गुणांबद्दल बोलू काही !
शुद्ध रजोगुणी पिंगला नाडी :
मानवाच्या सूक्ष्म शरीरातील उजव्या बाजूला असलेली ही सूर्य तत्त्वाशी संबंधित नाडी आहे.
पिंगला नाडी आपल्या क्रिया, विचार, बुद्धी, अहंकार, नियोजन, कार्यक्षमता आणि भविष्याभिमुखता यांचे प्रतिनिधित्व करते.
पिंगला नाडीवरील रजोगुण – गुण की दोष?
रजोगुण स्वतः दोष नाही, तो मानवाच्या उत्क्रांतीसाठी आवश्यक गुण आहे.
पण तो अतिरिक्त झाला की तो दोषात परिवर्तित होतो.
रजोगुणाचे नैसर्गिक गुण:
स्वाभिमान,
कृतीशीलता,उद्योगिपणा,
उर्जा,
ध्येयपूर्ती,लढावू वृत्ती,महत्वाकांक्षा,
परिश्रम,गतिमानता,
नियोजन,
बुद्धीची हुशारी, हे सर्व गुण नसते तर मानव प्रगतीच करू शकला नसता.
सत्वगुणी माणूस खऱ्या अर्थाने माणूस असतो. पण शुद्ध रजोगुणी माणूसुद्धा सत्वगुणी मानायला हरकत नाही.
पण याच रजोगुणाचा अतिरेक झाला किंवा हे गुण प्रपंचाकडे वळले की त्याचा दुरपयोग होतो आणि मानवात ...
अहंकार,
आक्रमकता,
अतिविचार,
चिडचिड,
अधीरता,
स्पर्धात्मक वृत्ती,
कामाचा अतिरेक (workaholism),
वासना,
क्रोध,मद,लोभ,
इर्षा,गर्व, असे दोष निर्माण होतात.
पिंगला नाडी शुद्ध व संतुलित असेल तर होणारे लाभ :
शारीरिक लाभ:
नर्व्हस सिस्टिम संतुलित राहते.
उष्णतेमुळे होणारे त्रास कमी होतात.
डोकेदुखी, तणाव, रक्तदाबाशी संबंधित त्रास कमी होतात.
मानसिक लाभ :
विचार स्पष्ट व तर्कशुद्ध होतात.
निर्णयक्षमता वाढते.
विवेकबुद्धी जागृत होते.
विचार कृतिशील होतात.
भावनिक लाभ :
उर्जा स्थिर राहते (over-excited होत नाही).
आळस न राहता उत्साह टिकतो.
कामात सातत्य येते.
आध्यात्मिक लाभ:
अहंकार कमी होतो.
“मी करतो” या भावनेऐवजी “वैश्विक शक्ती करते” हा भाव येतो.
पिंगला नाडी संतुलित होते तेव्हा ध्यान चांगले होते.
असा मानव कृती करतो, पण कृतीत अडकत नाही.
संदर्भ - परम पूज्य माताजी श्री निर्मला देवी प्रणित सहजयोग.
दासबोध ग्रंथ.
अधिक माहितीसाठी -
Sahajayoapune.org
Sahajayogamumbai.org
लेखन - योगीराज देवकर.
No comments:
Post a Comment