Chat GPT ला
डॉक्टर साक्षी आणि साहिलच्या लग्नावर आधारित काही prompt केले , तर Chat GPT ने पुढील completion दिले आहे.
चॅट जीपीटीच्या मते, लग्न म्हटलं की,नजरेसमोर येते ती एक सुंदर राजकुमारी आणि एक राजबिंडा राजकुमार. मुलगा आणि मुलगी दोघांच्याही आयुष्यातला हा असा काळ असतो जेव्हा ते दोघेही कमालीचे सुंदर आणि रुबाबदार दिसतात. त्यांचे हे दिवसच फुलायचे आणि झोपल्यावचून डुलायचे असतात. वधू-वराच्या वेषात वावरणारे वधू-वर म्हणजे त्यांच्या लावण्याचा कळस असतो.
चॅट जीपीटीच्या मते, एका संस्कृत सुभाषितात लग्नाच्या बाबतीत असे म्हटले आहे... की,
मुलगी लग्नाचा विचार करते तेव्हा मुलात काय पाहते.
तर मुलगी मुलाचे रूप पाहते.
डॉक्टर साक्षीला भेटला राजकुमार साहिल आणि म्हणाली की,साक्षी त्यांना हो' !
मुलीची आई काय पाहते.
तर ती त्या मुलाची संपत्ती पाहते.
मीनाक्षीताईने विचार केला असावा ,आपल्या पेक्षा श्रीमंत आहे ना, मग चांगले झाले.
मुलगी,मुलगा काही सांगत नाही कोणाला पण हे सातव काय, हे गायकवाड काय,हे हजार हजार कोटींचे मालक आहेत.
ओ सॉरी सॉरी, हे वाक्य इनकम टॅक्स वाल्यांनी ऐकायच्या आधी डिलीट करा, डिलीट करा.
मुलीचे वडील काय पाहतात.
तर मुलाचे करिअर, कर्तृत्व.
शिरीष नानांनी पाहिले की,मुलगा होतकरू, कष्टाळू आहे ना, मग चांगले झाले.
नातेवाईक काय पाहतात, तर त्याचे कुळ पाहतात.
मामा,मामी कोण आहेत.आजा -आज्जी कोण आहेत. घराणे कुलवंत आहे ना. मग झाले.
आता वऱ्हाडी आणि इतर जण काय पाहतात, तर मिष्टांन जेवण.
इतर वऱ्हाडी मंडळीला बोलावलेले असते आशीर्वाद द्यायला. ते येतात,आशीर्वाद देतातही पण त्यांना वरील गोष्टींचे काही देणे घेणे नसते .ते पाहतात जेवणाचा मेनू काय आहे. अक्षदा पडल्या की, सगळ्या काउंटर्सचा आधी सर्वे करायचा आणि यातले निवडक काय काय खायचे एव्हढच ते पाहतात.
म्हणूनच आपल्याकडे,'नवरा येतो नवरीसाठी आणि वऱ्हाड येते जेवणासाठी.'अशी म्हण प्रचलित आहे.
चॅट जीपीटीच्या मते, डॉक्टर साक्षी, सातव फॅमिलीला कधीच कोणत्या गोष्टीला नाही म्हणणार नाही. याचे कारण आहे.
Triple 'S'.
साक्षीच्या नावात आधी दोन S होते.
साक्षी,
शिरीष,
आता तीन झाले.
साक्षी,
साहिल,
सातव.
जिच्या नावातच ट्रिपल यस आहे ती नेहमी सकारात्मक आणि होकारात्कम राहणारच ना.
आत्ताच ही मुलगी सातव कसे गायकवाडापेक्षा चांगले आहेत, कसे वेळ पाळतात,वगैरे, वगैरे सांगत असते. पुढऱ्यापेक्षा कमी वेळात हिने पार्टी बदलली आहे.
खरंतर मुलीच्या बाबतीत लग्नानंतर पार्टी बदल अपेक्षित आणि नैसर्गिकच आहे. या बदलासोबतच सुनेने सासूच्या आणि मुलाने वडिलांच्या प्रापंचिक,कौटुंबिक, व्यावहारिक जबाबदाऱ्यांचा, कष्टांचा भार हलका केला तर त्यांनापण जीवनात बदल जाणवतो .
चॅट जीपीटीच्या मते, सातव फॅमिलीला साक्षी डॉक्टर असल्याचे बरेच फायदे होणार आहेत. त्यातला एक फायदा म्हणजे .
डॉक्टरने आधीच डिक्लेर केले आहे की,"आपण स्वयंपाक वगैरे काही बनवत बसणार नाही. एकतर मुंढव्यातून ऑर्डर करणार किंवा सासू सासऱ्यांना म्यॅगी खाऊ घालणार आहे."
आता सारखी सारखी म्यॅगी खाऊन तुम्हाला काही त्रास झालाच तर तुम्ही म्हणाल,
"डॉक्टर हमने आपके हातकी बनायी म्यॅगी खायी और अब हमारा पेट अपसेट हो गया हैं l"
तर डॉक्टर साक्षी म्हणेल," ठीक हैं सास और ससुरजी l
अब एक गोली खाओ l"
बात खतम l
चॅट जीपीटीच्या मते,डॉक्टर साक्षी एक चांगली टूर ऑरगनायझर आहे. फक्त हे विधान अनिकेत आणि हर्षला मान्य असायला हवे. तिने जर मनावर घेतले तर केसरी आणि वीणा वर्ल्डला टफ फाईट होईल.
चॅट जीपीटीच्या मते, साक्षीचे जीवन आता कुठे सूर-ताल पकडत आहे.
कसा...
साक्षीचा - साsss
साहिलचा - साsss
सातवांचा - साsss
आता हा 'सा', खालच्या पट्टीतला आहे का वरच्या पट्टीतला ते समजायला एक,दोन, तीन वर्षें लागतील.
यावर चॅट जीपीटीने केलेला एक जोक...
पहिल्या वर्षी सा sss मुलगा लावतो आणि मुलगी ऐकते.
दुसऱ्या वर्षी सा sss
मुलगी लावते आणि मुलगा ऐकतो.
तिसऱ्यावर्षी साsss
दोघेही लावतात आणि आणि शेजारचे ऐकतात.
आखिर ये शादिका लड्डू हैं l' जो ना खाये वो पछताये l और जो खाये वो भी पछताये l
अगर यही बात हैं तो बेहतर हैं की खाकर पछताये l
चॅट जीपीटीच्या मते, साहिल मिलिंदरावांना 'पप्पा', म्हणत असेल किंवा 'डॅडी '.
आता शिरीष रमेशराव गायकवाड साहिलचे सासरे झाले आहेत. गायकवाड यांचे इंग्लिश अक्षर G ने सुरु होत असल्यामुळे. या G ची एक भारीच कमाल तुम्हाला अनुभवायला मिळेल.
साहिल तुम्हाला म्हणणार फक्त 'डॅडी' किंवा 'पप्पा 'आणि शिरीष नानाला म्हणणार
डॅड 'G.' किंवा
पप्पा 'G'.
आणि मीनाक्षी ताई होणार 'मम्मी 'G',
या G मध्ये जो आदर आहे ना तो इतर कोणत्याच इंग्लिश मुळाक्षरांत नाही.
चॅट जीपीटीच्या मते, या विवाहासाठी साक्षीचे वडील शिरीष नाना,आई मीनाक्षीताई ,आज्जी श्रीमती पद्माजी , चुलते गिरीश आप्पा, सचिन काका, चुलती सुनीताताई, सीमाताई, भावंडे दिग्विजय,रुचिरा, अनिकेत आणि कुटुंबियांनी खूप मेहनत घेतली आहे. नानांनी तर या कालावधीत इतक्या वेळा होकार दिले असतील की, ते आता 'नाना' ऐवजी 'होना' झाले असतील .
सर्वात महत्वाचा म्हणजे हर्षवर्धन. साक्षीच्या लग्नामुळे हर्षवर्धनचा आंतरआत्मा फार आनंदी झाला आहे असं म्हणत तो स्वतःच्या चॉपरने खुषित लग्नपत्रिका वाटत फिरत होता सगळीकडे.
आता आतली गोष्ट सांगतो. हर्षवर्धनचं हे वागणं जोकर किंवा चार्ली चप्लिन सारखं आहे. इतरांना केवळ गंम्मत म्हणून चेहऱ्यावर सुखी दाखविणारा हर्ष बहीण लग्न करून घर सोडून जाणार म्हणून हृदयातून दुःखी आहे.
साहिल बद्दल Chat GPT ने खूप छान completion दिले आहेत. पण पाहुणे नवीन आहेत म्हणून तो ब्लॉग पुन्हा कधी तरी.
चॅट जीपीटीच्या मते, मिलींदराव आणि मनीषाताई तुम्हाला अजून काही जाणून घ्यायचे असेल तर जे वरिष्ठ सासू - सासरे आहेत त्यांचा क्लास लावा किंवा Chat GPT ला prompt करा.
यात काही चूक भूल असेल तर चॅट जीपीटीला क्षमा असावी. शेवटी चॅट जीपीटी पण तुमच्या सोशिअल मीडियावरील प्रेझेंसच्या माहितीवर आधारितच तुमच्याबद्दल भाष्य करतो.
डॉ साक्षी आणि साहिलला विवाह सोहळ्यानिमित्त अनंत शुभेच्छा.तुम्हा दोघांच्या हातून सातव कुटुंबाचा वारसा जपला जावो आणि वृद्धिंगत केला जावो, तुमच्याहातून समाजसेवा, देशसेवा घडो,अशी परमेश्वराकडे प्रार्थना.
'कल्याण भव:'.
धन्यवाद.
आपला तत्पर.
Chat GPT.
No comments:
Post a Comment