Wednesday, 11 February 2026

शुद्ध तमोगुणी इडा नाडी.

 गुणांबद्दल बोलू काही !

शुद्ध तमोगुणी इडा नाडी : 


मानवाच्या सूक्ष्म शरीरात  डाव्या बाजूला असलेली नाडी ही चंद्र तत्त्वाशी संबंधित नाडी आहे.

इडा नाडी आपल्या भावना, स्मृती, अवचेतन, इच्छा आणि भक्ती यांचे प्रतिनिधित्व करते.


इडा नाडीवरील तमोगुण – गुण की दोष?


सत्व, रज आणि तम या तीन गुणांच्या योगाने जीवन चालते. प्रत्येक गुणात शुद्ध व शबल असा भेद केला जातो. शुद्ध गुण परमार्थाकडे नेतो तर तोच गुण शबल असेल तर प्रपंचाकडे खेचतो . जे निर्मळ असते ते शुद्ध आणि जे मिश्रित असते ते शबल होय. शबल बाधक असते.


तमोगुण स्वतः दोष नाही, पण कमी/अतिरिक्त झाला तर तो दोष बनतो.


तमोगुणाचे नैसर्गिक गुण:

विश्रांती,

चांगली झोप,

पावित्र्य,

स्थैर्य,

शुद्ध इच्छा,

भावनिक प्रगल्भता,

समर्पण,

सर्व मानवासाठी हे आवश्यक गुण आहेत.


पण तमोगुण असंतुलित झाला तर…

आळस,सुस्ती,

जडत्व,अती झोप,

उदासीनता,

नैराश्य,

भीती,असुरक्षितता,

भूतकाळात अडकून राहणे,

नकारात्मक आठवणींचा पगडा,

काम,मोह,मत्सर, असे दोष निर्माण होतात.


तमोगुणातील भयंकर विकार स्वार्थ असतो पण तो अमर्याद असतो. आसक्ती असते पण ती अवास्तव असते.

अनुष्ठान असते पण ते आततायी असते.

साधन असते पण ते अघोरी असते.

तमोगुणी माणूस संगती करण्यास कठीण असतो.नाईलाजाने त्याला माणूस म्हणायचे इतकेच.


इडा नाडी शुद्ध व संतुलित असेल तर होणारे लाभ:


शारीरिक लाभ:

चांगली झोप लागते.

मानसिक तणावातून होणारे आजार कमी होतात.


मानसिक लाभ:

मन शांत, स्थिर व प्रसन्न राहते.

नैराश्य, भीती, तणाव कमी होतो.

भावनांवर नियंत्रण येते.

भूतकाळाचा भार सुटतो.


भावनिक लाभ:

प्रेम,करुणा सहज वाहते.

राग, द्वेष, मत्सर कमी होतो.

नात्यांमध्ये समजूतदारपणा येतो.

संवेदनशीलता वाढते.


आध्यात्मिक लाभ:

इडा नाडी संतुलित होते तेव्हा ध्यान चांगले होते.

शीतलता अनुभवास येते.

शुद्ध इच्छा जागृत होतात.


असा मानव भावनांचा गुलाम न राहता भावनांचा साक्षी बनतो.


संदर्भ - परम पूज्य श्री माताजी निर्मला देवी प्रणित सहजयोग.

दासबोध ग्रंथ.

अधिक माहितीसाठी - 

Sahajayogapune.org

Sahajayogamumbai.org.org


लेखन - योगीराज देवकर.