Thursday 28 October, 2021

कोजागिरी स्पेशल फॅमिली डे.

 

*कोजागिरी स्पेशल फॅमिली डे Presented by Saturday Club Global Trust- PCMC Region.*


SCGT म्हणजे उद्योजक सभासदांसाठी नवनव्या संकल्पना राबविणारा ट्रस्ट  .  उद्योजकांच्या कुटूंबियांना पण Network is Networth चे महत्व कळावे यासाठी हा कौटुंबिक सोहळा आयोजित केला होता. रिजन हेड, तीनही चाप्टरचे CST आणि इव्हेंट सपोर्ट टीम तयारीला लागल्या. इव्हेंट यशस्वी करण्यात विशेष मेहनत घेतली ती सौ मधुरा चिपडे मॅडम आणि श्री संजय पाटील यांनी. त्यांना मोलाची साथ लाभली ती श्री नीरज सर, श्री श्रीकांत यादव आणि सौ भारती मुरकुटे मॅडम यांची.


२० ऑक्टोबर २०२१ रोजी कुंदन गार्डन,बाणेर रोड,पुणे येथे ६.३० वाजता हा कार्यक्रम सुरू झाला आणि २०० पेक्षा अधिक लोकांच्या उपस्थितीत रात्री ११ पर्यंत उत्तरोत्तर रंगत गेला.


PCMC रिजन मधील उद्योजकांना बिझनेस प्रमोट करण्यासाठी खास टेबल स्पेस दिली होती.औंध-बाणेर चाप्टरचे श्री.नीरज कैथवास   - लॅपटॉप आणि IT मटेरिअल्स. श्री.अभय जमदग्नी- आयुर्वेदिक अभ्यंग किट. श्री.ढेरे गुरुजी- पूजा साहित्य आणि कंदील. सौ. गौरी जोशी- सोप्स . श्री. श्रीकांत माडगे- स्टॉक मार्केट. श्री.गजानन जाधव- ज्वेलरी. PCMC चाप्टरचे सौ.आश्विनी साळुंखे- केक्स. सौ.नीलम राजपूत- सेंद्रिय उत्पादने. सौ. मानसी अग्रवाल. श्री सागर हरपुडे. यांनी त्यांची उत्पादने प्रमोट करण्याची संधी साधली आणि कौटुंबिक कार्यक्रमात व्यावसायिक वातावरण निर्मिती केली.


श्री स्वप्नील कुलकर्णी प्रास्ताविकात म्हणाले की,"मुलांचे बाबा किंवा आई SCGT क्लबची मीटिंग अटेंड करायला जाते, 1 to 1 किंवा क्लब इव्हेंट्स साठी बाहेर पडते, तेव्हा ते तिथे जावून नक्की करतात तरी काय ? हा प्रश्न घरातल्या लहानग्यांना पडत असेल. यानिमित्ताने हा क्लब उद्योजकांसाठी नक्की काय काम करतो हे जर समजले तर त्यांचे कुतूहल पूर्ण होईल. कुटुंबातील सर्वांनाच क्लबचे कार्य आणि उद्योजकांसाठी नेटवर्किंग कसे महत्वाचे आहे हे समजले तर त्यांचाही उद्योजकांना पाठिंबा लाभेल, या हेतूने हा कोजागिरी स्पेशल फॅमिली  डे आयोजित केला आहे. आज येथे लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी काही न काही सरप्राईज आहे त्यांचा सगळ्यांनी आनंद घ्यावा."


लहानग्यांसाठी मॅजिक शो ने कार्यक्रमास सुरुवात झाली. मॅजिक शो सोबतच लहान मुलांची कृती आणि प्रश्नांना दिलेली निरागस उत्तरे यामुळे जे प्रासंगिक विनोद निर्माण झाले त्यामुळे लहान-थोर सगळेच खळाळून हसले.


त्यानंतर वाकड, औंध-बाणेर आणि PCMC चाप्टरच्या चेअरमन,सेक्रेटरी आणि ट्रेझरर यांनी प्रेसेंटेशन्स दिले. यात कोणी टीमची ओळख करून दिली,तर कोणी How Network is Networth चे महत्व सांगितले,तर कोणी आकडेवारी जाहीर केली,तर कोणी चक्क सक्सेस स्टोरीज सांगितल्या. हे सर्व चालू होते तेव्हा मोठे लक्ष देऊन ऐकत होते तर छोटे हॉल मध्ये खेळत आणि दंगा करत होते,यामुळेच आपण म्हणतो लहानपण देगा देवा.


नंतर फन ऍक्टिव्हिटीज घेतल्या गेल्या आणि धमाल केली ती आई-मुलांच्या फॅशन शो आणि कॅट वॉकने. पहिला नंबर मिळविण्यासाठी आई-मुलांची पूर्वतयारी आणि स्ट्रॅटेजी आणि स्टेजवरील प्रदर्शन एकदम लाजबाब होते.


डान्स करायला कोणाला नाही आवडत. हॉल मध्ये गाण्याची धून वाजू लागली आणि कोणी स्टेजवर जाऊन तर कोणी खुर्चीत बसूनच ठेका धरला.


शेवटी पोटपूजेसाठी पाव-भाजी, पुलाव आणि त्यानंतर मसाला दूध असा मस्त बेत होता ज्याचा सगळ्यांनी आस्वाद घेतला.


अशा कार्यक्रमामुळे लहान मुलांवर नकळत उद्योजकतेचे संस्कार होतील आणि यातूनच वारसदार तयार होतील हे नक्की. 


उद्योग तर आपल्यापैकी प्रत्येकजण  करतच आहे पण  थोडा चेंज,थोडा विरंगुळा, थोडी मस्ती प्रत्येकालाच हवी असते. त्यात कुटुंब सोबतीला असेल तर यशाचा मार्ग सुलभ होईल.


धन्यवाद SCGT.


योगीराज देवकर.

लेखक,प्रेरक,प्रशिक्षक.

ब्लॉग रायटर.

PCMC Region.

www.motivationacademy.in


No comments: