माझा साहित्य प्रवास.
-महाराष्ट्र साहित्य परिषद, नाशिक रोड शाखेचे श्री.उन्मेष गायधणी,कार्याध्यक्ष, श्री. रवींद्र मालुंजकर, कार्यवाह, श्री.सुदाम सातभाई, खजिनदार,सौ. तनपुरे मॅडम,इतर सर्व पदाधिकारी, सर्व सभासद आणि सृजन श्रोतेहो!
आपल्यासमोर माझा साहित्य प्रवास उलगडताना मला आनंद होत आहे.
माझे बालपण लोणी देवकर या गावी गेले. लहानपनापासून मला घरात आणि गावात वाढीसाठी पोषक वातावरण होते .
शिक्षणासाठी पाचवीला मला तालुक्याच्या ठिकाणी इंदापूरला पुढे
सहावीपासून जिल्ह्याच्या ठिकाणी पुण्याला पाठविण्यात आले.
सहावितला एक प्रसंग मला आठवतो. जून - जुलै महिना असेल, पुण्यात खूप पाऊस पडत होता. मुठा नदीला पूर आला होता. पुराचे पाणी लकडी पुलाच्या धोकादायक पातळी पर्यंत वाढले होते. लोकं नदीला आलेला पूर पहायला जात होते. आम्ही श्री शिवाजी मराठा होस्टेलमधील मुलं पण एका रविवारी पावसात भिजत पूर पहायला गेलो होतो. फार रोमांचक अनुभव होता तो.
दुसऱ्याच दिवशी वर्गात सरांनी आम्हाला ' मी पाहिलेला पाऊस ', या विषयावर निबंध लिहायला सांगितला होता .
मी लिहलेल्या उत्कृष्ट निबंधमुळे माझे वर्गात खूप कौतुक झाले होते .
सर म्हणाले होते, " तु मोठा झाल्यावर लेखक होशील. " मला असं वाटतं, त्यानंतर माझ्यात लिखाणाची गोडी उत्पन्न झाली.
महाविद्यालयीन जीवनात स्मरणीकामधे लेख लिहणे , प्रवास वर्णन लिहणे इतकच काय ते माझं साहित्य योगदान होतं.
-मिटकॉन, एमसिईडी नोकरी आणि त्यानिमित्ताने लिखाणाचे दालन उघडे झाले.
-आपले नांव वर्तमानपत्रात छापून यावे अशी इच्छा असायची. तेव्हा पुण्यातील सकाळ, लोकसत्ता, वर्तमानपत्रात बातमी येणं ही फार मोठी बाब असायची .
तुम्ही गुन्हा केला, तुमचा अपघात झाला तर तुमचे नांव आपोआप पेपर मध्ये छापून येते किंवा तुम्ही काहीतरी समाजउपयोगी कार्य करत असाल तर वर्तमानपत्र तुमची दखल घेतं.
मिटकॉन आणि एमसिईडीच्या नोकरीमुळे मला अनेक नामवंत वर्तमानपत्रात लिखाणाची संधी मिळाली .
-पेपरमध्ये लेख प्रकाशित होण्याचा एक दिवस मला चांगलाच आठवतो. रत्नागिरीत - एकाच दिवशी माझे 'रत्नागिरी टाइम्स', 'रत्नभूमी', 'सागर ' या तीन वर्तमान पत्रात लेख छापून आले होते.
1986-87 असा काळ होता जेव्हा उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे वाचन साहित्य इंग्रजी भाषेत उपलब्ध असायचे. महाराष्ट्रातील युवक युवतींसाठी ते मराठी भाषेत असणे आवश्यक होते.
माझे योगदान...
1) EDP वाचन साहित्य भाषांतर केले.
2) MCED प्रशिक्षण कार्यक्रम वाचन साहित्य तयार केले.
-EDP मध्ये वक्त्याचे सेशन सुरु झाल्यापासून संपेपर्यंत मी ट्रेनिंग हॉलमधे बसून सगळे सेशन्स पूर्ण ऐकायचो. कधीच थिएटरच्या डोअर कीपर सारखा वागलो नाही. यामुळे माझा सर्व विषयांचा अभ्यास होत गेला.
3) श्री. मनोहर नाडकर्णी NIMID , श्री. रमेश दवे, EDII - Ahmedabad. यांचे AMT अटेंड केले आणि त्यावर आधारित लिखाण केले.
4) AMT ट्रेनर्स मॅन्युअल निर्माण केले आणि रानडे साहेबांना आनंद झाला.
5) नावीन्यपूर्ण जाहिराती आणि स्लोगन्स - बालगंधर्व नाट्यगृहात नाटक पहात असताना सुचले.
"प्रदर्शन नव उद्योजकांच्या उत्पादन वस्तूंचे
पाहण्यासाठी आपण खात्रीशीर यायचे
प्रयत्न आहेत हे आमचे आणि प्रशिक्षणार्थिंचे
पाहुन ठरवा तुम्हीही उद्योजक बनायचे ."
6) आवडते विषयांचे भरपूर वाचन...200 पेक्षा अधिक पुस्तकांचे वाचन.
माझं जे काही साहित्य योगदान आहे ते केवळ उद्योजकता, व्यक्तिमत्व विकास, संस्था विकास या विषयांपुरतच मर्यादित आहे.
पण उद्योजकता या विषयावर मराठीत पुस्तक लिहणारा मी पहिलाच लेखक आहे. माझ्या नंतर अनेकांनी लिहले आहे.
कधी कधी मला वाटते, मी जर कृषी,महसूल,पोलीस अशा दुसऱ्या कोणत्या विभागात नोकरी केली असती तर तिथेही असंच अभ्यासपूर्वक लिखाण केलं असतं.
7) बारामती - उद्योजकता विकास कार्यक्रम प्रचार पुस्तिका लिहली.
-'मिटकॉन ते एमसिईडी',लेख लिहला. खरंतर हा लेख मिटकॉन च्या MD किंवा MCED च्या कार्यकारी संचालकाने लिहायला हवा होता. पण मी आणि विश्वास देवकरने तो 1988 च्या दिवाळीच्या सुट्टीत लिहला.
-कोणताही लेख लिहताना त्या विषयाचा विषय प्रवेश - मुख्य भाग - उपयुक्त शेवट अशी रचना असते . लेखकाच्या डोक्यात हा विषय 24 तास फिरत असतो .
या विषयाचा शेवट मला भारदस्त वाक्यांनी करायचा होता. दुसऱ्या दिवशी सकाळी संडासला बसलेलो असताना मला पुढील वाक्य सुचली...
... "उद्योजकता विकासाची घोडदौड जर अशीच सुरु राहिली तर महाराष्ट्रात घराघरात उद्योजक ही स्थिती फार दुर नाही."
8) ठाणे, नांदेड, रत्नागिरी, बारामती, पुणे, कार्यक्रमांच्या स्मरणीका प्रकाशित केल्या.
9) 'उद्योजक',' संपदा 'अशा मासिकमधून लेख प्रकाशित केले.
आतापर्यंत माझे वर्तमाणपत्र आणि मासिकमधून बरेच लिखाण झाले होते.
आता आपण पुस्तक लिहावे असे मला सुचले.
-'उद्योजकता', यापहिल्या पुस्तकासाठी श्री.गंगाधर महांबरे यांचे मार्गदर्शन लाभले.
10) 'उद्योजकता', पुस्तक लिखाण - 1987 ते 1991 पर्यंत मी Achievement Motivation Training या विषयात पुष्कळ काम केले होते. हा विषय मला आत्मसात झाला होता. उद्योजकीय संकल्पनांचा विचार केला तर हा विषय मला तोंडपाठ झाला होता. त्यावरच आता पुस्तक लिहायचे होते.
श्री विश्वास देवकर याने शब्दांकन केले आणि श्री शशिकांत कुंभार याने पुनर्लेखन लेखन केले.
-श्री राजू देशपांडे यांनी पुस्तकाला illustrations दिले आहेत.
-श्री कै मनोहर नाडकर्णी यांची पुस्तकास प्रस्तावना लाभली.
पुस्तक प्रकाशनासाठीचे दोन प्रयत्न...
-महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालाय, महाराष्ट्र राज्य यांनी माझे पुस्तक प्रकाशित करावे असा प्रयत्न.
त्यांनी 'उद्योग साधना ', हे पुस्तक प्रकाशित केले होते.
60000 प्रती 50000 प्रती 5000 प्रती...
तेव्हा श्री विनय बन्सल हे विकास आयुक्त उद्योग आणि श्री विलासराव देशमुख, उद्योग मंत्री होते.
मी माझे मोठे भाऊ कालिदास देवकर, श्री उल्हासदादा पवार, श्री. उत्तमराव आरडे, अशा आम्ही सर्वांनी मंत्रालयात खूप प्रयत्न केले.
पण श्री विनय बन्सल यांनी या प्रस्तावास नकार दिला.'उद्योग साधना', या विषयाची दुसरी बाजू म्हणजे 'उद्योजकता ', या विषयाचे महत्व समजून त्यांनी माझे पुस्तक प्रकाशित करायला काहीच हरकत नव्हती पण त्यांनी इगो पॉईंट केला.
-मिटकॉनचे तत्कालीन MD श्री एस पी रानडे आणि कॉन्टी्नेंटल प्रकाशनचे श्री अनिरुद्ध कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले.
-पुस्तक एक, दीड वर्षे वेटिंग लिस्टवर होते.
-विषय कॅटेगरी - वाणिज्य.
11) दरम्यान दुसरे पुस्तक तयार झाले. 'व्यावसायिक उद्योजकता ', गाज प्रकाशनने प्रकाशित केले.
-लेखकाला भारत सरकारचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला.
आता लेखकाचे लौकिक अर्थाने वजन वाढले होते, त्यामुळे पुस्तक वेटिंग लिस्ट मधून बाहेर आले.
-कै. अनिरुद्ध कुलकर्णी, फार मोठ्या मनाचा माणूस होता.
प्रकाशन समारंभ - डॉ. आप्पासाहेब पवार, श्री. यशवंत भावे, विकास आयुक्त, उद्योग विभाग, महाराष्ट्र राज्य. कै. अनंतराव कुलकर्णी, श्री. उल्हासदादा पवार यांच्यासारखे दिग्गज पहिल्या रांगेत बसले होते.
-श्री. सुभाष दांडेकर, कॅम्लीन, डॉ. सुधीर गव्हाणे, जे पुढे मराठावडा विद्यापीठचे कुलगुरू झाले त्यांनी पुस्तक परीक्षण लिहले.
-'उद्योजकता' - पुस्तकातील शेवटच्या चार ओळी.
'हीच वेळ आहे, वाजवी साहस पत्करण्याची,
हीच वेळ आहे, अनेक समस्या सोडविण्याची,
हीच वेळ आहे, पुढाकार घेवून यशस्वी होण्याची,
हीच वेळ आहे, स्पष्ट ध्येय ठरविण्याची...उद्योग विश्वात पदार्पणाची!'
12) 'उद्योग संधी, शोधा म्हणजे सापडेल', पुस्तक.
संकल्पना - Business Opportunity Search & Scanning.
'हे जग उद्योग संधीन्नी भरलेले आहे, तुम्हाला ती संधी दिसली तर.'
-पुण्यात दुसरे उद्योजकीय मराठी साहित्य संमेलन नियोजित होते, त्यात नवीन पुस्तक प्रकाशित करावे असा विचार मनात आला.
-पुणे- कोल्हापूर बस प्रवासात पुस्तकाचे नांव आणि अनुक्रमणिका तयार झाली आणि खूप कमी वेळात पुस्तक संहिता तयार झाली.
प्रस्तावना -
डॉ.बी.आर.साबडे, सेक्रेटरी, MCCI & ए
शब्दांकन - श्रीमती आनंदी कुलकर्णी काकू.
प्रकाशन - दुसरे मराठी उद्योजकीय साहित्य संमेलन -पुणे.
डॉ. गंगाधर गाडगीळ.
नावीन्यपूर्ण उद्योग संधी...
या पुस्तकात लिहलेल्या बिसनेस आयडिया वर पुढे उद्योग आले. 1) काउन्ट डाऊन सिग्नल. 2) सूर्यच जर पृथ्वीपासून 1000 किमी वर स्थिर केला तर. इ.
-पुणे विद्यापीठ स्टडी बोर्ड - विषय- व्यावसायिक उद्योजकता, सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली.
डॉ. श्रीपाद कडवेकर,डीन, वाणिज्य विभाग, पुणे विद्यापीठ,
डॉ. रवींद्र कोठावदे,C T Bora कॉलेज शिरूर.
13) Motivation Academy प्रकाशन -
-'उद्योगी मेहनती व्यक्तिमत्व विकास", पुस्तक.
-एक स्वप्न पडलं आणि डॉ एलीस अल्बर्ट यांची REBT सोपी करून सांगण्यासाठी उदाहरण मिळालं.
14)'जीवन कौशल्ये',
15)'अविरत संस्था विकास',ही पुस्तके लिहून तयार आहेत.
ज्यांना लिहायची आवड आहे त्यांना सोशल मीडिया मुळे अनेक माध्यमं उपलब्ध झाली आहेत.
FB
www.yogirajdeokar.blogspot.com
ब्लॉग लिखाण.
पण पेपर माध्यम सर्वांत प्रभावी माध्यम आहे. त्याची retention value अधिक आहे.
तुमची अटीट्युड म्हणजे अभिवृत्ती...रुझान.
तुमची ॲपटीट्युड म्हणजे अभिरुची, प्रतिभा, योग्यता. स्वतःच्या या दोन्ही बाबी समजून घ्या.
स्वतःची प्रतिभा उभारणीसाठी वाचन करा , प्रशिक्षण घ्या, चिंतन आणि मनन करा.
-स्वतः अनुभव, अनुभूती घ्या. स्वतःचा समज, perception, awarness level वाढावा.
भाषांतर केल्याने शब्द संग्रह वाढतो.
समानार्थी शब्द संग्रह वाढावा.
प्रत्येकाची जन्माला आल्यानंतर
ऐकणे
बोलणे
वाचणे
लिहणे
शिकणे आणि उपयोगात आणणे अशी वाटचाल होत असते.
लेखक व्हायचे असेल तर हे चारही घटक आणि विषयाचे चिंतन, मनन उपयोगात आणणे महत्वाचे ठरते...
आपणाशी हितगुज साधण्याची संधी मला दिल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार.
योगीराज देवकर.
No comments:
Post a Comment