Tuesday, 21 January 2025

होम मिनिस्टर - दिव्यागर

 होम मिनिस्टर.4/1/2024

मगर फार्म & होम स्टे. दिवेअगार.


बक्षीस...

1) खेळात प्रथम क्रमांक... साडी वस्त्र.

2) द्वितीय क्रमांक... PNG चांदीची भेट वस्तू.

3) उत्तेजनार्थ...

PNG चांदीचे नाणे.


लग्नाविषयी...

1) तुमचं लग्न कसं जमलं?

2)सर्वप्रथम तुम्ही कुठे भेटलात?

3) कोण अगोदर हो म्हणालं?

4) लग्नाला किती वर्ष झाली?

5) आता कसं चाललंय?

6) मिस्टरांचा स्वभाव कसा आहे?

7) तुमचे सासू - सासरे कसे आहेत?

8) तुमच्या मुलांचं वेगळं पण काय आहे?

9) पुढच्या जन्मी कोण व्हायला आवडेल?


चांगली आठवणी...

1)तुमचं बालपण कुठं आणि कसं गेलं?

2) तुमचं शिक्षण किती आणि कुठं झालं?

3) लहानपणी तुम्ही शांत होता का खोडकर का होता ? कोणत्या खोड्या करायचा?

4) तुम्ही किती भावंडं आहात?

5) तुमचं माहेर कसं आहे? माहेरी जाणं होतं का?


सवयी विषयी...

1) तुम्ही सर्वात जास्त कशाची काळजी करता?

2) तुम्हा दोघांपैकी सकाळी लवकर कोण उठतं?

3) असं होतं का की तुम्ही उठता आणि पांघरूनाच्या घड्या न घालताच बेडरूम बाहेर पडता?

4) व्यायाम करता का?

5) घरात TV कोण जास्त बघतं?

6) रात्री लवकर कोण झोपतं?

7) जास्त कोण बोलतं?

8) गोड कोणाला जास्त आवडतं?

9) फिरायला कोणाला जास्त आवडतं? मिस्टर फिरायला नेहतात का?

10) तुमच्यात कोण जास्त समजूतदार आहे?

11) रूम, बाथरूम मध्ये कोणी नसेल तरी तुमच्यापैकी कोण लाईट चालू ठेवते?


गुणांविषयी...

1) कोण जास्त शिस्तप्रिय आहे?

2) दोघात कोण जास्त शांत आहे?

3) एकमेकांचे कोणते गुण जुळतात?

4) स्वभावात एक बदल करायचा झाला तर कोणता बदल कराल?


उखाणा...

एक उखाणा घ्या.


क्षमाशिलता...

1) क्षमा करायची झाली तर कोणाला कराल आणि का?

2) क्षमा मागायची झाली तर कोणाची मागाल आणि का?


खेळ...

टॉवर बिल्डिंग.

No comments: