गुणांबद्दल बोलू काही!
भवसागर , Void :
मानवाचे जीवन म्हणजे केवळ शारीरिक,भौतिक जीवन जगण्याचा प्रवास नसून, तो एक भवसागर पार करण्याचा प्रवास आहे. भव + सागर = भवसागर
याचा अर्थ ,
जन्म-मृत्यू, सुख-दुःख, मोह-माया यांनी भरलेला संसाररूपी अथांग सागर .संसारातील दुःख, भ्रम, आसक्ती आणि अज्ञान यांचे प्रतीक. जीवनात ही पोकळी भरून काढायची असेल तर त्यासाठी आवश्यक आहे कुंडलिनी जागृती द्वारा आत्मसाक्षात्कार. मणिपूर चक्राच्या भागात, भवसागरात सुषुम्ना नाडी खंडित झालेली असते. आत्मसाक्षात्कारानंतर स्वतः कुंडलिनी ही खंडित नाडी जोडण्याचे कार्य करते आणि ही पोकळी भरून काढते.
धर्माचे ज्ञान : धर्म म्हणजे बाह्य नियम नव्हेत, तर अंतर्गत शुद्धी,संतुलन आहे. जेव्हा कुंडलिनी शक्ती मणिपूर चक्र पार करते, तेव्हा मानवाच्या चेतनेत खरा धर्म प्रस्थापित होतो. हा धर्म आत्मजाणिवेवर आधारित असतो. तेथे “मी करतो.” हा अहंकार विरघळतो आणि “हे घडते आहे.” अशी सहज अवस्था प्राप्त होते.
मूल्ये - तत्त्वे आणि मानवी जीवनाचे गुणधर्म असलेल्या दहा आज्ञा ( Ten Commandments) ही बंधने नसून, स्वतःच्या अंतःशुद्धीची साधने आहेत.
धैर्य : कुंडलिनी जागृत झाल्यानंतर येणाऱ्या धैर्यामुळे अंतर्गत बदलांना स्वीकारण्याचे सामर्थ्य लाभते. धैर्यामुळे साधक जीवनात स्थिरावतो.
क्षमा : मानवातील अत्यंत महत्त्वाचा गुण. “मी सर्वांना क्षमा केली .” या भावनेने आज्ञा चक्र खुलते आणि कुंडलिनीचा प्रवाह सुलभ होतो.
शांती : निर्विचार समाधीची अवस्था. विचार,प्रतिक्रिया थांबले की शांती सहज प्रकट होते.
चोरी न करणे (अस्तेय) : इतरांच्या श्रेयावर , शक्तीवर, संपत्तीवर अधिकार न गाजवणे. 'माझं ते माझं आणि तुझं ते पण माझं', असे न वागणे. मनातही चोरीचा ,भ्रष्टाचाराचा विचार न येणे, चोर न बनणे हा सूक्ष्म स्तरावरील धर्म आहे.
पवित्रता : पवित्रता म्हणजे केवळ शारीरिक नव्हे, तर भावनिक,बौद्धिक,आत्मिक, स्वच्छता.
संयम : इंद्रियांवर नव्हे, तर इच्छां,भावना ,षडरिपुवर
प्रभुत्व.
बुद्धी (विवेक) : चैतन्याच्या आधारे योग्य-अयोग्य, चुक- बरोबर , करावे - करू नये , ओळखण्याची क्षमता.
विद्या : सहजज्ञान म्हणजे तुमची वर्तणूक, मनोवृत्ती,भावना, सर्वसाधारण दृष्टिकोन, खरे तुम्ही असे स्वतः
स्वतःलाच ओळखल्यामुळे समजणे. जाणीव होणे.
सत्य : तुम्ही आत्मा आहात हे सर्वात मोठे सत्य आहे . नेहमी सत्याच्या मार्गावर चालणे.
अक्रोध : क्रोधाचा अभाव नव्हे, तर अहंकाराचा क्षय.
मानवी सूक्ष्म शरीरातील तीन नाड्या संतुलन आणि चक्र शुद्धीशिवाय मूल्ये आत्मसात होत नाहीत. बाह्य प्रयत्नांनी काही काळ नैतिकता पाळता येते, पण कुंडलिनी जागृतीनंतर ही मूल्ये स्वभावाचा ,धर्माचा भाग बनतात. मग सत्य बोलण्यासाठी प्रयत्न करावा लागत नाही, क्षमा आपोआप घडते, आणि संयम सहज प्रकट होतो.
“तुम्ही ,मन,बुद्धी,शरीर,अहंकार ,इ.काहीही नसून केवळ आत्मा आहात.”
ही जाणीव दृढ झाली की जीवन आपोआप धर्ममय, शांतीमय आणि आनंदमय होते.
संदर्भ - परम पूज्य माताजी श्री माताजी देवी प्रणित सहजयोग.
आध्यात्मिक उन्नतीसाठी संपर्क करा.
Sahajayogapune.org
Sahajayogamumbai.org
लेखन - योगीराज देवकर.
No comments:
Post a Comment