*मानवाची दुसरी गरज* :
सुरक्षिततेच्या गरजा: (Safety Needs):
अब्राहम मॅस्लोच्या Theory of Needs Hierarchy मधील ही दुसरी गरज आहे.
शारीरिक व मानसिक सुरक्षितता, स्थैर्य, नोकरीची खात्री, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था इ. या गरजा पूर्ण झाल्यावर व्यक्तीला भविष्याबद्दल सुरक्षिततेची भावना मिळते.
पृथ्वीवर जीव निर्माण झाल्यापासूनच बहुतेक प्राणी,पक्षी एकमेकांपासून असुरक्षित आहेत.कारण ते एकमेकांवर अवलंबून राहून किंवा एकमेकांची शिकार करूनच जगत आले आहेत. आपण सुरक्षित कसे रहायचे हे मानवाला सर्व प्राण्यांच्या तुलनेत आधी उमगले असावे. यातूनच त्याची सुरक्षिततेची गरज मोठी होत गेली असावी .या पृथ्वीतलावरचा माणूस हा असा एकच प्राणी असेल ज्याने सगळ्या प्राणी ,पक्षांना असुरक्षित करून ठेवले आहे.
*आज माणूस, प्राणी आणि पक्षापासून सुरक्षित आहे पण सर्वात जास्त माणसापासूनच असुरक्षित झाला आहे.*
चोऱ्या माऱ्या,दरोडे, सायबर क्राईम,खून,बलात्कार, मुला,मुलींची तस्करी,अघोरी कृत्य,अतिक्रमण,राजकारण,घुसखोरी,आतंकवाद,भ्रष्टाचार,युद्ध,राक्षसी महत्त्वाकांक्षा, इ. ऐकले,वाचले,पाहिले की,असे वाटते आज माणूसच माणसापासून असुरक्षित आहे.
आपला वर्तमान आणि भविष्य सुरक्षित रहावे असे प्रत्येकाला वाटते. जगभर इन्शुरन्स, लाइफ इन्शुरन्सचा बिझनेस यामुळेच फोफावला आहे. प्रत्येकाला पाहजे आहे पर्सनल स्पेस, सुदृढ शरीर, खात्रीचा जॉब किंवा व्यवसाय, स्थैर्य ,उत्तम आरोग्य, लहान मुले आणि महिलांची सुरक्षितता, कायद्याचे संरक्षण आणि सुशासन.
शारीरिक,मानसिक सुरक्षेसाठी घर, घराला दार आणि लॉक,वॉचमन, सिक्युरिटी सर्विसेस, सीसी टीव्ही कॅमेरा,बँक, आर्थिक गुंतवणूक, जिम, अपघातापासून सुरक्षा, इ. असे शेकडो व्यवसाय केवळ माणसाच्या या सुरक्षिततेच्या गरजेतून निर्माण झाले आहेत.
एकदाका या गरजा पूर्ण झाल्या की,मनुष्य पुढच्या गरजेकडे मार्गाक्रमण करतो.
No comments:
Post a Comment