Monday 6 June, 2022

Hon PM से प्रभावित वन मिनिट बिझनेस प्रेझेंटेशन

 आजका वन मिनिट Hon PM से प्रभावित.


मित्रो !

अच्छे दिन आने वाले हैं l

लेकिन इसके लिये,

सबका साथ - सबका विकास,

सबका विश्वास - सबका प्रयास l

जरुरी हैं l


आपके SCGT वाकड चॅप्टर के मेंबर  योगीराज देवकर जी और उनका मोटीव्हेशन अकॅडेमी लोगोमें बदलाव लाने का बहुत बडा काम कर रहा हैं l


उनकी ' उद्योगी, मेहनती, व्यक्तिमत्व विकास ' ये किताब आप पढिये l

आप जान जाओगे कि,

कडी मेहनत कभी थकान नहीं लाती वह संतोष लाती हैं l


आपके यह देवकर जी,

Industrious Motivation .

Soft Skills और

Organization Development,   इन  टॉपिकपे घमासान ट्रेनिंग देते हैं ।


योगीराज देवकर जी को 1994 में भारत सरकारने 'बेस्ट आंत्रप्रेनेर ट्रेनर' पुरस्कारसे नवाजा गया हैं l 


क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी,

राज ग्रुप, क्यूबिक्स ऑटोमेशन , कूल फौंडेशन, MCED, MITCON यहाँपर उनका बार बार ट्रेनिंग होते रहता हैं ।


उनका USP हैं, की,

" सिर्फ ट्रेनिंग ही नहीं , वो ट्रेनी के लिये आत्मपरीक्षण का समय होता हैं ।"


अभि पिछले हप्ते वो ट्रेनिंग के लिये M U कॉलेज ऑफ कॉमर्स गये थे ।


" खुद प्रेरित रहो और दुसरोंको प्रेरित करो !" यह उनका स्लोगन हैं l


माना कि अंधेरा घना हैं,

लेकीन दिया जलाना कहा मना हैं l


अब आपके पहचान में  जितनेभी उद्यमी हैं , कॉलेजेस हैं , ऑर्गनायझेशन्स हैं, उनके रेफेरेन्सस इन्हे देदो ।


जरा फुरसत निकालके देवकर जी के साथ 1 to 1 करो और www.motivationacademy.in को व्हिजिट करो l


दीपक कि लौ के समान उपर उठना हममे से हर एक कि स्वाभाविक वृत्ती हैं, आइये इस वृती को विकसित करे l


बोलो, भारत माता कि !जय!

31 मे 2019 निवृत्ती निमित्ताने चार शब्द

 नमस्कार !        


निवृत्ती निमित्त दोन-चार शब्द .


वक्तृत्वकला,उपक्रमांचे आयोजन करण्याची आणि प्रवासाची आवड या गुणांमुळे नोव्हेंबर १९८५ मधे मिटकॉन मधे भविष्यात येणाऱ्या एम.सी.इ.डी.साठी माझी निवड झाली.


व्याख्याने द्यायला विषय हवेत म्हणून मी 'सिद्धी प्रेरणा प्रशिक्षण' या विषयाची निवड केली आणि खूप मेहनत घेऊन हा विषय तयार केला .या विषयाचे मराठी लहान पुस्तक तयार केले आणि १९८७ मधे स्वतःच्या लोणी देवकर या गावात हा कार्यक्रम राबवून या विषयाचा श्रीगणेशा केला. पुढे यथावकाश मी 'उद्योजकता', 'उद्योग संधी शोधा म्हणजे सापडेल','व्यवसायिक उद्योजकता', इ. पुस्तकांचा लेखक झालो.श्री.विश्वास देवकर, श्री.शशीकांत कुंभार यांनी पहिल्या पुस्तकाचे तर श्रीमती आनंदी कुलकर्णी यांनी दुसऱ्या पुस्तकाचे शब्दांकन केले आणि श्री. डॉ.श्रीपाद कडवेकर सर,डॉ.रवींद्र कोठावदे,यांनी मला तिसऱ्या पुस्तकासाठी  सहलेखक होण्याचा मान दिला. 


सिद्धी प्रेरणा प्रशिक्षण हा एक कार्यक्रम ३ दिवसांचा असतो आणि कार्यक्रमात ३० प्रशिक्षणार्थी असतात.असे मी महाराष्ट्रात ६०० पेक्षा अधिक कार्यक्रम घेतले आहेत .

याचाच अर्थ मी १८०० दिवस कार्यक्रम घेऊन १८००० प्रशिक्षणार्थींना उद्योजकतेचे धडे दिले आहेत. वर्षाचे २६० कामाचे दिवस गृहीत धरता मी जवळपास ७ वर्षे फक्त या एकाच विषयावर पूर्णवेळ व्याख्याने दिलेली आहेत. या प्रदीर्घ अनुभवामुळे या विषयाची माझी उत्तम तयारी झालेली आहे असे मला नमूद करावेसे वाटते.या योगदानामुळेच मला भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे 'उत्कृष्ठ प्रेरक प्रशिक्षक' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि इतरही अनेक मान सन्मान मिळाले.


या शिवाय व्यक्तिमत्व विकास, Business Opportunity Search & Scanning ( BOSS), संस्था विकास (OD), विपणन व्यवस्थापन,

कश्यासाठी कोणाकडे सम्पर्क , जीवन कौशल्य(Soft Skills ), प्रेरणा,इ. माझे आवडीचे विषय आहेत. या विविध विषयावर मी राज्यभरात हजारो व्याख्याने दिलेली आहेत आणि काही लाख लोकांपर्यंत हे विषय पोहोचवले  आहेत.


नोकरीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यात आणि बहुतेक तालुक्यात,भारताच्या अनेक राज्यात,परदेशात इंग्लंड,युरोप,इ.ठिकाणी मला प्रवासाची संधी मिळाली .


कार्यक्रमांसाठी व्याख्याता म्हणून मला निमंत्रित केलेले प्रकल्प अधिकारी, कार्यक्रम समनव्यक, शिक्षण संस्था,कार्यक्रम पुरस्कर्ते संस्था,उद्योग विभाग-महाराष्ट्र शासन ,माझ्या प्रशिक्षणातून निर्माण झालेले शेकडो नवउद्योजक, औद्योगिक संघटना आणि सहभागी प्रशिक्षणार्थी, इ.यांचा मी खूप खूप आभारी आहे आणि विशेषतः परमेश्वराचा मी खास आभारी तसेच ऋणी आहे की त्याने माध्यम म्हणून या कामासाठी माझी निवड केली.


एम.सी. इ. डी. तर्फे 'उद्योजकीय मराठी साहित्य संमेलनाचे' आयोजन करण्यात आले होते, त्यापैकी पुणे आणि कराड (सातारा) येथे पार पडलेल्या संमेलनाच्या आयोजनाची जबाबदारी माझ्याकडे होती .या घटना आठवत असताना डॉ. भा.रा.साबडे,कराडची पतसंस्था यांची देखील आठवण होत आहे.


महाराष्ट्र टाइम्स,सकाळ,

लोकमत,सागर,रत्नागिरी टाइम्स,लोकसत्ता,इ.वर्तमान

पत्रातून माझे अनेक लेख प्रकाशित झाले, E TV मराठी चॅनलने माझे १०-१२ एपिसोड प्रसारित केले, त्या सर्वांचा मी आभारी आहे.


श्री.प्रभाकर देशमुख साहेब, तत्कालीन जिल्हाधिकारी, पुणे यांच्या पुढाकारातून आणि श्री एस.एस.सुरवसे साहेब, तत्कालीन महाव्यवस्थापक, जि.उ.केंद्र, पुणे यांच्या साहाय्याने पुणे जिल्ह्यात राबवलेली 'राजश्री शाहू स्वरोजगार योजना' , महाराष्ट्र शासनातर्फे मराठवाड्यात राबविलेल्या 'रिटेल मॅनेजमेंट योजना ',एम.सी.ए.इ.आर. पुरस्कृत 'कृषी उद्योजकता कार्यक्रम'  

इ. प्रकल्प माझ्या कार्यातील विशेष उल्लेखनीय बाबी आहेत.श्री. जितेंद्र जोशी यांची रिटेल उपक्रम तर श्री. परकाळे साहेब, श्री. व्ही.डी. पाटील यांची कृषी उपक्रम  राबविण्यात मोलाची मदत झाली. 


सुरुवातीस प्रकल्प अधिकारी पदावर असताना ठाणे,

पुणे,नांदेड,रत्नागिरी,

बारामती येथे दीर्घकालीन उद्योजकता विकास कार्यक्रम आयोजित केले .त्यानंतर मला पुणे विभागात विभागीय अधिकारी या पदावर खूप वर्षें काम करण्याची संधी लाभली,त्यानंतर दोनदा मराठवाडा विभाग ,आणि शेवटी मुंबई विभागात काम केले. या काळात तेथील प्रकल्प अधिकारी,कार्यक्रम समन्वयक,स्टाफ आणि सहाय्यक संस्था यांचे मौलिक सहकार्य लाभले. त्या सर्वांचा मी आभारी आहे.


मा.विभागीय आयुक्त,श्री. प्रभाकर करंदीकर साहेब,अनेक मा.जिल्हाधिकारी विशेषतः सर्वश्री,साहेब आणि मा .अमिताभ राजन, रमेशचंद्र कानडे ,श्रीनिवास पाटील,इ. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.विशेषतः राजेंद्र पवार, रमेश देवकर, इ. विकास आयुक्त उद्योग, विशेषतः यशवंत भावे, जयंत कावळे,इ. यांच्या नेतृत्वाखाली उपक्रम राबवण्याची संधी मला लाभली.अनेक मा.ना.मंत्री, खासदार,आमदार,शिक्षण तज्ञ,उद्योग विकास संस्था अधिकारी,समाजसेवक, अनेक साहित्यिक,उद्योजक स्व.बी.जी.शिर्के साहेब, श्री. सुभाषजी दांडेकर, स्व.गजाननजी पेंढारकर,

श्री.राजकुमारजी चोरडिया,श्री.विशाल चोरडिया आणि चोरडिया कुटुंबीय, राज ग्रुप चे श्री. कदम साहेब आणि श्री.निंबाळकर साहेब,श्री. राम भोगले साहेब,श्री. परशुरामभाऊ चितळे, मानसशास्त्रज्ञ स्व.मनोहर नाडकर्णी,

स्व.डॉ.राम कुलकर्णी, डॉ.एम.यु.देशपांडे,

डॉ.सुधीरजी गव्हाणे सर,

स्व.आप्पासाहेब पवार,श्री. शिवराज गोर्ले, स्व.जयंत रानडे,मा.श्री. आण्णा हजारे,मा.कार्यकारी   संचालक,एम.सी.इ.डी. श्री.बी.व्ही.राठोड आणि इतर सर्व माजी व आजी का.सं; संस्थेतले अनेक कार्यक्रम आयोजक,प्रेरक प्रशिक्षक सर्वश्री दत्ता मुळे, शेरखान पठाण,विलास आहेर,दीपक भिंगरदेव,संजय भामरे,सुबोध बायस,सुरेश उमाप, विशेषतः माझे बॅच मेट सर्वश्री राजकुमार फटाटे,

सुनील चांडक,अरुण गाट ,'उद्योजक' विभाग,आणि एम.सी.इ.डी.मधील स्टाफ,इ.तसेच माझा मित्र श्री.उन्मेष गायधनी ,या सर्वांचा सहवास मला लाभला , यांच्याकडुल मला खूप,खूप शिकायला मिळाले आणि माझे व्यक्तिमत्व घडत गेले .या सर्वांचा मी शतशः आभारी आहे.


मला अनेक संस्थांतून प्रशिक्षणाची संधी लाभली,EDI-I, अहमदाबाद, NISBUD आणि ASEED दिल्ली, रांची,कोडाई कॅनॉल,गुवाहाटी, इ.येथील उद्योजक विकास संस्था,FORMAPER - मिलान,इटली, या संस्थांची मला आठवण होत आहे.या संस्थांशी संबंधित  डॉ.व्ही.जी.पटेल,डॉ.सी. एच.पाठक,श्री.रमेश दवे,श्री.अजय दीक्षित,

डॉ.एम.एम.पी.अखोरी,डॉ.

एन.पी.सिंग,डॉ.उदय पारेख, अश्या अनेकांचा मी खूप खूप आभारी आहे.


सुदैवावे श्री. सुरेश रानडे साहेब मला पहिले बॉस म्हणून लाभले. उत्कृष्ठ सल्लागार,प्रशिक्षक,

उपदेशक,वक्ता,अभ्यासू , उत्साही आणि उद्योजकता विकासाची हृदयापासून  तळमळ अश्या अनेक गुणांचे ते रसायन आहेत. त्यानंतर लाभलेल्या प्रत्येक बॉस मधे मी श्री. रानडे शोधत राहिलो.


गेल्या ३४ वर्षांच्याकाळात मी खूप चढ-उतार पाहिले.

संस्थेत मी कायम महत्वाकांक्षी राहिलो आणि ही महत्वाकांक्षा मी कधी लपवून ठेवली नाही. संस्थेच्या स्थापनेच्या वेळी करंदीकर कमिटी रिपोर्ट तयार केला होता. त्यात चीफ प्रोजेक्ट ऑफिसर असे एक पद होते.१२ वर्षानंतर यापदावरील अधिकाऱ्यास संस्था प्रमुख होण्याची संधी होती.पुढे दोन  कार्यकारी संचालकांनी दोनदा रिपोर्ट मधे बदल मंजुर करून घेतले. यामुळे प्रोमोशन मधे अनेक अडचणी वाढल्या .


मध्यंतरी ९ महिने मला के.व्ही.आय.बी. कडे प्रतिनियुक्तीवर काम पाहण्याची संधी लाभली आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री.रमेश देवकर साहेब आणि त्यांचे अधिकारी वर्ग जे नंतर माझे चांगले मित्र झाले असे सर्वश्री.धर्मेंद्र काळोखे,पी.के.सावंत,आनंद कर्णिक यांच्या सोबत कार्य करण्याचा योग आला. त्या सर्वांचा मी आभारी आहे.


या सर्व प्रवाहात मला माझी पत्नी सौ.अनिता आणि मुलगा चि. अमेय यांची उत्तम साथ लाभली. तसेच सर्व देवकर कुटुंबीय आणि विशेषतः थोरले बंधु श्री कालिदास देवकर यांचे सहकार्य लाभले .यासर्वांचा मी आभारी आहे.


माझ्या कारकिर्दीच्या यशात अनेकांचा वाटा आहे, सर्वांचाच नामोल्लेख करणे शक्य नाही.नामोल्लेख नाही म्हणून कोणी नाराज होऊ नये अशी विनंती . प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष ज्यांचे ज्यांचे सहकार्य लाभले त्या सर्वांचे मी आभारी आहे.


उद्योजकता विकास चळवळ, संस्थेतील कर्मचारी आणि संस्थेच्या भविष्यासाठी मी मनापासून शुभेच्छा देतो .


३१ मे २०१९ रोजी मी निवृत्त होत आहे. शेवटी पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानून मी आपली रजा घेतो.


धन्यवाद !

योगीराज देवकर .