सवय आठ :
*"आपला आतला आवाज शोधा आणि इतरांना त्यांचा आतला आवाज शोधण्यासाठी प्रेरित करा!"*
स्टीफन कोवी यांचे "द 8th हॅबिट: फ्रॉम इफेक्टिव्हनेस टू ग्रेटनेस" हे पुस्तक आपल्याला आपले जीवन अधिक महान आणि समृद्ध बनवण्यासाठी मार्गदर्शन करते. आठवी सवय म्हणजे "आपला आतला आवाज शोधा आणि इतरांना त्यांचा आतला आवाज शोधण्यास प्रेरित करा ! ".
Stephen Covey या लेखकाची अनेक प्रसिद्ध पुस्तके आहेत. त्यातील 'Seven habbits of highly effective people' आणि 'Eighth habbit from
effectivness to greatness' ही मी वाचलेली आणि आवडलेली पुस्तके.
*आठव्या सवयाचे मुख्य बिंदू:*
- आपला आतला आवाज शोधणे म्हणजे आपल्या अद्वितीय शक्ती, प्रतिभा आणि मूल्ये ओळखणे.
- आपला आतला आवाज हा एक प्रकारे आत्मशोध, आत्मप्रकाश, आत्मसाक्षात्कार,Self realization, Self actualization, होय.
- खरे तुम्ही,अस्सल तुम्ही ,कसे आहात ? ते ओळखणे आणि स्वतःची जी ओळख लक्षात आली आहे ती सिद्ध करण्यासाठी स्वतःशी स्पर्धा करणे.
- स्वतःच्या अस्तित्वात असण्याचे कारण स्वतःच्या आणि इतरांच्या दृष्टिकोनातून पाहणे , आयुष्यात इतरांसाठी असं काहीतरी करणे ज्यायोगे तुम्ही वारसा निर्माण कराल.
- इतरांना त्यांचा आतला आवाज शोधण्यास प्रेरित करणे म्हणजे त्यांना त्यांच्या पूर्ण क्षमतेसाठी सक्षम करणे. त्यांना त्यांची ओळख होण्यास सहाय्यभूत ठरणे.
- ही सवय आपल्याला अधिक महान आणि समृद्ध बनून पूर्णत्वास नेहते .
*आठव्या सवयाचे फायदे:*
- आपले जीवन अधिक अर्थपूर्ण आणि उद्देशपूर्ण बनते.
- आपले संबंध अधिक मजबूत आणि प्रेरणादायी होतात.
- आपल्याला आपल्या कामात अधिक आनंद आणि संतुष्टी मिळते.
- तुमचा ,तुमच्या घराण्याचा वारसा निर्माण होतो.
स्टीफन कोवी यांनी पुस्तकात अधोरेखित केलेली ही सवय आपल्याला आपले जीवन अधिक प्रभावी आणि महान बनवण्यासाठी प्रेरित करते.😊
योगीराज देवकर.
No comments:
Post a Comment