*माणसाच्या गरजा ...*
मॅसलोची गरजांची श्रेणी (Maslow’s Hierarchy of Needs) ही मानसशास्त्रज्ञ अब्राहम मॅसलो (Abraham Maslow) यांनी मांडलेली मानवी गरजांच्या प्रेरणांची शास्त्रीय संकल्पना आहे. या सिद्धांतानुसार माणसाच्या गरजा ठरावीक क्रमाने विकसित होतात व खालच्या पातळीच्या गरजा पूर्ण झाल्यावरच वरच्या पातळीच्या गरजा प्रभावी ठरतात. काहीजणांच्या बाबतीत हा क्रम बदलू पण शकतो.
*मानवाची पहिली गरज*:
शारीरिक गरजा: (Physiological Needs):
या प्राथमिक ,मूलभूत आणि जैविक गरजा आहेत—ऑक्सिजन,पाणी,अन्न,निवारा, झोप, योग्य तापमान, सेक्स ,इ. जीवन टिकवण्यासाठी या गरजा अत्यावश्यक आहेत.या प्राथमिक बाबींशिवाय माणूस जिवंत राहूच शकत नाही.
यातले ऑक्सिजन,पाणी,योग्य तापमान या बाबी निसर्गानेच मुबलक उपलब्ध केल्या आहेत. जंगले,नद्या,समुद्र,जमीन यामुळे मुबलक अन्न पण उपलब्ध आहे. *अन्न उपलब्ध करण्यात शेती आणि शेतकरी अत्यंत महत्वाचा घटक आहे हे ही यानिमित्ताने लक्षात घ्यावे.* उद्योजक ऑक्सिजन,पाणी , कच्च्या मालापासून पेय,अन्नपदार्थ निर्माण करीत आहेत. पृथ्वीचे आपण मानावे तितके आभार कमीच पडतील. पृथ्वी एक्सेसच्या भोवती फिरते आहे त्यामुळे दिवस आणि रात्र अनुभवता येत आहे.यामुळे मानवाची झोपेची नैसर्गिक सोयच झाली आहे. दिवसा काम करा,रात्री झोपा आणि संतुलित रहा. पृथ्वी सूर्याभोवती फिरत आहे त्यामुळे ऋतुचक्र तयार झाले आहे. प्लॅटिनम,हिरे,माणिक,मोती,सोने,चांदी,लोखंड, अल्युमिनियम,तांबे,ऑईल,गॅस,पेट्रोल,डिझेल, सिमेंट, सर्व काही या पृथ्वीनेच दिलेले आहे. सेक्स जीवन टिकवण्यासाठी आणि मानवी वंश वाढवण्यासाठी आवश्यक आहे.
एकदा का या प्राथमिक गरजा पूर्ण झाल्या की,माणूस पुढच्या गरजांच्या श्रेणीच्या मागे लागतो.
No comments:
Post a Comment