Tuesday 21 June, 2011

प्रामाणिकपणाचे कौतुक:

मध्यंतरी जमीनीच्या मोजणीचे काम होते. अशा कामासाठी जेवढा खर्च ऑफिसिअल येतो त्यापेक्षा जास्त खर्च अनऑफिसिअल येतो असे या क्षेत्रात ऐकायला मिळते. अशा वातावरणात अपवाद आहेत.
श्री. बाळासाहेब भोसले, उप अधीक्षक, भूमी अभिलेख, इंदापूर. यांनी मला फोनवर सांगितले कि तुम्ही जमीन मोजणी साठी कोणालाही पैसे देण्याची गरज नाही. कार्यालयातील कोणाबरोबरही आर्थिक डील करण्याची गरज नाही या कार्यालयामार्फत प्रामाणिकपणे तुमचे जमीन मोजणी चे काम पूर्ण केले जाईल तसे त्यांनी ते पूर्ण केलेही.
आपण जर भ्रष्टाचाराबद्दल बोलत असाल तर प्रामाणिकपणाच्या अनुभवाबद्दलही बोलावे.

2 comments:

डॉ. सुभाष य. पवार said...

फारच छान! कौतुक तुम्हा दोघांचे, देणाऱ्यांचे व घेणाऱ्यांचेही !! माझ्या शुभेच्छा, अशा समविचारी लोकांची संख्या वाढण्यासाठी व वाढविण्यासाठी.
- सुभाष पवार, पुणे.

Yogiraj Deokar said...

धन्यवाद ! पवार सर,

आपण पैसे न घेणाराचे आणि न देणाराचे कौतुक करत आहोत. आता अण्णा हजारेंच्या आंदोलनासही पाठींबा असुद्या.