Monday 4 October, 2021

त्रिकाया फूडस्, अक्षय दुसाने & पार्टनर्स

 Saturday Club Global Trust -Wakad Chapter. Success Story-Three.

*सर्वश्री अक्षय दुसाने,कौस्तुभ बाबर,कुणाल क्षीरसागर, अनुक्रमे SCGT-Wakad Chapter चे माजी चेअरमन,माजी ट्रेझरर व CC मेंबर तसेच रोहित माने, ट्रेझरर,SCGT-PCMC Chapter यांचे जॉईंट व्हेंचर- त्रिकाया फूड्स प्रा. ली .*


कोव्हीड-19 मुळे लोकांच्या वाट्याला आलेल्या लॉक डाउनचा परिणाम म्हणून आर्थिक किंवा व्यावसायिक नुकसान झाले नाही असे उदाहरण अभावानेच सापडेल . श्री अक्षय दुसाने यांचे A Loaf Story Multicuise Sandwich Outlet देखील यास अपवाद ठरले नाही. जानेवारी २०२० मध्येच त्यांनी भाडेतत्वावर असलेल्या जागेतील आऊटलेटचे सहा लाख रुपये खर्चून नूतनीकरण केले होते. लॉक डाउनमुळे १९ मार्चला आऊटलेट बंद करावे लागले. तीन महिन्यानंतर अन लॉक मध्ये ते सुरू केले होते परंतु अल्पप्रतिसादामुळे नुकसानीत चालवावे लागत होते. भाड्याचे काय असेल ते आपण नंतर पाहू, काळजी करू नका,असे म्हणणाऱ्या जागा मालकाने देखील पुढे काही तडजोड केली नाही किंवा सवलतही दिली नाही. आऊटलेट तोट्यात चालविण्यापेक्षा त्यांनी ते बंद करण्याचा निर्णय घेतला. दीड लाख रुपये थकीत भाडे दिले आणि ती जागा सोडली. त्यानंतर A Loaf Story च्या नवीन स्टोरीची सुरुवात झाली.


आऊटलेट चे फर्निचर आणि साहित्य कुठे ठेवायचे हा प्रश्न होता. चापटरच्या एक सदस्या सौ भारती मुरकुटे मॅडम मदतीस उभ्या राहिल्या आणि त्यांनी त्यांच्या युनिटच्या जागेत साहित्य ठेवण्यासाठी 

जागा निशुल्क उपलब्ध करून दिली. त्यांचे मानावेत तितके आभार थोडेच आहेत.


श्री दुसाने यांनी गरजेपुरतेच साहित्य घरी ठेवले होते. श्री अक्षय आणि त्यांच्या पत्नी उत्तम शेफ आहेत . त्यांनी सँडविच, केक,बिर्याणी,इ. ऑर्डर्स घेणे आणि स्वीगी , झुमाटो द्वारा वितरण उपलब्ध केले पण त्यालाही फारसा प्रतिसाद लाभला नाही कारण कोरोनाच्या भीतीच्या सावटामुळे लोकांनी आऊटसाईड फूड घेणे-खाणेच कमी केले होते.


श्री दुसाने यांच्या मनात आपण अजून काय वेगळे करू शकतो हा विचार चालू होता. साहजिकच क्लब मधील इतर मित्रांबरोबर त्यांची चर्चा होत होती. श्री अक्षय दुसाने ( Mob: 7620705231) नावाजलेले शेफ आहेत, त्यामुळे फूड प्रॉडक्ट R&D, प्रॉडक्ट डिझाइन आणि डेव्हलपमेन्ट या त्यांच्या क्षमता आहेत. श्री माने( Mob:9004055858 ) हे CA आहेत, त्यामुळे भांडवल उभारणी आणि व्यवस्थापन ही त्यांची खासियत आहे. श्री बाबर- Versatile Studio Pvt.Ltd.( Mob:9011044280) हे आर्किटेक्ट आहेत, त्यामुळे उद्योगासाठी जागा, शेड उभारणी, बिझनेस डेव्हलपमेंट या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. या तिघांनी एकत्र येऊन *त्रिकाया फूड प्रा.ली.* चे नामकरण आणि नोंदणी केली .श्री क्षीरसागर Globuzz Media (Mob:9766419516) हे पब्लिसिटी आणि मीडिया मॅन आहेत, कोणत्याही उद्योगाला लोकल ते ग्लोबल पोहचविण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत ,तेही त्यांना जॉईन झाले. त्रिकाया ठरलेले नाव तसेच ठेवा असे म्हणून त्यांनी मनाचा मोठेपणा दाखविला आहे. 


दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर Box of Happiness- Premium Handmade Designers Chocolate अशा कार्पोरेट गिफ्ट प्रॉडक्टने या व्यवसायचा श्रीगणेशा केला. गोल्ड आणि प्लॅटिनम असे व्हेरिएंट चाँकलेट कार्पोरेट गिफ्ट्सची  जाहिरात केली आणि ३००० बॉक्सेसच्या ऑर्डर्स मिळाल्या. यातल्या ९० टक्के ऑर्डर्स या केवळ Saturday Club मधील मेंबर्स ने दिलेल्या रेफेरन्स मुळे मिळाल्या होत्या. HDFC, Iffco Tokyo, K P Transport, अशा बऱ्याच कंपनीच्या ऑर्डर्स SCGT च्या नेटवर्क मुळेच मिळाल्या. त्रिकाया ला दिवाळीपूर्वी ऑर्डर्स पूर्ण करायला फक्त पंधरा दिवस मिळाले, त्यामुळे ते १८०० बॉक्सेस वितरित करू शकले आणि यामधून 296000 ₹ चे डन डिल्स झाले. चाँकलेटची चव सर्वांना इतकी आवडली की  HDFC तर पुढील वर्षीचे ऍडव्हान्स बुकिंग करून ठेवले आहे.


श्री अक्षयच्या घरी दिवाळीपूर्वी १५ दिवस चाँकलेटस बनविणे आणि त्याचे पॅकेजिंग करणे हे काम दिवस- रात्र चालू होते. विशेष बाब म्हणजे प्रॉडक्ट पॅकेजिंगसाठी अक्षयची फॅमिली तर होतीच , पण कुणालची बहीण, कौस्तुभचे वडील, रोहितच्या आई दररोज एकत्र जमत होते आणि मध्यरात्रीपर्यंत कामात मदत करीत होते. अगदी 'हम हैं राही प्यारके ,' चित्रपटात घेतलेल्या ऑर्डर्स वेळेत पूर्ण करण्यासाठी जसे भारलेले वातावरण होते तसेच वातावरण दुसाने यांच्या घरात तयार झाले होते . सर्वांच्या कायम स्मरणात राहील असा हा सुखद प्रसंग होता.


त्रिकाया फूड्स प्रा.ली. ही कंपनी लवकरच स्वतःच्या जागेत उभारण्यात येणार आहे . सध्या ते *एक्सप्रेस वडा-पाव* असे ब्रँड नेम ठरलेल्या प्रॉडक्टवर संशोधन करीत आहेत आणि Tuv Nord Pune या लॅब मध्ये प्रॉडक्ट टेस्टिंग सुरू आहे. शेफलेस बिझनेस अशी ही कन्सेप्ट आहे. याकरिता फ्रांचायजी नेटवर्क उभे केले जाईल आणि त्यांना सेंट्रलाईज्ड किचन मधून वैशिष्ट्यपूर्ण वडा वितरित केला जाईल. फ्रांचायजीने तो फक्त फ्राय करून सर्व्ह करायचा . कमीत कमी भांडवल गुंतवणुकीत जास्तीत जास्त प्रॉफिट मार्जिन मिळवून देणारे हे फ्रांचायजी बिसनेस मॉडेल असेल. कंपनीत वडा तयार झाल्यानंतर तो कूल कंडिशन मध्ये ठेवला जाईल. वातानुकूलित वाहनातून त्याची वाहतूक होईल आणि फ्रांचायजी कडे फ्रीझ मधेच साठविला जाईल. वड्याचे सेल्फ लाईफ जास्त असेल परंतु त्यात प्रिझरव्हेटिव्हीज नसतील. ग्राहकाने वडा कुठेही खाल्ला तरी त्याची चव,आकार,हेल्दी मटेरियल आणि आस्वाद एकसारखच असेल.


त्यापुढे चाट,व्हेज,नॉनव्हेज प्रॉडक्ट्स एकएक करून लॉन्च केले जाणार आहेत. याचे डिजिटल प्लॅटफॉर्मवर येण्यासाठी आवश्यक ते काम आघाडीवर आहे आणि महिनाभरात ते सर्वांना व्हिजिबल होईल. 


श्री दुसाने यासर्व घडामोडीचे श्रेय SCGT चे संस्थापक कै. माधावरवजी भिडे सर यांना देतात. त्यांच्यामुळेच हे क्लब , नेटवर्क आणि मित्रवर्ग निर्माण झाला आहे. श्री दुसाने पुण्यातल्या पहिल्या क्लब पासून क्लबचे मेंबर आहेत. ते म्हणतात , "श्री स्वप्नील कुलकर्णी हे PCMC रिजनल हेड आहेत. ते अतिशय उत्साही, कार्यक्षम आणि क्लब डेव्हलपमेन्टच्या बाबतीत आक्रमक भूमिका बजावतात . आमच्या प्रगती बाबत बोलताना त्यांचा मिळणारा ऍक्टिव्ह  सपोर्ट आम्ही विसरुच शकत नाही."


SCGT क्लबचे   चेअरमन, सेक्रेटरी,ट्रेझरर म्हणजे CST हे कोणत्याही क्लबचा कणा असतात . अशा पदांवर कार्यरत  पदाधिकारी स्वतःचा व्यवसाय करतकरत इतरांना पण व्यवसाय वाढीसाठी सर्वतोपरी सहाय्य करतात. पुण्यातल्या दोन SCGT चापटर मधील दिग्गज पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन जर असे जॉईंट व्हेंचर उभे केले तर ते नावारूपाला येणारच आणि शिवाय याची चर्चा पण होणारच.


कथा लेखक- योगीराज हरिश्चंद्र देवकर. Saturday Club -Wakad Chapter. Secretary.

Mob: 9307133134.

www.motivationacademy.in

No comments: