Thursday, 21 April 2022

Best one minute in SCGT Wakad

 उद्योजक्स प्रणिपात असो !


अहो. ! SCGT मेंबर्स तुमचा माझ्यावर भरोसा आहे का ?.....आहे ना !


मी देवकर,तीस वर्षे चालवितो मोटिव्हेशन अकॅडेमी हे तुम्हाला माहीत आहे का ? .....आहे ना !


विषय काय $$$, अहो

उद्योजकीय प्रेरणा,

सॉफ्ट स्किल्स आणि

संस्था विकास,तुम्हाला समजून घ्यायचं आहे का ? .....आहे ना !


क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी,

राज ग्रुप,

क्यूबिक्स ऑटोमेशन ,

कूल फौंडेशन,एम सी इ डी,

इथं तुम्हाला रेफेरेन्स हवा आहे का ?..... आहे ना !


बेटयांनो$$$ तुम्हाला इलू इलू माहितीयं, तसं माझा USP, USP "आत्मपरिक्षणाची संधी " तुम्हाला साधायची आहे का ? .....आहे ना !


भिडे साहेब सांगून गेले,"एकमेका सहाय्य करा,अवघे बना श्रीमंत!"

मग तुम्ही मला ब्रेक थ्रू देणार आहे का ? .....आहे ना !


Industries associations, Training associations आणि organizations तुमच्या माहितीत आहेत का ! .....आहे ना !


माझी आजपर्यंत क्लबला आणि तुम्हाला काही मदत झाली आहे का ? .....आहे ना !


"स्वतः प्रेरित रहा आणि इतरांना प्रेरित करा !"ही माझी    Tag line तुम्ही कधी वाचली आहे का ? .....आहे ना !


मी देवकर आणि माझी मोटिव्हेशन अकॅडेमी तुम्हाला समजली आहे का ? .....आहे ना !


3w.motivationacademy.in ला तुम्ही कधी व्हिजिट केली आहे का? .....आहे ना !


अहो मेंबर्स$$$, सगळं आहे ना$$$ !आहे ना$$$ ! म्हणताय ,मग तुमचा माझ्यावर भरोसा नाही का ? .....आहे ना !


आरे हाय काय$$$ आणि न्हाय काय$$$ ! अढीच वर्षे झाली ना राव.

चला आता करतो तुम्हाला JRD टाटा आणि बाय बाय !


योगीराज देवकर.

लेखक,प्रेरक,प्रशिक्षक.

20 एप्रिल 2022

Friday, 15 April 2022

बेस्ट 1 मिनिट

 Saturday Club वाल्यांनो नमस्कार !


मी आहे मोटिव्हेशन अकॅडेमी. आज मी तुम्हाला माझे मनोगत  सांगणार आहे.


श्री योगीराज देवकर यांनी 23 जुलै 2019 रोजी माझी स्थापना केली. वाटलेच मला, केला का लगेच माझ्या वयाचा हिशेब, माझ्या वयाकडे पाहून मला कुकुलं बाळ समजू नका कारण श्री देवकर गेली तीन दशके ट्रेनर म्हणून काम करीत आहेत.


श्री योगीराज देवकर ,

उद्योजकीय प्रेरणा,

सॉफ्ट स्किल्स आणि

संस्था विकास अशा अनेक विषयांवर फार अभ्यासपूर्ण व्याख्येने देतात.


क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी,बारामती.

राज ग्रुप,पुणे. 

क्यूबिक्स ऑटोमेशन प्रा ली,पुणे.

संजय घोडवत इन्स्टिट्यूट,कोल्हापूर. 

कुमार बिल्डर्सची कूल फौंडेशन . अशी अनेक नावे सांगता येतील जिथे त्यांची व्याख्याने झालेली आहेत.


खरंतर त्यांचे फक्त व्याख्यान नसतेच तर ती प्रशिक्षणार्थी साठी आत्मपरिक्षणाची संधी असते.


Success stories म्हणाल तर त्या क्लब मध्ये तरी आता तुम्ही आणि मीच तयार करायच्या आहेत. प्रत्येक मीटिंग मध्ये तुम्ही मला रेफेरेन्सस,कनेक्टस द्या. स्टोरीज तयार होतील.


तुम्ही मला तुमच्या ओळखीच्या किंवा माहितीच्या Small आणि medium scale Industries ,Trusts, organizations आणि कॉलेजेस मध्ये घेऊन जावू शकता.


श्री देवकर हे लेखक आहेत ,त्यांची तुम्हाला Content writing साठी मदत होऊ शकते.


आता हेच बघा ना त्यांनी मला Tag line दिलीय- "स्वतः प्रेरित रहा आणि इतरांना प्रेरित करा !"


लक्षात ठेवा मी मोटिव्हेशन अकॅडेमी आणि माझा प्रवर्तक श्री योगीराज देवकर.


आणि हो सोशल मीडियावर त्यांनी मला दिलेली ओळख...

www.motivationacademy.in नक्की व्हिजिट करा.


मनोगत ऐकल्याबद्दल आभारी आहे🙏

Monday, 4 April 2022

क्लब मध्ये दिलेले विनोदी वन मिनिट

 Hallo,

श्री अक्षय दुसाने, H R Manager, Bharat Forge, बोलत आहेत ना ?

नमस्कार,सर ,माझे नाव  योगीराज देवकर आहे आणि मी मोटीव्हेशनल स्पीकर आहे.

मला श्री निलेश कुलकर्णी यांनी आपला रेफरन्स दिला आहे सर.

हो,हो,तेच SCGT वाले निलेश सर,भला माणूस आहे सर तो.

सर माझी मोटिव्हेशन अकॅडमी आहे आणि मी

Motivation .

Soft Skills आणि

Organization Development, अशा बऱ्याच विषयांवर कंपनी मधील कर्मचाऱ्यांसाठी व्याख्याने देतो,सर.

अनुभव ना ? आहे की,

माझे किर्लोस्कर न्यूम्याटिक्स,  क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी,

राज ग्रुप, क्यूबिक्स ऑटोमेशन प्रा ली, कूल फौंडेशन, मिटकॉन, MCED, अशा अनेक ठिकाणी व्याख्याने झाली आहेत सर. 

पण कोविड नंतर याला ब्रेक लागलाय.

मला break through हवाय सर.

माझं वेगळेपण विचारताय ?

सर,माझे फक्त व्याख्यान नसते,तर प्रत्येक्ष अनुभव देणे आणि त्यातून शिकणे असते. Participants साठी आत्मपरिक्षणाची संधी असते.

काय म्हणालात RSS ? म्हणजे काय ?

Recent Success Story . आहे ना.

अहो त्या कौस्तुभ बाबर,माने अशा बऱ्याच जणांचे कार्यक्रम pipe line मध्ये आहेत. पण त्यांची pipe line फार मोठी आहे. कार्यक्रम बाहेर यायलाच तयार नाहीत.

SCGT त ना ? होतात ना कार्यक्रम. पण ते सगळे कार्यक्रम देवाला असतात सर. 

म्हणजे काय ?

म्हणजे तिथे मान आणि व्हिजिबिलिटी मिळते,पण मानधन नसते सर

Specific ask- सर,मला Bharat Forge मधील कर्मचाऱ्यांसाठी 

Self concept.

Time management.

Creativity.

Interpersonal relations.

Communication skills.

अशा 10-15 विषयांवर तरी व्याख्याने देण्याची इच्छा आहे सर.

मी काय देवू शकतो? 

सर,मी तुमच्या कंपनीतल्या माणसांची वर्तणूक,मनोवृत्तीत  बदल घडवून आणू शकतो.

Tag line विचारताय ?

आहे की,"स्वतः प्रेरित रहा आणि इतरांना प्रेरित करा !"

सर आमची www.motivationacademy.in अशी वेबसाईट आहे. नक्की पहा सर.

लक्षात ठेवा,

योगीराज देवकर आणि मोटिव्हेशन अकॅडेमी.

सांगतो ना. निलेश सरांना तुमचा नमस्कार सांगतो.

येतो ना,प्रपोजल घेऊन भेटायला येतो सर.

धन्यवाद ,अक्षय सर.


Thursday, 28 October 2021

कोजागिरी स्पेशल फॅमिली डे.

 

*कोजागिरी स्पेशल फॅमिली डे Presented by Saturday Club Global Trust- PCMC Region.*


SCGT म्हणजे उद्योजक सभासदांसाठी नवनव्या संकल्पना राबविणारा ट्रस्ट  .  उद्योजकांच्या कुटूंबियांना पण Network is Networth चे महत्व कळावे यासाठी हा कौटुंबिक सोहळा आयोजित केला होता. रिजन हेड, तीनही चाप्टरचे CST आणि इव्हेंट सपोर्ट टीम तयारीला लागल्या. इव्हेंट यशस्वी करण्यात विशेष मेहनत घेतली ती सौ मधुरा चिपडे मॅडम आणि श्री संजय पाटील यांनी. त्यांना मोलाची साथ लाभली ती श्री नीरज सर, श्री श्रीकांत यादव आणि सौ भारती मुरकुटे मॅडम यांची.


२० ऑक्टोबर २०२१ रोजी कुंदन गार्डन,बाणेर रोड,पुणे येथे ६.३० वाजता हा कार्यक्रम सुरू झाला आणि २०० पेक्षा अधिक लोकांच्या उपस्थितीत रात्री ११ पर्यंत उत्तरोत्तर रंगत गेला.


PCMC रिजन मधील उद्योजकांना बिझनेस प्रमोट करण्यासाठी खास टेबल स्पेस दिली होती.औंध-बाणेर चाप्टरचे श्री.नीरज कैथवास   - लॅपटॉप आणि IT मटेरिअल्स. श्री.अभय जमदग्नी- आयुर्वेदिक अभ्यंग किट. श्री.ढेरे गुरुजी- पूजा साहित्य आणि कंदील. सौ. गौरी जोशी- सोप्स . श्री. श्रीकांत माडगे- स्टॉक मार्केट. श्री.गजानन जाधव- ज्वेलरी. PCMC चाप्टरचे सौ.आश्विनी साळुंखे- केक्स. सौ.नीलम राजपूत- सेंद्रिय उत्पादने. सौ. मानसी अग्रवाल. श्री सागर हरपुडे. यांनी त्यांची उत्पादने प्रमोट करण्याची संधी साधली आणि कौटुंबिक कार्यक्रमात व्यावसायिक वातावरण निर्मिती केली.


श्री स्वप्नील कुलकर्णी प्रास्ताविकात म्हणाले की,"मुलांचे बाबा किंवा आई SCGT क्लबची मीटिंग अटेंड करायला जाते, 1 to 1 किंवा क्लब इव्हेंट्स साठी बाहेर पडते, तेव्हा ते तिथे जावून नक्की करतात तरी काय ? हा प्रश्न घरातल्या लहानग्यांना पडत असेल. यानिमित्ताने हा क्लब उद्योजकांसाठी नक्की काय काम करतो हे जर समजले तर त्यांचे कुतूहल पूर्ण होईल. कुटुंबातील सर्वांनाच क्लबचे कार्य आणि उद्योजकांसाठी नेटवर्किंग कसे महत्वाचे आहे हे समजले तर त्यांचाही उद्योजकांना पाठिंबा लाभेल, या हेतूने हा कोजागिरी स्पेशल फॅमिली  डे आयोजित केला आहे. आज येथे लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी काही न काही सरप्राईज आहे त्यांचा सगळ्यांनी आनंद घ्यावा."


लहानग्यांसाठी मॅजिक शो ने कार्यक्रमास सुरुवात झाली. मॅजिक शो सोबतच लहान मुलांची कृती आणि प्रश्नांना दिलेली निरागस उत्तरे यामुळे जे प्रासंगिक विनोद निर्माण झाले त्यामुळे लहान-थोर सगळेच खळाळून हसले.


त्यानंतर वाकड, औंध-बाणेर आणि PCMC चाप्टरच्या चेअरमन,सेक्रेटरी आणि ट्रेझरर यांनी प्रेसेंटेशन्स दिले. यात कोणी टीमची ओळख करून दिली,तर कोणी How Network is Networth चे महत्व सांगितले,तर कोणी आकडेवारी जाहीर केली,तर कोणी चक्क सक्सेस स्टोरीज सांगितल्या. हे सर्व चालू होते तेव्हा मोठे लक्ष देऊन ऐकत होते तर छोटे हॉल मध्ये खेळत आणि दंगा करत होते,यामुळेच आपण म्हणतो लहानपण देगा देवा.


नंतर फन ऍक्टिव्हिटीज घेतल्या गेल्या आणि धमाल केली ती आई-मुलांच्या फॅशन शो आणि कॅट वॉकने. पहिला नंबर मिळविण्यासाठी आई-मुलांची पूर्वतयारी आणि स्ट्रॅटेजी आणि स्टेजवरील प्रदर्शन एकदम लाजबाब होते.


डान्स करायला कोणाला नाही आवडत. हॉल मध्ये गाण्याची धून वाजू लागली आणि कोणी स्टेजवर जाऊन तर कोणी खुर्चीत बसूनच ठेका धरला.


शेवटी पोटपूजेसाठी पाव-भाजी, पुलाव आणि त्यानंतर मसाला दूध असा मस्त बेत होता ज्याचा सगळ्यांनी आस्वाद घेतला.


अशा कार्यक्रमामुळे लहान मुलांवर नकळत उद्योजकतेचे संस्कार होतील आणि यातूनच वारसदार तयार होतील हे नक्की. 


उद्योग तर आपल्यापैकी प्रत्येकजण  करतच आहे पण  थोडा चेंज,थोडा विरंगुळा, थोडी मस्ती प्रत्येकालाच हवी असते. त्यात कुटुंब सोबतीला असेल तर यशाचा मार्ग सुलभ होईल.


धन्यवाद SCGT.


योगीराज देवकर.

लेखक,प्रेरक,प्रशिक्षक.

ब्लॉग रायटर.

PCMC Region.

www.motivationacademy.in


Meeting with extra

 

*Wakad Chapter -Regular Meeting With Extra Facilities .*


Saturday Club Global Trust-SCGT सदस्य उद्योजकांसाठी नेहमीच काहीतरी नाविन्यपूर्ण कल्पना राबवित असतो.


SCGT वाकड चाप्टरने दि ६ ऑक्टोबर २०२१ रोजी  नेहमीच्या मीटिंग पेक्षा वेगळा असा एक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबविला .

   महाराष्ट्रीयन  उद्योजकांना बाजारपेठ विस्तारण्यासाठी पूरक ठरेल अशा या मीटिंगचे नाव होते...

*8 Minutes Business Presentation Conclave .*


मीटिंग अटेंडन्स डिटेल्स - 

PCMC रिजन हेड - स्वप्नील कुलकर्णी.

Satara रिजन हेड- केदार साखरे. 9175115275

चाप्टर चेअरमन - ४

वाकड चाप्टर मेंबर्स - २२

क्रॉस चाप्टर- सातारा, सिंहगड, कोथरूड , इचलकरंजी, मेंबर्स -१६

गेस्ट - ६

Grand Total - Half Century.

*विशेष काय* -

१) एकाच मीटिंगमध्ये ९ उद्योजकांनी स्वतःच्या बिझनेसची गुप्त व खाजगी माहिती तपशीलवारपणे दिली, हाच Conclave चा मराठी अर्थ आहे. थोडक्यात तो तपशील खालील प्रमाणे-

१) चैतन्य इंगळे- वाकड चाप्टर. मो .9881833286 व्यवसाय- पेस्ट कंट्रोल, सँनिटायझेंशन ,

डीसइन्फेकशन,सर्विसेस ,इ. दिवाळी ऑफर- खास क्लबच्या मेंबर्ससाठी २०% ऑफ. सुरक्षित सेवा सवलतीच्या दरात.


२) अक्षय दुसाने- वाकड चाप्टर .मो .8007561204 व्यवसाय - त्रिकाया फूडस प्रा. लि. खास दिवाळीसाठी Box of Happiness-  handmade designer chocolates. मिठाईची सेल्फ लाईफ असते चार दिवस,चॉकलेटची काही महिने. म्हणून दिवाळी गिफ्टचा उत्तम पर्याय. जवळच्या लोकांना आनंद आणि सुख वाटा.


३) ओंकार पंडित - सातारा चाप्टर .व्यवसाय- शुभराज ज्वेलर्स. पुसेगाव. दिवाळी खास क्लब मेंबर्ससाठी

ऑफर- जितक्या वजनाचे सोने विकत घ्याल त्यापेक्षा दुप्पट वजनाची चांदी मोफत मिळेल. 


४) प्रणित कुंदप- सातारा चाप्टर .व्यवसाय- आदित्य फूडसचे, काका पेढीवले. टॅग लाईन - eat's good. साताऱ्याचे कंदी पेढे ज्याच्यासाठी होतात सगळे वेढे .दर्जेदार चार प्रकारच्या मिठाई व फरसाणसाठी प्रसिद्ध .जानेवारी पर्यंत वाट पहा- Franchisees देणे आहे.


५) डॉ नूपुर जोगळेकर-

वाकड चाप्टर.मो.9890053837 व्यवसाय-LOMOS Holistic Healing Centre. Nutrition Adviser. आजाराचा root cause- Oxidative Stress आणि Solution - Antioxidant. आजारीच पडायचे नसेल तर डॉक्टर जोगळेकरांचा  सल्ला घ्या आणि 7 Colours of food , vegetables खा आणि स्वस्थ रहा.


६) नारायण वझुरकर - वाकड चाप्टर. मो. 9890150382 व्यवसाय- पौरोहित्य. दिवाळी ऑफर - खास क्लब मेंबर्स साठी ४९९ रुपये किंमतीचे दिवाळी पूजा किट फक्त- ३६९ रुपयात. किट विकत घ्या आणि गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली ऑन लाईन श्री लक्ष्मी पूजा घरात मुहूर्तावर साजरी करा.


७) मारुती मुसमाडे - वाकड चाप्टर. मो. 9423524336 व्यवसाय- आदिनाथ हॉलिडेज . दिवाळी ऑफर - किमान ६ लोकांची ट्रिप बुक करा, वन टाइम पेमेंट करा आणि घसघशीत डिस्काउंट मिळवा. तुम्ही फक्त मनसोक्त भटकंती करायची ते ठरवा कसं ते आदिनाथ हॉलिडेज वर सोपवा.


८) समीर यार्डी - सिंहगड चाप्टर. मो. 9822647126 व्यवसाय- फोटोग्राफी. B E Mechanical कडून फोटो सेशन करा आणि दर्जा काय असतो ते अनुभवा. Event  असो की Still फोटोग्राफी आठवा समीर आणि होऊद्या त्याला अमीर.


९) प्रदीप पाटील - कोथरूड चाप्टर.मो. 9422081900 व्यवसाय- साडी सेल्स अँड सर्विसेस. जिथे साड्या मिळतात मार्केट पेक्षा २५ ते ५० % स्वस्त अशी ते जाहिरात करतात. आधी चार ठिकाणी चौकशी करा आणि मग यांचा अनुभव घ्या.


प्रत्येक 3 प्रेझेंटेशन नंतर योगीराज देवकर, वाकड चाप्टर ,सेक्रेटरी. मो. 9307133134. व्यवसाय- Motivational Speaker  यांनी Participants Involvement Round घेतला . यात मेंबर्सना प्रेझेंटेशनवर आधारित प्रश्न विचारण्यात आले आणि बरोबर उत्तर देणारास चॉकलेट देण्यात आले. प्रासंगिक विनोद,

हजरजबाबीपणा, यामुळे हसत-खेळत झालेल्या या राऊंडमुळे एक वेगळीच धमाल आली. एक हशा पुढची दहा-पंधरा मिनिटे श्रोत्यांचा सहभाग वाढवितो. यामुळे सर्वांचा सहभाग आणि एकाग्रता वाढण्यास चांगलीच मदत झाली. क्लब मधील उद्योजक Good Listener आणि हुशार आहेत हाही प्रत्येय आला .


२) ५ उद्योजक Wakad Chapter मधील तर ४ उद्योजक वेगवेगळ्या  Cross Chapters मधील होते.

३) Cross Chapter मधील प्रेझेंटेशन देणारा उद्योजक त्यांच्या Chapter मधील आणखी तीन उद्योजकांना घेऊन आलेला होता .

४) वाकड  चाप्टर मधील उद्योजकांना एकाच मीटिंग मध्ये इतर ४ चाप्टर मधील प्रातिनिधिक उद्योजकांना भेटण्याची संधी मिळाली. हाच अनुभव इतर चाप्टर मधील मेंबर्सचा पण राहिला.

५) सर्वांना  Elevators Speech Round मध्ये ३० सेकंद बोलण्याची संधी मिळाली.

६) प्रेझेंटर उद्योजकाने स्वतःचे प्रॉडक्ट्स डिसप्ले केले होते.

७) Reference connect & done deal , question- answer round  ऐवजी प्रत्येकास लिहण्यासाठी स्लिप दिली होती त्यामुळे ही माहिती लेखी एकमेकांना हस्तांतरित करण्यात आली. याशिवाय प्रत्येक प्रेझेंटरला ब्रेकफास्ट साठी स्वतंत्र राऊंड टेबल देण्याचा विचार होता पण हॉटेलमध्ये जागे अभावी हे करता आले नाही.

आणि विशेष म्हणजे हे सर्व रेग्युलर मीटिंगच्याच खर्चात करण्यात आले.


निमंत्रक होते-

संकल्पना- स्वप्नील कुलकर्णी. PCMC रिजन हेड. 9545058877

निलेश कुलकर्णी, चेअरमन.8087830007

योगीराज देवकर, सेक्रेटरी आणि PCMC रिजन ब्लॉग रायटर.9307133134

www.motivationacademy.in

गौरव गायकवाड, ट्रेझरर.7276000692

वाकड चाप्टरच्या कोअर टीमने ही संकल्पना यशस्वी करण्यात खूप मेहनत घेतली.

SCGT Wakad Chapter. 

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻


Monday, 4 October 2021

नारायण वझुरकर गुरुजी

 श्री नारायण वझुरकर,

सदस्य,SCGT वाकड चाप्टर आणि सौ नीलमताई राजपूत( बोबटे),

सदस्य,SCGT पिंपरी चिंचवड चाप्टर- सक्सेस स्टोरी.


*गाळा एक दुकाने दोन - Joint Venture.*


Saturday Club Global Trust-SCGT वाकड. सक्सेस स्टोरी क्रमांक सहा.


*ऑर्गन केअर आणि देव पूजा भांडार* एकाच गाळयात दोन दुकाने सुरू करणाऱ्या ओनर्सनी  असे मत व्यक्त केले की, Saturday Club Global Trust- SCGT ही अशी एक NGO आहे जिथे सक्सेस स्टोरीज निर्माण होतात कारण हा क्लब नसता तर आमची भेटच झाली नसती.


आपली संपूर्ण सजीवसृष्टी परस्परांवर अवलंबून चालते. हेच समीकरण व्यवसाय आणि व्यवसायिकास पण लागू पडते. श्री नारायण वझुरकर यांनी पाठशाळेत आठ वर्षं पौराहित्याचे  शिक्षण पूर्ण केले, HSC पर्यंतचे शिक्षणही पूर्ण केले आणि नोकरीच्या शोधात ते पिंपरी चिंचवडला आले. नाही म्हणायला काही महिने नोकरीही केली पण नोकरीत ते रमले नाही आणि जॉब करत करत त्यांनी पौराहित्य पण चालू ठेवले. थोड्याच दिवसात त्यांनी पूर्णवेळ पौराहित्य करण्याचा निर्णय घेतला आणि इतर गुरुजींच्या सहवासामुळे त्यांचे दीड-दोन हजार गुरुजींचे नेटवर्क उभे राहिले आहे. त्यामुळे तुम्ही कोणती पूजा करायची ते फक्त ठरवा आणि कसे ते नारायण गुरुजींकडे, (मो.9890150382) सोपवून निश्चिन्त रहा. गुरुजी म्हणतात तुम्ही घरी एक पूजा करता तेव्हा देवकार्य तर होतेच पण कितीजणांना रोजगार मिळतो ते पहा. यालाच म्हणतात जगा आणि जगू द्या.


पुढे त्यांनी मोरजाई देवी सामाजिक व सांस्कृतिक संस्था मोरवाडी पुजारी म्हणून जॉईन केली आणि  आजतागायत तिथला पूजापाठ नित्यनियमाने सुरू आहे.


लग्नानंतर त्यांनी पत्नीसाठी अगदी ५×३ च्या टपरीवजा जागेत पूजा साहित्याचे दुकान सूरु केले. थोड्या अनुभवानंतर ते थोडे मोठे आणि अजून थोड्या अनुभवानंतर हे अजून मोठे सुरू केले आहे . कसे ती पण एक स्टोरीच आहे.


२०२० मध्ये कोरोनामुळे लॉकडाउन झाला आणि सगळे व्यवहार ठप्प झाले. SCGT च्या ऑन लाईन मीटिंग सुरू झाल्या आणि मेंबर्स मध्ये 1 to 1 चर्चा सुरू झाल्या. 1 to 1 मुळेच त्यांचा सौ नीलम राजपूत (बोबटे).

(मो.7066063636) यांच्याशी परिचय झाला. त्या स्वतः उच्चविद्याविभूषित MBA(HR) आहेत. चांगली आठ वर्षे नोकरी केली पण मुलाचा सांभाळ करण्यासाठी ती सोडली पण घरात निवांत बसणे त्यांना आवडले नाही आणि त्यांनी घरातूनच ऑरगँनिक उत्पादने विक्रीचा व्यवसाय सुरू केला. SCGT मध्ये त्यांची बिझनेस कँटेगरी आहे ऑरगँनिक फूड्स. पुढे त्यांनी ऑर्गन केअर या ब्रँडअंतर्गत शेंगदाणा,तीळ,

मोहरी,खोबरेल,सूर्यफूल,इ. प्रकारची घाना तेल सुरू केली आहेत . 1to1 मध्ये समजले की त्यांना भावाला मदत करण्यासाठी दुकान सुरू करायचे आहे .


गुरुजीच्या आणि

निलमताईच्या पण दुकानाबद्दलच्या काही कल्पना होत्या. गुरुजींच्या पत्नी दुकान पाहतात म्हणून त्यांना महिला पार्टनर असावी असे वाटत होते .खर्च ५०:५०% विभागला जावा आणि व्यवहारात पारदर्शकता हवी. 

तर मॅडमला वाटत होते की दुकानातली उत्पादने एकमेकांना पूरक असावीत. एक उत्पादन घ्यायला आलेल्या ग्राहकाने दुसऱ्याची पण उत्पादने विकत घ्यावीत. पार्टनर लोक सरळ स्वभावाचे असावेत .


दोघांच्याही कल्पना जुळत होत्या आणि त्यात एक समान धागा होता की,ते दोघेही SCGT चे मेंबर्स आहेत.त्यामुळे प्रत्येक्ष न भेटताच ऑन लाईनच एकत्र दुकान सुरू करायचे अशा प्रकारचे Done deal झाले . लागलीच गुरुजींनी दुकान शोधले आणि 

शॉप नंबर ५ , अजमेरा कॉम्प्लेक्स, SBI शेजारी,पिंपरी, पुणे १८. या पत्त्यावर *ऑर्गन केअर आणि देव पूजा भांडार* सुरू झाले. 


सौ राजपूत मॅडमने दुकानात ड्राय फ्रुट्स, कोल्हापूर चाप्टरच्या श्री प्रतीक कपटे यांची मधाची उत्पादने, रत्नागिरी चाप्टरच्या श्री राजीव कारखानीस यांची मँगो पल्पची उत्पादने, अशी अनेक ऑरगँनिक उत्पादने ठेवलेली आहेत. एकमेका सहाय्य करू चे हे उत्तम उदाहरणच आहे.दुसरीकडे गुरुजींनी दुकानात पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य तर ठेवले आहेत पण खास काय तर रुद्राक्ष आणि स्फटिकाच्या दर्जेदार माळा. दोघांनाही SCGT मेंबर्सची पूरक प्रकारची उत्पादने विक्रीस ठेवायची आहेत.


दुकानाबाहेरचा कॉमन बोर्ड तुमचे स्वागत करतो. आत गेलो की डाव्या भिंतीवर ऑर्गन केअर तर उजव्या भिंतीवर पूजा भांडारचे मोठे फ्लेक्स दिसतात. आत उत्पादनांची आकर्षक मांडणी केली आहे. मागे स्टोरेज प्लेस आहे.


SCGT त असे पण घडते की, दोन वेगवेगळ्या चाप्टर मधील दोन मेंबर्स एकत्र येतात आणि स्वतःची दुकाने एकाच दुकानात थाटतात. आता तर ते दोघे ब्रँचेस सुरू करायचे ठरवीत आहेत.

दोघांनाही खूप साऱ्या शुभेच्छा.


सक्सेस स्टोरी रायटर.

*योगीराज देवकर.*

प्रेरक,प्रशिक्षक,लेखक.

मेंबर,सेक्रेटरी, SCGT वाकड चाप्टर आणि ब्लॉग रायटर, पिंपरी चिंचवड रिजन.

www.motivationacademy.in

चैतन्य इंगळे, डोअरमोझो

 कोरोना योद्धा :

*डोअरमोजो*


Saturday Club Global Trust(SCGT) वाकड चाप्टर. सक्सेस स्टोरी क्रमांक पाच.

Business Category: Pest control & sanitization.


श्री चैतन्य इंगळे यांची ग्रॅज्युएशन पूर्ण करण्यातच  दमछाक झाली होती. खरंतर ज्यांना शिक्षण अवघड जाते,ज्यांची परिस्थिती प्रतिकूल असते, असेच विद्यार्थी पुढे जीवनाच्या परीक्षेत पास होतात. मिळेल ते काम करायचे या प्रयत्नातून त्यांनी यशदामध्ये करार पद्धतीने स्वागत कक्षातील नोकरी मिळविली. नोकरीला समांतर केटरिंग डिप्लोमा ,एम ए चे शिक्षण चालू ठेवले आणि यशदातच त्यांनी स्वच्छता, केटरिंग, मेंटेनन्स विभागात लक्ष घालून अनुभव पण मिळविला.


आयुष्यात घडणारा सकारात्मक किंवा नकारात्मक आघात आयुष्याला कलाटणी देऊन जातो. चैतन्यच्या बाबतीतही तसेच घडले. एकदा एका वरिष्ठ पर्यवेक्षकाने चैतन्यची काही चुक नसताना अपमानकारक भाषा वापरली. या आघाताने त्यांनी पुढच्या पाच मिनिटात नोकरीचा राजीनामा दिला.


आता जे काही करायचे ते स्वतःचा आणि घरच्यांचा स्वाभिमान,अभिमान वाढविणारेच असेल अशा इराद्याने त्यांनी पुढील वाटचाल सुरू केली. यशदात वेगवेगळ्या विभागात लक्ष दिल्यामुळे त्यांना कदाचित स्वच्छता या विषयात करिअर होऊ शकते असे वाटले असावे . समोर प्रश्नांचा डोंगर तर होताच परंतु न डगमगता त्यांनी झाडू,खराटा,फिनेल आणि बादली घेऊन लोकांची घरे साफसफाई करण्याच्या कामास सुरुवात केली. ग्रॅज्युएट मुलगा हे काम करू लागल्यामुळे मित्र ,नातेवाईक त्यांना हसत होते पण चैतन्यला मात्र या कामात वाव आणि भविष्य दिसत होते.


त्यांनी वर्धस ग्रुपची स्थापना केली . कष्ट,ओळखी, माऊथ पब्लिसिटी यामुळे कामे मिळत होती. आता कुठे व्यवसायाची गाडी रुळावर येत होती अशा काळात त्यांना ऐन तारुण्यात  हार्ट अटॅक आला. हॉस्पिटलचे सगळे उपचार पार पडले. वेदना असल्या की मन भावनात्मक होते. हॉस्पिटलायझेशनच्या काळातच त्यांच्यात समाज उपयोगी कामाची बीजे रोवली गेली आणि त्यांनी युनायटेड मराठा ऑर्गनायझेशनच्या कामास सुरुवात केली. यामाध्यमातून त्यांनी अनेकांना उद्योजक बनविले.


वर्धस ग्रुपच्या माध्यमातून स्वच्छता, सुरक्षा सेवा, होम क्लीनिंग अशा सेवा पुरविल्या जातात. यातून १८०० लोकांना करार पद्धतीने रोजगार उपलब्ध झाला.


सदर सर्व चालू असतानाच ग्राहक पेस्ट कंट्रोल आणि इतर सेवांची मागणी करत होते. यातूनच पुढे ५ मे २०१८ रोजी डोअरमोजोचा जन्म झाला. ( *92 3007 3007*)


आजपर्यंत श्री चैतन्य इंगळे यांना विविध संस्थांकडून गौरविण्यात आले आहे. यासंपर्कातूनच लोक त्यांना राज्यभर मार्गदर्शनासाठी बोलावू लागले. यामाध्यमातून त्यांना महाराष्ट्रात तीस हजारपेक्षा जास्त युवकांना उद्योगाचे मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली.


जब जब जो जो होना हैं ।

तब तब तो तो होता हैं ।

मार्च २०२० मध्ये भारतात कोरोनात वाढ झाली आणि सगळी समिकरणेच बदलली.

कोरोनामुळे एकाबाजूला वर्धस ग्रुपच्या व्यवसायात ८०% घट झाली आणि १५०० करार पध्दतीच्या कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा आली. लॉक डाउनच्या काळात बिलिंग थांबले होते पण कर्मचाऱ्यांचे पगार चालू होते. कर्मचारी जीवाचा धोका पत्करून काम करत होते. दुसऱ्या लाटेत घरातल्या चौघांना कोरोना झाला होता. स्वतः जगतोय का मरतोय अशी भीतीदायक परिस्थिती अनुभवली आणि कोरोनाला हरवून परत आलो. पण ८०% आय टी आणि हॉस्पिटॅलिटी व्यवसाय बंद झाला तो दीड वर्षानंतरही पुन्हा पूर्ववत झालेला नाही. 


दुसऱ्याबाजूला डोअरमोजोच्या व्यवसायात २५० ते ३०० टक्के वाढ झाली. डोअरमोजोतुन ते पेस्ट कंट्रोलची सेवा देत होते. कोरोनामुळे सॅनीटायझेशन हा शब्द नव्याने वापरात आला. याचा इतका मोठा बिझनेस होईल याचा चैतन्यने विचारही केला नव्हता. पण या कल्पनाही न केलेल्या व्यवसायाने त्यांना प्रचंड काम,नाव आणि पैसे मिळवून दिले. सॅनीटायझेशनची गरज ओळखून त्यांनी सात लाख रुपये गुंतवणूक करून तुर्की वरून नऊ Ultra Low Volume Misting Machines दीड महिन्यात आयात केल्या. त्यानंतर श्री चैतन्य आणि त्यांच्या १० जणांच्या टीमचे कोरोना विरुद्धचे युद्ध सुरू झाले. गेल्या दीड वर्षात त्यांनी 24×7 सेवा देऊन १२००० पेक्षा जास्त पुणे आणि मुंबईत घरे,ऑफिसेस,बँका, दवाखाने, हॉस्पिटल्स,  कंपन्या,कार्पोरेट्स,अपार्टमेंस, सोसायट्या,इ. ठिकाणी सॅनीटाइज केल्या आहेत आणि विक्रमी काम करून लाखो रुपयांचा व्यवसाय केलेला आहे . यातील १०% व्यवसाय SCGT च्या नेटवर्क मधून झालेला आहे असे ते सांगतात.

सुदैवाने दहापैकी कोणालाही कोरोना झाला नाही. अर्थात कर्मचाऱ्यांची PPE किट वापरात होते आणि सर्व नियमांची काटेकोरपणे पालन करीत होते. खरंतर या कर्मचाऱ्यांच्या धाडसाला दाद द्यायला हवी आणि त्यांचे कौतुकही करायला हवे.


कोणतेही काम छोटे किंवा मोठे , चांगले किंवा वाईट नसते. मिळेल ते काम जर उत्कृष्ट तऱ्हेने केले तर दोन पैकी एक परिणाम होतोच. एकतर तुमच्यामुळे त्या कामाला प्रतिष्ठा मिळेल किंवा त्या कामामुळे तुम्हाला प्रतिष्ठा मिळेल. श्री चैतन्य इंगळे असे सांगतात की,"खरंतर मानव जातीवर असले महामारीचे संकट पुन्हा येऊ नये. पण या संकटाच्या काळात आम्हाला जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली ही मोठी समाधानाची बाब आहे." कोरोनासारख्या या महामारीच्या काळात श्री चैतन्य आणि टीमने केलेले कार्य योध्या सारखे आहे त्यांना दोन्ही हात जोडून प्रणाम. 


प्रेरक,प्रशिक्षक,कथा लेखक-

योगीराज देवकर.

SCGT वाकड चाप्टर,सेक्रेटरी.

मो.9307133134

www.motivationacademy.in