Thursday 1 July, 2021

निलेश कुलकर्णी, आकांक्षा हॉलिडेज

 सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट-वाकड . सदस्यांची सक्सेस स्टोरी.

श्री निलेश कुलकर्णी - आकांक्षा हॉलिडेज प्रा.


श्री निलेश कुलकर्णी परीक्षा आकांक्षा हॉलिडेज प्रा. ही कंपनी पिंपरी-चिंचवड मध्ये सूचीबद्ध आहे. कंपनीच्या दहा विभागातील बारा कर्मचार्‍यांचे संक्षिप्त वर्णन.टिओटॉ सॉफ्टवेयर आणि ऑल स्क्रिप्ट, खराडी सिटी आयटी कंपनी या कार्यालयांचे कर्मचा वाहतूक्यांचा अनुभव. आपण शोधू शकता मार्केटमध्ये व्यवसाय करू शकता. सर्व चालू आनंद आणि सुरळीत चालू.


श्री कुलकर्णी हे Saturday Club Global Trust- Wakad Chapter चे  सदस्य आहेत.( Mob- 8087830007)  जवळपास सगळेच सदस्य क्लबच्या मीटिंग अटेंड करीत असत . क्लबने १८ मार्च २०२० रोजी क्लस्टर मीट आयोजित केली होती. परंतु कोव्हीड-19 मुळे  महाराष्ट्र शासनाने १५ मार्च पासूनच राज्यातील मोठ्या शहरात आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ आणि साथरोग नियंत्रण कायदा १८९७ लागू केला त्यामुळे सदर मीट रद्द झाली. २२ मार्च ला देशात जनता करफ्यु झाला , त्यापाठोपाठ लॉक डाउन सुरू झाला. लॉक डाउनचा परिणामस्वरूप आकांक्षा हॉलिडेज प्रा.ली. ला काम पुरविणाऱ्या दोन्ही कंपन्यांचे कामकाज बंद झाले आणि सर्व बसेस घरासमोर उभ्या राहिल्या, बारा कर्मचाऱ्यांच्या सेवेतही खंड पडला.


१५ मार्च ते १० ऑगस्ट पर्यंत दरमहा साडेपाच लाख ₹ बसेस चे EMI आणि कर्मचाऱ्यांचा पगार असा फिक्स्ड खर्च चालू होता आणि उत्पन्न मात्र शून्यावर आले होते. दोन महिन्यांतरच भांडवल संपले आणि बसेसचे EMI भरण्यासाठी स्वतःच्या बचतीमधील पैसे वापरण्याची वेळ आली. श्री कुलकर्णी यांच्यासाठी हा खूप कठीण काळ होता. जसजसा लॉक डाउन वन,टू,थ्री,फोर वाढत होता तसतसे घरासमोर उभ्या असलेल्या बसेसवर धूळ वाढत चालली होती आणि आपल्यासमोर नक्की काय भविष्य वाढून ठेवलंय हा विचार मनात येऊन भीती वाढत चालली होती. कधीनव्हे ते व्यवसायिक पातळीवर निरव शांतता झाली होती. 


एका बाजूला हे अघटित घडत असताना दुसऱ्या बाजूला मात्र Saturday Club Global Trust-SCGT आणि बाहेरील काही समव्यावसायिक मित्र मानसिक आधार आणि सहाय्य देण्यासाठी उपलब्ध होते. लॉक डाउनच्या काळात क्लबने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यास सुरुवात केली होती. SCGT Wakad हा व्हाट्सअप्प ग्रुप होताच त्यावर प्रत्येकाचे बिझनेस प्रोफाइल शेअरिंग सुरू झाले.२५ मार्च पासूनच SCGT च्या ऑन लाईन मीटिंग  सुरू झाल्या. १ एप्रिल पासून वाकड चापटर चे 'सहाय्य करू मिशन' सुरू झाले.क्लब मधील सदस्यांचे तीन गट केले गेले आणि प्रत्येकाला प्रेझेंटेशन ची संधी मिळू लागली. डिजिटल मीटिंग मुळे क्रॉस चापटर मीटिंग अटेंड करायची संधी उपलब्ध झाली. SCGT चे विविध विषयांवर वेबिनर सुरू झाले. यासर्व गोष्टींचा मानसिक संतुलन राखण्यास आणि आत्मविश्वास टिकून राहण्यास फार फायदा झाला. ऑन लाईन वन-टू-वन होत होते, मैत्री निर्माण होत होतो आणि परस्परामधील विश्वास वाढीला लागला होता.


आणि.....Saturday Club- Wakad Chapter मुळे श्री कुलकर्णी यांना पहिला break through मिळाला. श्री कौस्तुभ बाबर Saturday Club- Wakad चे ट्रेझरर आहेत. त्यांची फोर डायमेंशन बिल्डकॉन प्रा.ली. ही कंपनी आहे. श्री बाबर यांचे शापुरजी पालोनजी ग्रुप मधील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यांच्यामुळे श्री कुलकर्णी यांना शापुरजी पालोनजी ग्रुपचा रेफेरन्स मिळाला आणि आकांक्षा हॉलिडेज प्रा.ली.चे चित्रच पालटले. लॉक डाउन लागल्यामुळे शापुरजी पालोनजी ग्रुपचे हजारो कामगार भारतातल्या वेगवेगळ्या राज्यात स्वतःच्या गावी गेले होते. महाराष्ट्रात अन लॉक सुरू झाला तसे त्या कामगारांना परत आणण्याचे काम सुरू झाले होते. तीन बस सप्लायर तिथे काम करीत होते , चौथा बस सप्लायर म्हणून आकांक्षा हॉलिडेज प्रा.ली. ला काम देण्यात आले.


कामगारांना प्रवासासाठी आवश्यक मेडिकल पास ची व्यवस्था शापुरजी पालोनजी ग्रुपने केली. लागलीच आकांक्षा हॉलिडेज प्रा.ली.ने बसेस परराज्यात नेहण्यासाठी E-passes काढले. वाहनांची सर्व कागदपत्र अद्ययावत केली. बसेस सँनेटाईज केल्या. ड्रायव्हर्सना कोरोना प्रबंधक सर्वनियम काटेकोरपणे पाळणे बंधनकारक केले. स्टेट बॉर्डर टॅक्स भरण्याची सोय केली आणि बसेस परराज्यात जाण्यासाठी सज्ज झाल्या.


ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२० या दोन महिन्यात आकांक्षा हॉलिडेज प्रा.ली.ने शापुरजी पालोनजी  ग्रुपच्या २००० कामगारांना बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, झारखंड, छत्तीसगड,कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यातून महाराष्ट्रात पुणे आणि चंद्रपूर याठिकाणी आणले. त्यावेळी भारतात होत असलेली अतिवृष्टी,नदी-नाल्यांना आलेले पूर आणि त्यामुळे निर्माण झालेले अडथळे, बदलणारे वेळापत्रक,इ. यासर्व गोष्टीवर मात करून श्री बाबर आणि शापुरजी पालोनजी ग्रुपने दाखविलेला विश्वास सार्थ करून दाखविला. या कार्यात शापुरजी पालोनजी ग्रुपच्या टीमने फार मोठा सपोर्ट केला असे श्री कुलकर्णी आवर्जून सांगतात.


पैसा हे यशाचे मोजमाप करण्याचे एक साधन आहे. आकड्यातच बोलायचे झाले तर श्री कुलकर्णी यांनी केवळ दीड महिन्यात शापुरजी पालोनजी ग्रुपचा ९२ लाख रुपयांचा व्यवसाय केला. याशिवाय श्री बाबर यांनी त्यांच्या कंपनीचे कामही श्री कुलकर्णी यांना दिले त्याद्वारा १२ लाखाचा व्यवसाय केला. क्लब च्या इतर सदस्या मार्फतही त्यांनी ५-६ लाखाचा व्यवसाय केला. या अडचणीच्या काळात श्री कुलकर्णी यांना फक्त Saturday Club Wakad Chapter च्या माध्यमातून एक कोटी दहा लाख रुपयांचा व्यवसाय केला आहे.


श्री निलेश कुलकर्णी काय म्हणाले ते त्यांच्याच शब्दात, " श्री स्वप्नील कुलकर्णी सर मला Saturday Club चा मेंबर हो म्हणून तीन वर्षापासून मागे लागले होते. मला वाटायचं माझा व्यवसाय हा कार्पोरेट क्षेत्राशी निगडित आहे. क्लब मध्ये वैयक्तिक व्यवसाय करणारे उद्योजक जास्त असतात त्यामुळे क्लबचा मला विशेष फायदा होणार नाही. पण चला नवीन मित्र तर मिळतील म्हणून मागीलवर्षी मी मेंबर झालो. परस्परात विश्वास निर्माण झाला त्यातूनच मैत्री वाढली. एक सदस्य सौ भारती मुरकुटे मॅडम मुळे मला ऑफिसला जागा मिळाली. आता आम्ही पाच सदस्य एकत्र येऊन सर्वांना लवकरच एक मोठी बातमी देणार आहोत. सर्व सुरळीत चालू असताना हा व्यवसाय मिळाला असता तर त्याचे विशेष वाटले नसते पण अडचणीच्या काळात हा व्यवसाय मिळाला म्हणून त्याचे मोल फार मोठे आहे. मला व्यवसाय मिळाला त्यामुळे जसा माझा आत्मविश्वास वाढला तसेच मी इतर सदस्यांना व्यवसाय मिळवून दिला पाहिजे ही भावनापण वाढली. त्यातूनच मी श्री मयूर इंगळे यांना गिरीकंद ट्रॅव्हल्स मध्ये रेफरन्स दिला आणि आग्रहाने व्यवसाय पण मिळवून दिला आहे. धन्य आहेत ते कै. माधावरावजी भिडे सर ज्यांनी Saturday Club Global Trust ही संकल्पना प्रत्येक्षात आणली. त्यांच्यामुळेच महाराष्ट्रात माझ्यासारख्या हजारो उद्योजकांना व्यवसाय मिळत आहे. एकमेका सहाय्य करू अवघे होऊ श्रीमंत ही क्लबच्या प्रार्थनेतली ओळ इथे खरी ठरत आहे ! "


मराठी माणूस मराठी माणसाला सहाय्य करीत आहे ही कौतुकास्पद गोष्ट या क्लब मध्ये घडत आहे.


कथा लेखक- योगीराज हरिश्चंद्र देवकर. Saturday Club-Wakad Chapter , Secretary.

Mob 9307133134.

www.motivationacademy.in

No comments: