Friday, 13 February 2026

शुद्ध सत्वगुणी sushumna nadi

 गुणांबद्दल बोलू काही!

शुद्ध सत्वगुणी सुषुम्ना नाडी :


मानवाच्या सूक्ष्म शरीरात 

सुषुम्ना नाडी ही मध्यातून जाणारी नाडी आहे.

ती वर्तमान, आत्मा, साक्षीभाव, धर्म आणि सत्य यांचे प्रतीक आहे.

इडा (भावना) व पिंगला (कृती) संतुलित झाल्यावरच सुषुम्ना (ज्ञान) नाडी सक्रिय होते.


सुषुम्ना नाडीवरील सत्त्वगुण – गुण की दोष ?


सत्त्वगुण हा स्वतः गुण आहे,इथे सर्व षडरिपु गळून पडतात. तरी इथेही शुद्ध गुण आणि शबल गुण असा भेद केला जातो. शुद्ध गुण परमार्थाकडे नेतो तर शबल गुण प्रपंचाकडे नेतो . सत्व, रज ,तम या तीन त्रिगुणांच्या योगाने जीवन चालते.

उदाहरणार्थ ...

प्रापंचिक त्रिगुण : ' असा माणूस जग माझ्यासाठी आहे ही भावना असल्याने स्वार्थमय असतो.'

'सत्ताधारी ,श्रीमंत,कलावंत,राजविलासी आणि चैनी पुरुष आदर्श मानले जातात,असे व्हावेसे वाटते .'


पारमार्थिक त्रिगुण : ' असा माणूस मी जगासाठी आहे ही भावना असल्याने निःस्वार्थी असतो.'

' साधू,संत, महात्मे,योगी,त्यागी, आत्मज्ञानी व भगवंताचे प्रेमळ भक्त आदर्श असतात , तसे व्हावेसे वाटते.' 


सत्वगुण:

आविष्कार,

उत्क्रांती,

प्रकाश,धर्म,ज्ञान,

शांती,समाधान,

निःस्वार्थ प्रेम,

ईश्वर प्रेम,

विवेकी वृत्ती,

दानशूर,

उत्सवप्रिय ,

सजगता.

शुद्ध आत्मज्ञान होणे ही सत्वगुणाची खरी करामत आहे. अशी व्यक्ती पूर्ण वासनारहित , अभिमानरहित,अत्यंत दयाळू,नम्र,परोपकारी ,विशाल अंतःकरणाची असते .


सत्त्वगुण म्हणजे आत्म्याचा प्रतिबिंबित गुणधर्म. पण अति सत्त्वाभिमान झाला तर,

अध्यात्मिक अहं.

“मी शुद्ध आहे.” ही सूक्ष्म गर्वभावना येते. 

प्रतिक्रिया व्यक्त केल्या जातात. अहंकार म्हणजे प्रतिक्रिया ,त्या नियंत्रणात ठेवा,प्रतिक्रिया द्यायच्याच असतील तर अत्यंत गोड,चांगल्या द्या,अहंकार अत्यंत कोमल,गोड, प्रेममय आणि विनोदी असू द्या. सत्त्वगुणातही नम्रता आवश्यक आहे.


सुषुम्ना नाडी शुद्ध व संतुलित असेल तर होणारे लाभ: 


शारीरिक लाभ:

ऑटोनॉमिक नर्व्हस सिस्टिम संतुलित राहते,

तणावजन्य आजार कमी,

शरीरात हलकेपणा,

आरोग्य सुधारते.


भावनिक लाभ:

शांतता व समाधान,

इच्छा,आशा,आकांक्षा,भावना शुद्ध राहतात,

प्रतिक्रिया नसतात, प्रतिसाद असतो.


बौद्धिक लाभ :

विवेक कार्यरत होतो,

एकाग्रता वाढते, हुशारीत वाढ होते.


आध्यात्मिक लाभ:

कुंडलिनी सहज व नियमित उर्ध्वगामी होते,

चक्रे शुद्ध होऊ लागतात,

ध्यान खोल व सहज होते,

आत्मसाक्षात्कार टिकून राहतो,

वर्तमानात स्थिरता,

सूक्ष्म संवेदनांची जाणीव होते,

अंतर्ज्ञान जागृत होते,

निर्विचार ( Thoughtless awareness) अवस्था प्राप्त होते,

निर्विकल्प (Doughtless awareness) अवस्था प्राप्त होते,

निरानंद अनुभवास येतो.


सुषुम्ना सक्रिय मानवाचे जीवन:

कृती होते पण कर्तेपणा नसतो.

प्रेम असते पण आसक्ती नसते.

शिस्त असते पण ताण नसतो.

नेतृत्व असते पण अहं नसतो.


सत्वगुणात प्रतिभा जागृत होते, बुद्धी आत्मप्रकाशाने भरून जाते. तात्पर्य ,स्वरूप साक्षात्कार होण्यास लागणारी पूर्वतयारी होते.


संदर्भ - परम पूज्य माताजी श्री निर्मला देवी प्रणित सहजयोग.

दासबोध ग्रंथ.

अधिक माहितीसाठी -

Sahajyogapune.org

Sahajayogamumbai.org


लेखन - योगीराज देवकर .

No comments: