वाकड चाप्टर आणि सौ नीलमताई राजपूत( बोबटे),

सदस्य,SCGT पिंपरी चिंचवड चाप्टर- सक्सेस स्टोरी.


*गाळा एक दुकाने दोन - Joint Venture.*


Saturday Club Global Trust-SCGT वाकड. सक्सेस स्टोरी क्रमांक सहा.


*ऑर्गन केअर आणि देव पूजा भांडार* एकाच गाळयात दोन दुकाने सुरू करणाऱ्या ओनर्सनी  असे मत व्यक्त केले की, Saturday Club Global Trust- SCGT ही अशी एक NGO आहे जिथे सक्सेस स्टोरीज निर्माण होतात कारण हा क्लब नसता तर आमची भेटच झाली नसती.


आपली संपूर्ण सजीवसृष्टी परस्परांवर अवलंबून चालते. हेच समीकरण व्यवसाय आणि व्यवसायिकास पण लागू पडते. श्री नारायण वझुरकर यांनी पाठशाळेत आठ वर्षं पौराहित्याचे  शिक्षण पूर्ण केले, HSC पर्यंतचे शिक्षणही पूर्ण केले आणि नोकरीच्या शोधात ते पिंपरी चिंचवडला आले. नाही म्हणायला काही महिने नोकरीही केली पण नोकरीत ते रमले नाही आणि जॉब करत करत त्यांनी पौराहित्य पण चालू ठेवले. थोड्याच दिवसात त्यांनी पूर्णवेळ पौराहित्य करण्याचा निर्णय घेतला आणि इतर गुरुजींच्या सहवासामुळे त्यांचे दीड-दोन हजार गुरुजींचे नेटवर्क उभे राहिले आहे. त्यामुळे तुम्ही कोणती पूजा करायची ते फक्त ठरवा आणि कसे ते नारायण गुरुजींकडे, (मो.9890150382) सोपवून निश्चिन्त रहा. गुरुजी म्हणतात तुम्ही घरी एक पूजा करता तेव्हा देवकार्य तर होतेच पण कितीजणांना रोजगार मिळतो ते पहा. यालाच म्हणतात जगा आणि जगू द्या.


पुढे त्यांनी मोरजाई देवी सामाजिक व सांस्कृतिक संस्था मोरवाडी पुजारी म्हणून जॉईन केली आणि  आजतागायत तिथला पूजापाठ नित्यनियमाने सुरू आहे.


लग्नानंतर त्यांनी पत्नीसाठी अगदी ५×३ च्या टपरीवजा जागेत पूजा साहित्याचे दुकान सूरु केले. थोड्या अनुभवानंतर ते थोडे मोठे आणि अजून थोड्या अनुभवानंतर हे अजून मोठे सुरू केले आहे . कसे ती पण एक स्टोरीच आहे.


२०२० मध्ये कोरोनामुळे लॉकडाउन झाला आणि सगळे व्यवहार ठप्प झाले. SCGT च्या ऑन लाईन मीटिंग सुरू झाल्या आणि मेंबर्स मध्ये 1 to 1 चर्चा सुरू झाल्या. 1 to 1 मुळेच त्यांचा सौ नीलम राजपूत (बोबटे).

(मो.7066063636) यांच्याशी परिचय झाला. त्या स्वतः उच्चविद्याविभूषित MBA(HR) आहेत. चांगली आठ वर्षे नोकरी केली पण मुलाचा सांभाळ करण्यासाठी ती सोडली पण घरात निवांत बसणे त्यांना आवडले नाही आणि त्यांनी घरातूनच ऑरगँनिक उत्पादने विक्रीचा व्यवसाय सुरू केला. SCGT मध्ये त्यांची बिझनेस कँटेगरी आहे ऑरगँनिक फूड्स. पुढे त्यांनी ऑर्गन केअर या ब्रँडअंतर्गत शेंगदाणा,तीळ,

मोहरी,खोबरेल,सूर्यफूल,इ. प्रकारची घाना तेल सुरू केली आहेत . 1to1 मध्ये समजले की त्यांना भावाला मदत करण्यासाठी दुकान सुरू करायचे आहे .


गुरुजीच्या आणि

निलमताईच्या पण दुकानाबद्दलच्या काही कल्पना होत्या. गुरुजींच्या पत्नी दुकान पाहतात म्हणून त्यांना महिला पार्टनर असावी असे वाटत होते .खर्च ५०:५०% विभागला जावा आणि व्यवहारात पारदर्शकता हवी. 

तर मॅडमला वाटत होते की दुकानातली उत्पादने एकमेकांना पूरक असावीत. एक उत्पादन घ्यायला आलेल्या ग्राहकाने दुसऱ्याची पण उत्पादने विकत घ्यावीत. पार्टनर लोक सरळ स्वभावाचे असावेत .


दोघांच्याही कल्पना जुळत होत्या आणि त्यात एक समान धागा होता की,ते दोघेही SCGT चे मेंबर्स आहेत.त्यामुळे प्रत्येक्ष न भेटताच ऑन लाईनच एकत्र दुकान सुरू करायचे अशा प्रकारचे Done deal झाले . लागलीच गुरुजींनी दुकान शोधले आणि 

शॉप नंबर ५ , अजमेरा कॉम्प्लेक्स, SBI शेजारी,पिंपरी, पुणे १८. या पत्त्यावर *ऑर्गन केअर आणि देव पूजा भांडार* सुरू झाले. 


सौ राजपूत मॅडमने दुकानात ड्राय फ्रुट्स, कोल्हापूर चाप्टरच्या श्री प्रतीक कपटे यांची मधाची उत्पादने, रत्नागिरी चाप्टरच्या श्री राजीव कारखानीस यांची मँगो पल्पची उत्पादने, अशी अनेक ऑरगँनिक उत्पादने ठेवलेली आहेत. एकमेका सहाय्य करू चे हे उत्तम उदाहरणच आहे.दुसरीकडे गुरुजींनी दुकानात पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य तर ठेवले आहेत पण खास काय तर रुद्राक्ष आणि स्फटिकाच्या दर्जेदार माळा. दोघांनाही SCGT मेंबर्सची पूरक प्रकारची उत्पादने विक्रीस ठेवायची आहेत.


दुकानाबाहेरचा कॉमन बोर्ड तुमचे स्वागत करतो. आत गेलो की डाव्या भिंतीवर ऑर्गन केअर तर उजव्या भिंतीवर पूजा भांडारचे मोठे फ्लेक्स दिसतात. आत उत्पादनांची आकर्षक मांडणी केली आहे. मागे स्टोरेज प्लेस आहे.


SCGT त असे पण घडते की, दोन वेगवेगळ्या चाप्टर मधील दोन मेंबर्स एकत्र येतात आणि स्वतःची दुकाने एकाच दुकानात थाटतात. आता तर ते दोघे ब्रँचेस सुरू करायचे ठरवीत आहेत.

दोघांनाही खूप साऱ्या शुभेच्छा.


सक्सेस स्टोरी रायटर.

*योगीराज देवकर.*

प्रेरक,प्रशिक्षक,लेखक.

मेंबर,सेक्रेटरी, SCGT वाकड चाप्टर आणि ब्लॉग रायटर, पिंपरी चिंचवड रिजन.

www.motivationacademy.in

चैतन्य इंगळे, डोअरमोझो

 कोरोना योद्धा :

*डोअरमोजो*


Saturday Club Global Trust(SCGT) वाकड चाप्टर. सक्सेस स्टोरी क्रमांक पाच.

Business Category: Pest control & sanitization.


श्री चैतन्य इंगळे यांची ग्रॅज्युएशन पूर्ण करण्यातच  दमछाक झाली होती. खरंतर ज्यांना शिक्षण अवघड जाते,ज्यांची परिस्थिती प्रतिकूल असते, असेच विद्यार्थी पुढे जीवनाच्या परीक्षेत पास होतात. मिळेल ते काम करायचे या प्रयत्नातून त्यांनी यशदामध्ये करार पद्धतीने स्वागत कक्षातील नोकरी मिळविली. नोकरीला समांतर केटरिंग डिप्लोमा ,एम ए चे शिक्षण चालू ठेवले आणि यशदातच त्यांनी स्वच्छता, केटरिंग, मेंटेनन्स विभागात लक्ष घालून अनुभव पण मिळविला.


आयुष्यात घडणारा सकारात्मक किंवा नकारात्मक आघात आयुष्याला कलाटणी देऊन जातो. चैतन्यच्या बाबतीतही तसेच घडले. एकदा एका वरिष्ठ पर्यवेक्षकाने चैतन्यची काही चुक नसताना अपमानकारक भाषा वापरली. या आघाताने त्यांनी पुढच्या पाच मिनिटात नोकरीचा राजीनामा दिला.


आता जे काही करायचे ते स्वतःचा आणि घरच्यांचा स्वाभिमान,अभिमान वाढविणारेच असेल अशा इराद्याने त्यांनी पुढील वाटचाल सुरू केली. यशदात वेगवेगळ्या विभागात लक्ष दिल्यामुळे त्यांना कदाचित स्वच्छता या विषयात करिअर होऊ शकते असे वाटले असावे . समोर प्रश्नांचा डोंगर तर होताच परंतु न डगमगता त्यांनी झाडू,खराटा,फिनेल आणि बादली घेऊन लोकांची घरे साफसफाई करण्याच्या कामास सुरुवात केली. ग्रॅज्युएट मुलगा हे काम करू लागल्यामुळे मित्र ,नातेवाईक त्यांना हसत होते पण चैतन्यला मात्र या कामात वाव आणि भविष्य दिसत होते.


त्यांनी वर्धस ग्रुपची स्थापना केली . कष्ट,ओळखी, माऊथ पब्लिसिटी यामुळे कामे मिळत होती. आता कुठे व्यवसायाची गाडी रुळावर येत होती अशा काळात त्यांना ऐन तारुण्यात  हार्ट अटॅक आला. हॉस्पिटलचे सगळे उपचार पार पडले. वेदना असल्या की मन भावनात्मक होते. हॉस्पिटलायझेशनच्या काळातच त्यांच्यात समाज उपयोगी कामाची बीजे रोवली गेली आणि त्यांनी युनायटेड मराठा ऑर्गनायझेशनच्या कामास सुरुवात केली. यामाध्यमातून त्यांनी अनेकांना उद्योजक बनविले.


वर्धस ग्रुपच्या माध्यमातून स्वच्छता, सुरक्षा सेवा, होम क्लीनिंग अशा सेवा पुरविल्या जातात. यातून १८०० लोकांना करार पद्धतीने रोजगार उपलब्ध झाला.


सदर सर्व चालू असतानाच ग्राहक पेस्ट कंट्रोल आणि इतर सेवांची मागणी करत होते. यातूनच पुढे ५ मे २०१८ रोजी डोअरमोजोचा जन्म झाला. ( *92 3007 3007*)


आजपर्यंत श्री चैतन्य इंगळे यांना विविध संस्थांकडून गौरविण्यात आले आहे. यासंपर्कातूनच लोक त्यांना राज्यभर मार्गदर्शनासाठी बोलावू लागले. यामाध्यमातून त्यांना महाराष्ट्रात तीस हजारपेक्षा जास्त युवकांना उद्योगाचे मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली.


जब जब जो जो होना हैं ।

तब तब तो तो होता हैं ।

मार्च २०२० मध्ये भारतात कोरोनात वाढ झाली आणि सगळी समिकरणेच बदलली.

कोरोनामुळे एकाबाजूला वर्धस ग्रुपच्या व्यवसायात ८०% घट झाली आणि १५०० करार पध्दतीच्या कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा आली. लॉक डाउनच्या काळात बिलिंग थांबले होते पण कर्मचाऱ्यांचे पगार चालू होते. कर्मचारी जीवाचा धोका पत्करून काम करत होते. दुसऱ्या लाटेत घरातल्या चौघांना कोरोना झाला होता. स्वतः जगतोय का मरतोय अशी भीतीदायक परिस्थिती अनुभवली आणि कोरोनाला हरवून परत आलो. पण ८०% आय टी आणि हॉस्पिटॅलिटी व्यवसाय बंद झाला तो दीड वर्षानंतरही पुन्हा पूर्ववत झालेला नाही. 


दुसऱ्याबाजूला डोअरमोजोच्या व्यवसायात २५० ते ३०० टक्के वाढ झाली. डोअरमोजोतुन ते पेस्ट कंट्रोलची सेवा देत होते. कोरोनामुळे सॅनीटायझेशन हा शब्द नव्याने वापरात आला. याचा इतका मोठा बिझनेस होईल याचा चैतन्यने विचारही केला नव्हता. पण या कल्पनाही न केलेल्या व्यवसायाने त्यांना प्रचंड काम,नाव आणि पैसे मिळवून दिले. सॅनीटायझेशनची गरज ओळखून त्यांनी सात लाख रुपये गुंतवणूक करून तुर्की वरून नऊ Ultra Low Volume Misting Machines दीड महिन्यात आयात केल्या. त्यानंतर श्री चैतन्य आणि त्यांच्या १० जणांच्या टीमचे कोरोना विरुद्धचे युद्ध सुरू झाले. गेल्या दीड वर्षात त्यांनी 24×7 सेवा देऊन १२००० पेक्षा जास्त पुणे आणि मुंबईत घरे,ऑफिसेस,बँका, दवाखाने, हॉस्पिटल्स,  कंपन्या,कार्पोरेट्स,अपार्टमेंस, सोसायट्या,इ. ठिकाणी सॅनीटाइज केल्या आहेत आणि विक्रमी काम करून लाखो रुपयांचा व्यवसाय केलेला आहे . यातील १०% व्यवसाय SCGT च्या नेटवर्क मधून झालेला आहे असे ते सांगतात.

सुदैवाने दहापैकी कोणालाही कोरोना झाला नाही. अर्थात कर्मचाऱ्यांची PPE किट वापरात होते आणि सर्व नियमांची काटेकोरपणे पालन करीत होते. खरंतर या कर्मचाऱ्यांच्या धाडसाला दाद द्यायला हवी आणि त्यांचे कौतुकही करायला हवे.


कोणतेही काम छोटे किंवा मोठे , चांगले किंवा वाईट नसते. मिळेल ते काम जर उत्कृष्ट तऱ्हेने केले तर दोन पैकी एक परिणाम होतोच. एकतर तुमच्यामुळे त्या कामाला प्रतिष्ठा मिळेल किंवा त्या कामामुळे तुम्हाला प्रतिष्ठा मिळेल. श्री चैतन्य इंगळे असे सांगतात की,"खरंतर मानव जातीवर असले महामारीचे संकट पुन्हा येऊ नये. पण या संकटाच्या काळात आम्हाला जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली ही मोठी समाधानाची बाब आहे." कोरोनासारख्या या महामारीच्या काळात श्री चैतन्य आणि टीमने केलेले कार्य योध्या सारखे आहे त्यांना दोन्ही हात जोडून प्रणाम. 


प्रेरक,प्रशिक्षक,कथा लेखक-

योगीराज देवकर.

SCGT वाकड चाप्टर,सेक्रेटरी.

मो.9307133134

www.motivationacademy.in

त्रिकाया फूडस्, अक्षय दुसाने & पार्टनर्स

 Saturday Club Global Trust -Wakad Chapter. Success Story-Three.

*सर्वश्री अक्षय दुसाने,कौस्तुभ बाबर,कुणाल क्षीरसागर, अनुक्रमे SCGT-Wakad Chapter चे माजी चेअरमन,माजी ट्रेझरर व CC मेंबर तसेच रोहित माने, ट्रेझरर,SCGT-PCMC Chapter यांचे जॉईंट व्हेंचर- त्रिकाया फूड्स प्रा. ली .*


कोव्हीड-19 मुळे लोकांच्या वाट्याला आलेल्या लॉक डाउनचा परिणाम म्हणून आर्थिक किंवा व्यावसायिक नुकसान झाले नाही असे उदाहरण अभावानेच सापडेल . श्री अक्षय दुसाने यांचे A Loaf Story Multicuise Sandwich Outlet देखील यास अपवाद ठरले नाही. जानेवारी २०२० मध्येच त्यांनी भाडेतत्वावर असलेल्या जागेतील आऊटलेटचे सहा लाख रुपये खर्चून नूतनीकरण केले होते. लॉक डाउनमुळे १९ मार्चला आऊटलेट बंद करावे लागले. तीन महिन्यानंतर अन लॉक मध्ये ते सुरू केले होते परंतु अल्पप्रतिसादामुळे नुकसानीत चालवावे लागत होते. भाड्याचे काय असेल ते आपण नंतर पाहू, काळजी करू नका,असे म्हणणाऱ्या जागा मालकाने देखील पुढे काही तडजोड केली नाही किंवा सवलतही दिली नाही. आऊटलेट तोट्यात चालविण्यापेक्षा त्यांनी ते बंद करण्याचा निर्णय घेतला. दीड लाख रुपये थकीत भाडे दिले आणि ती जागा सोडली. त्यानंतर A Loaf Story च्या नवीन स्टोरीची सुरुवात झाली.


आऊटलेट चे फर्निचर आणि साहित्य कुठे ठेवायचे हा प्रश्न होता. चापटरच्या एक सदस्या सौ भारती मुरकुटे मॅडम मदतीस उभ्या राहिल्या आणि त्यांनी त्यांच्या युनिटच्या जागेत साहित्य ठेवण्यासाठी 

जागा निशुल्क उपलब्ध करून दिली. त्यांचे मानावेत तितके आभार थोडेच आहेत.


श्री दुसाने यांनी गरजेपुरतेच साहित्य घरी ठेवले होते. श्री अक्षय आणि त्यांच्या पत्नी उत्तम शेफ आहेत . त्यांनी सँडविच, केक,बिर्याणी,इ. ऑर्डर्स घेणे आणि स्वीगी , झुमाटो द्वारा वितरण उपलब्ध केले पण त्यालाही फारसा प्रतिसाद लाभला नाही कारण कोरोनाच्या भीतीच्या सावटामुळे लोकांनी आऊटसाईड फूड घेणे-खाणेच कमी केले होते.


श्री दुसाने यांच्या मनात आपण अजून काय वेगळे करू शकतो हा विचार चालू होता. साहजिकच क्लब मधील इतर मित्रांबरोबर त्यांची चर्चा होत होती. श्री अक्षय दुसाने ( Mob: 7620705231) नावाजलेले शेफ आहेत, त्यामुळे फूड प्रॉडक्ट R&D, प्रॉडक्ट डिझाइन आणि डेव्हलपमेन्ट या त्यांच्या क्षमता आहेत. श्री माने( Mob:9004055858 ) हे CA आहेत, त्यामुळे भांडवल उभारणी आणि व्यवस्थापन ही त्यांची खासियत आहे. श्री बाबर- Versatile Studio Pvt.Ltd.( Mob:9011044280) हे आर्किटेक्ट आहेत, त्यामुळे उद्योगासाठी जागा, शेड उभारणी, बिझनेस डेव्हलपमेंट या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. या तिघांनी एकत्र येऊन *त्रिकाया फूड प्रा.ली.* चे नामकरण आणि नोंदणी केली .श्री क्षीरसागर Globuzz Media (Mob:9766419516) हे पब्लिसिटी आणि मीडिया मॅन आहेत, कोणत्याही उद्योगाला लोकल ते ग्लोबल पोहचविण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत ,तेही त्यांना जॉईन झाले. त्रिकाया ठरलेले नाव तसेच ठेवा असे म्हणून त्यांनी मनाचा मोठेपणा दाखविला आहे. 


दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर Box of Happiness- Premium Handmade Designers Chocolate अशा कार्पोरेट गिफ्ट प्रॉडक्टने या व्यवसायचा श्रीगणेशा केला. गोल्ड आणि प्लॅटिनम असे व्हेरिएंट चाँकलेट कार्पोरेट गिफ्ट्सची  जाहिरात केली आणि ३००० बॉक्सेसच्या ऑर्डर्स मिळाल्या. यातल्या ९० टक्के ऑर्डर्स या केवळ Saturday Club मधील मेंबर्स ने दिलेल्या रेफेरन्स मुळे मिळाल्या होत्या. HDFC, Iffco Tokyo, K P Transport, अशा बऱ्याच कंपनीच्या ऑर्डर्स SCGT च्या नेटवर्क मुळेच मिळाल्या. त्रिकाया ला दिवाळीपूर्वी ऑर्डर्स पूर्ण करायला फक्त पंधरा दिवस मिळाले, त्यामुळे ते १८०० बॉक्सेस वितरित करू शकले आणि यामधून 296000 ₹ चे डन डिल्स झाले. चाँकलेटची चव सर्वांना इतकी आवडली की  HDFC तर पुढील वर्षीचे ऍडव्हान्स बुकिंग करून ठेवले आहे.


श्री अक्षयच्या घरी दिवाळीपूर्वी १५ दिवस चाँकलेटस बनविणे आणि त्याचे पॅकेजिंग करणे हे काम दिवस- रात्र चालू होते. विशेष बाब म्हणजे प्रॉडक्ट पॅकेजिंगसाठी अक्षयची फॅमिली तर होतीच , पण कुणालची बहीण, कौस्तुभचे वडील, रोहितच्या आई दररोज एकत्र जमत होते आणि मध्यरात्रीपर्यंत कामात मदत करीत होते. अगदी 'हम हैं राही प्यारके ,' चित्रपटात घेतलेल्या ऑर्डर्स वेळेत पूर्ण करण्यासाठी जसे भारलेले वातावरण होते तसेच वातावरण दुसाने यांच्या घरात तयार झाले होते . सर्वांच्या कायम स्मरणात राहील असा हा सुखद प्रसंग होता.


त्रिकाया फूड्स प्रा.ली. ही कंपनी लवकरच स्वतःच्या जागेत उभारण्यात येणार आहे . सध्या ते *एक्सप्रेस वडा-पाव* असे ब्रँड नेम ठरलेल्या प्रॉडक्टवर संशोधन करीत आहेत आणि Tuv Nord Pune या लॅब मध्ये प्रॉडक्ट टेस्टिंग सुरू आहे. शेफलेस बिझनेस अशी ही कन्सेप्ट आहे. याकरिता फ्रांचायजी नेटवर्क उभे केले जाईल आणि त्यांना सेंट्रलाईज्ड किचन मधून वैशिष्ट्यपूर्ण वडा वितरित केला जाईल. फ्रांचायजीने तो फक्त फ्राय करून सर्व्ह करायचा . कमीत कमी भांडवल गुंतवणुकीत जास्तीत जास्त प्रॉफिट मार्जिन मिळवून देणारे हे फ्रांचायजी बिसनेस मॉडेल असेल. कंपनीत वडा तयार झाल्यानंतर तो कूल कंडिशन मध्ये ठेवला जाईल. वातानुकूलित वाहनातून त्याची वाहतूक होईल आणि फ्रांचायजी कडे फ्रीझ मधेच साठविला जाईल. वड्याचे सेल्फ लाईफ जास्त असेल परंतु त्यात प्रिझरव्हेटिव्हीज नसतील. ग्राहकाने वडा कुठेही खाल्ला तरी त्याची चव,आकार,हेल्दी मटेरियल आणि आस्वाद एकसारखच असेल.


त्यापुढे चाट,व्हेज,नॉनव्हेज प्रॉडक्ट्स एकएक करून लॉन्च केले जाणार आहेत. याचे डिजिटल प्लॅटफॉर्मवर येण्यासाठी आवश्यक ते काम आघाडीवर आहे आणि महिनाभरात ते सर्वांना व्हिजिबल होईल. 


श्री दुसाने यासर्व घडामोडीचे श्रेय SCGT चे संस्थापक कै. माधावरवजी भिडे सर यांना देतात. त्यांच्यामुळेच हे क्लब , नेटवर्क आणि मित्रवर्ग निर्माण झाला आहे. श्री दुसाने पुण्यातल्या पहिल्या क्लब पासून क्लबचे मेंबर आहेत. ते म्हणतात , "श्री स्वप्नील कुलकर्णी हे PCMC रिजनल हेड आहेत. ते अतिशय उत्साही, कार्यक्षम आणि क्लब डेव्हलपमेन्टच्या बाबतीत आक्रमक भूमिका बजावतात . आमच्या प्रगती बाबत बोलताना त्यांचा मिळणारा ऍक्टिव्ह  सपोर्ट आम्ही विसरुच शकत नाही."


SCGT क्लबचे   चेअरमन, सेक्रेटरी,ट्रेझरर म्हणजे CST हे कोणत्याही क्लबचा कणा असतात . अशा पदांवर कार्यरत  पदाधिकारी स्वतःचा व्यवसाय करतकरत इतरांना पण व्यवसाय वाढीसाठी सर्वतोपरी सहाय्य करतात. पुण्यातल्या दोन SCGT चापटर मधील दिग्गज पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन जर असे जॉईंट व्हेंचर उभे केले तर ते नावारूपाला येणारच आणि शिवाय याची चर्चा पण होणारच.


कथा लेखक- योगीराज हरिश्चंद्र देवकर. Saturday Club -Wakad Chapter. Secretary.

Mob: 9307133134.

www.motivationacademy.in

Oh My Homes, Vijay Navale & partners.

 *पुणे किंवा पिंपरी चिंचवड मध्ये घर,जागा किंवा कमर्शियल प्रॉपर्टी शोधताय ?*


OH MY HOMES सेवेसाठी तत्पर आहे ना !


Saturday Club Global Trust (SCGT) वाकड चाप्टर. यशोगाथा क्रमांक चार.


नदीसारखी कोणत्याही गोष्टीची सुरुवात लहानच होते. जसजसा प्रवास होतो तसतसा ती गोष्ट मोठमोठी होत जाते. रिअल इस्टेटच्या क्षेत्रात पुण्यात उदयाला आलेलं एक नवं नाव OH MY HOMES ( Partnership firm) चा प्रवास आता सुरू झाला आहे.


सर्वश्री बालाजी आयनूले,विजय नवले,गौरव गायकवाड आणि निलेश कुलकर्णी पुण्यात स्वतःसाठी एक जागा पहायला गेले होते. "आपल्यासारखीच इतरांचीपण  जागा शोधण्यात अडचण होत असेल ,त्यावर आपणच उपाय शोधला तर!" असा विचार निलेश कुलकर्णी यांनी बोलून दाखविला आणि प्रत्येकाचा स्वतंत्र व्यवसाय असूनही एकत्र येऊन त्यांनी नवीन व्यवसाय सुरू करायचे ठरविले. जागा विकत घ्यायची,प्लॉट करायचे आणि ते विकायचे पण याला जास्त भांडवल लागेल म्हणून हे पुढील टप्प्यात करायचे असे ठरले आणि सध्या घरे,जागा,कमर्शियल प्रॉपर्टी असा रिअल इस्टेटचा व्यवसाय सुरू करायचा हे निश्चित झाले.


SCGT प्रत्येक चाप्टर मध्ये विविध प्रकारचे व्यवसाय करणारे उद्योजक असतात. चाप्टर मेंबर सौ भारती मुरकुटे मॅडम मुळ पुणेकर नाव त्यांच्यामुळे ऑफिसला जागा शोधणे आणि मिळणे सोपे झाले. त्याशिवाय त्या फर्मच्या पाचव्या पार्टनरही झाल्या त्यामुळे फर्मला बळकटी मिळण्यास मदतच झाली. चाप्टर मेंबर श्री कुणाल क्षिरसागर, ग्लोबस मीडिया, यांनी अभ्यासकरून फर्मचे नाव सुचविण्यापासून ते ब्रँडिंग करण्यापर्यंत सर्वतोपरी  सहाय्य केले आणि OH MY HOMES हे नाव डिजिटल आणि सोशिअल मीडियात झळकले.


पुणे,पिंपरी चिंचवड मध्ये शिक्षण,नोकरी,वास्तव्य,  व्यवसायच्या निमित्ताने आलेल्या प्रत्येकालाच स्वतःचे हक्काचे घर,जागा किंवा कमर्शियल प्रॉपर्टी पाहिजे असते. कोणताही ग्राहक जेव्हा ऑफिसमध्ये येईल तेव्हा त्यांच्या गरजांचा सविस्तर अभ्यास करणे ,त्यानुसार अनेक प्रॉपर्टीचा शोध घेणे आणि विविध उपलब्ध पर्यायांची माहिती त्यांना देणे , त्यातल्या सुयोग्य अशा ३-४ प्रॉपर्टीज प्रत्येक्ष दाखविणे ,प्रॉपर्टीजशी निगडित कागदपत्रांपासून ते कर्जापर्यंतची सेवा एकाच छत्राखाली देणे , ग्राहकांचा व्हिजिट्स, धावपळीचा वेळ वाचविणे , लवकर निर्णय  होण्यास सहाय्य करणे, ग्राहकांची होणारी फसवणूक टाळणे,अशा उदात्त हेतूने OH MY HOMES ची निर्मिती झालेली आहे असे हे सर्वजण सांगतात. कारण या पाच जणांमध्ये जमीनदार, प्रवास, वाहतूक व्यावसायिक,   फर्निचर उत्पादक, विमा सुरक्षा पुरविणारे,कर्ज उपलब्ध करणारे असे सगळ्याप्रकारचे नेटवर्क असलेले भागीदार आहेत.


ओह माय होम्स. ऑफिस नंबर ००७ . ४था मजला. साई हेरिटेज. बालेवाडी फाटा. बाणेर. पुणे ४११०४५ या पत्यावर दहालाख रुपये खर्च करून १३५० चौ.फु.चे सुसज्ज ऑफिस तयार करण्यात आले आहे. सौ भारती मुरकुटे मॅडम यांच्या रागा ग्रुपने फर्निचर आणि सजावट केली आहे. स्वागत कक्ष,कॉन्फरन्स रूम,वेटिंग लॉबी,वर्क एरिया, केबिन्स, इ. सगळं कसं आटोपशीर बनविले आहे. २८ फेब्रुवारी २०२१ यादिवशी SCGT चे सेक्रेटरी जनरल श्री प्रदीप मांजरेकर सरांच्या शुभहस्ते १५०-२०० मान्यवर स्नेहजनांच्या उपस्थितीत टुमदार उदघाटन सोहळा पार पडला.चाप्टर मेंबर शेफ श्री अक्षय दुसाने यांनी अल्पोपहार व्यवस्था केली होती.


ला व्हीला, सॉलिडीअर,

व्हिटीपी रिऍलिटी,इ. या आघाडीच्या बांधकाम व्यावसायिकांसोबत व्यावसायिक करार करण्यात आले आहेत आणि काही करार पाईप लाईन मध्ये आहेत. ऑफिसच्या उदघाटनानंतर  महाराष्ट्रात 

पुन्हा दुसरा लॉक डाउन झाला तरीपण बरेच प्रस्ताव आता अंतिम टप्प्यात आले आहेत ही समाधानाची बाब आहे. ग्राहकाला जर बिल्डरकडे फ्लॅट घ्यायचा असेल तर ओह माय होम्सला वेगळे सेवाशुल्क द्यावे लागत नाही. जुनी,रिसेल प्रॉपर्टी घ्यायची असेल तर प्रोफेशनल पद्धतीने व्हॅल्यूएशन केले जाते आणि मध्यस्थी करून देणारा आणि घेणारा दोघांनाही परवडेल असा विन-विन मार्ग काढला जातो.


SCGT ही एक NGO आहे. ओह माय होम्सचे पाचही भागीदार SCGT वाकड चाप्टरचे मेंबर आहेत. हाताच्या पाच बोटांनी एकत्र येऊन मूठ आवळून ताकद वाढवावी असाच प्रकार या एकापेक्षा दुसरा सरस असणाऱ्या पाच भागीदारांनी केलेला आहे. त्यांची माहिती थोडक्यात-


एक- श्री बालाजी आयनूले. Advicrest Financial Services.(8888469660)

 ११ वर्षांचा अनुभव.४००० समाधानी ग्राहक.LIC,Star Health Insurance,IIFC,New India,etc. सोबत टायप. १२ वेळा MDRD, ३५ नॅशनल अवॉर्डस ,फायनान्शिअल प्लांनिंगसाठी लोक आवर्जून यांची सेवा पसंत करतात.

दोन- श्री विजय नवले.Liyan Clean & Care pvt.ltd.(9850959516) पिंपरी चिंचवड मधील स्थानिक जमीनदार आणि उद्योजक . इंडस्ट्री आणि रेसिडेंसियल क्लिनिंग उत्पादनांचे उत्पादक. यांच्या नेटवर्कमध्ये २-३हजार लोक सहज असतील.

तीन- श्री गौरव गायकवाड. Cononical Consultants pvt.ltd.(8855826287) होम आणि कमर्शियल करीता लोनची सुविधा पुरवितात. HDFC ,ICICI,SBI,AXIS Bank ,LIC housing finance,L&T housing finance,इ.संस्थांशी टायप आहे. योग्य मार्गदर्शन आणि तत्पर सेवा ही यांची खासियत आहे.शेकडो समाधानी ग्राहक ही यांची कमाई.

चार- श्री निलेश कुलकर्णी. Aakanksha Holidays & Logistics pvt.ltd.(8087830007) शापुरजी पालनजी यांच्याकडून बेस्ट व्हेंडॉर प्रमाणपत्र प्राप्त. कंपनीच्या स्वतःच्या १० बसेस आहेत. कार्पोरेट क्षेत्रात उत्तम कामगिरी. चांगलं बोलणं, माणसं जोडणं,हे यांचे विशेष गुण.

पाच- सौ भारती मुरकुटे.Raga Group.(9881171657) पिरंगुट येथे फर्निचर निर्मिती कारखाना. रेसिडेंसियल आणि कमर्शियल फर्निचर मध्ये क्वालिटीमुळे  नाव कमावले आहे. 


SCGT हा उद्योजकांचा असा एक प्लॅटफॉर्म आहे जिथे प्रत्येक क्लब मध्ये अनेक उद्योजक एकत्र येतात ,एकमेकांना सहाय्य करतात आणि सक्सेस स्टोरीज तयार होतात. वाकड चाप्टरच्या पाच जणांनी एकत्र येऊन भागीदारीत सुरू केलेला हा व्यवसाय हे वाकड चाप्टरचे अजून एक यश आहे. यशाची ही शृंखला अशीच चालू राहील याची खात्री आहे.


प्रेरक,प्रशिक्षक आणि लेखक- योगीराज देवकर.

SCGT वाकड चाप्टर,सेक्रेटरी.

www.motivationacademy.in