गुणांबद्दल बोलू काही!
मणिपूर चक्र : तिसरे चक्र.
मानव हा केवळ देह-भावना-बुद्धी यांचा संयोग नसून, तो एक सूक्ष्म ऊर्जासंरचनेने युक्त चेतन अस्तित्व आहे. या सूक्ष्म प्रणालीतील सात प्रमुख चक्रांपैकी मणिपूर (नाभी) चक्र हे मानवी जीवनाच्या धर्म, नीती आणि आंतरिक संतुलनाचे केंद्र आहे.नाभी चक्राला धर्मचक्र संबोधले जाते , कारण याच ठिकाणी मानवी आचरणाचे योग्य-अयोग्य मोजमाप घडते.
मणिपूर चक्र नाभी प्रदेशात स्थित असून, ते
प्लीहा (Spleen)
यकृत (Liver)
स्वादुपिंड (Pancreas)
पचनसंस्था
यांच्याशी सूक्ष्म पातळीवर जोडलेले आहे.
या चक्राचे संतुलन बिघडल्यास असंतोष, चिडचिड, लोभ, अति-विचार आणि भावनिक अस्थिरता वाढते.
मणिपूर चक्राचे गुण:
१) संतोष :
संतोष म्हणजे स्थितप्रज्ञ अवस्था—जिथे मन वर्तमान क्षणात स्थिर असते.कुंडलिनी नाभी चक्रातून शांतपणे वाहू लागली की ध्यानात एक अनुभव येतो:
पोट हलके वाटते,
गरजांबद्दल अति विचार राहत नाही,
“मला अजून हवे.” ही अस्वस्थता कमी होते.
हा संतोष बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसतो; तो आतून प्रकट होतो.
२) समाधान :
समाधान म्हणजे कर्म आणि धर्म यांचा समन्वय.
मणिपूर चक्र शुद्ध असताना व्यक्ती,
कर्तव्य नीट पार पाडते,
अपेक्षारहित काम करते,
ध्यानानंतर अंतर्मनात शांती अनुभवते,हे समाधान अहंकारातून येत नाही, तर साक्षीभावातून जन्माला येते.
३) करुणा :
धर्म म्हणजे इतरांवर प्रभुत्व नव्हे, तर अंतःकरणातून उमलणारी करुणा.
मणिपूर चक्र जागृत झाल्यावर करुणा सहज प्रकट होते:
दुसऱ्याचे दुःख पाहून मन अस्वस्थ होते,
मदतीची प्रेरणा आतून येते,
कोणताही दिखावा न करता सेवा घडते.करुणेमुळेच समाजात समतोल व सुसंवाद निर्माण होतो.
४) प्रेम :
मणिपूर चक्रातील प्रेम हे
आसक्तीविरहित,
अपेक्षारहित,
अधिकाररहित,
असते.
ध्यानामुळे रागाची तीव्रता कमी होते,
नात्यांमध्ये मृदुता येते,
“माझेच बरोबर.” ही धारणा सैल होते.मणिपूर चक्र शुद्ध नसेल तर हृदयाचे प्रेमही शुद्ध स्वरूपात प्रकट होत नाही.
५) उत्क्रांती :
उत्क्रांती म्हणजे
जाणीवेचा विस्तार.
मणिपूर चक्र संतुलित झाल्यावर:
“मी” कमी होतो
“आपण” प्रकट होते,
व्यक्ती सामूहिकतेशी जोडली जाते,
कुंडलिनी नाभी चक्रातून वर चढताना साधकाला ध्यानात आंतरिक स्थैर्य व निश्चल आनंद अनुभवायला मिळतो. हाच मानवी उत्क्रांतीचा खरा टप्पा आहे—बाह्य प्रगतीपेक्षा अंतर्गत परिवर्तन.
थोडक्यात ,मणिपूर चक्र—धर्माचा दीपस्तंभ,
संतोष, समाधान, करुणा, प्रेम आणि उत्क्रांती हे गुण नैतिक शिकवण नसून, मणिपूर चक्र शुद्ध झाल्यावर सहज प्रकट होणारी चेतना आहे.
संदर्भ - परम पूज्य माताजी श्री निर्मला देवी प्रणित सहजयोग.
आध्यात्मिक उन्नतीसाठी संपर्क करा -
Sahajayogapune.org
Sahajayogamumbai.org
लेखन - योगीराज देवकर.
No comments:
Post a Comment